R R Pathan

Tragedy

4  

R R Pathan

Tragedy

राम -रहीम (कथा)

राम -रहीम (कथा)

7 mins
349


मिलनपुर हे निसर्गरम्य वातावरणात वसलेल दोन हजार लोक वस्तीचं छोटसं खेडेगाव.गावात सोई-सुविधा कमी जरी असल्या तरी सुख-शांती नांदत होती.या छोट्याश्या लोकसंख्येच्या वस्तीत हिंदू-मुलिम व ईतर धर्माचे लोकं गावाच्या नावाप्रमानेच गुण्यागोविंदाने राहत होते.गावात रामचन्द्र जाधव व रहीम शेख ही दोघे जीवापाड एकमेकांवर प्रेम करणारे चाळिशी पार केलेले जिवलग मित्र.बालपणापासूनचे सवंगडी. जिल्हा परिषद शाळेपासून बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण सोबत झाले.पुढे लग्नासाठी मुलगी पसंत करण्यापर्यंत सुद्धा दोघे एकमेकांसोबतच. दोघांची लग्न झाल्यानंतर शेतीवाडीची जबाबदारी अंगावर पडल्याने दोघांनी आपापल्या घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरुवात केली.गावात दोघांची घरे तर शेजारी होतीच तसीच शेती सुद्धा एकाच शिवारत होती. गावात कोणाचेही लग्नकार्य असो की मरण-धरण असो राम-रहीम दोघेही मित्र धावून यायचे.राम-रहीम ची जोड़ी म्हणून या दोघांची ख्याती सर्व गावभर होती.दोघे जणु सख्खे भाऊ असल्याची प्रतिमा संपूर्ण गावात होती.गावात किरकोळ भांडण-तंटे जरी झाले तरी या दोघांच्या एकजुटिचे उदाहरण संपूर्ण गावात लोक द्यायचे. शोले,याराना,धडाकेबाज या दोघांचे आवड़ते चित्रपट.रातभर जागरण करुण तालुक्याच्या यात्रेत त्यांनी अनेकवेळा हे सिनेमे सोबत पाहिले होते दरवर्षी रमजान ईदला शिरखुरमा प्यायला रामचंन्द्र त्याची बायको शारदा व लहान मुलगा सुमीत रहीमच्या इथे यायचे तर दिवाळीत फराळ पाणी व जेवनास रहीम त्याची बीवी सलमा व मुलगा सुलेमान परिवारासह रामचंन्द्रच्या घरी हजर रक्ताच्या नात्या पेक्षा ही यांचे मनाचे नाते अत्यंत घट्ट होते. दोघांची भाषा सुद्धा एकमेकांना प्रिय होती.राम नेहमी रहीम सोबत हिंदी बोलयाचा तर रहीम मराठी.एक दिवस शेतात काम करताना दोघां मित्रांची एकमेका सोबत चर्चा सुरु होती. 

 "यार रहीमभाई आपण शहर में रहनेको जाएंगे ..!

  "क्यू रामभाऊ ऐसे अचानक.! अरे गावात आपल घर आहे, खेतीबाड़ी आहे...हे सगळ सोडून...

" यार रहीम गावात संमद जरी असलं तरी गावात लाईट राहत नाही,लेकराला शिक्षणाची सोय नाही,चांगला दवाखाना नाही.. आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी उच्चशिक्षित करण्यासाठी सगळ्या गोष्टी साठी आजकाल जिल्ह्याचे ठिकाणच आवश्यक आहे...!

 "ते ठीक आहे रामभाऊ...पण आपण गावात सुखी आहो समाधानी आहोत...!"

'अरे रहिम मुलाच्या भविष्याचा विचार कर..

शेतीवाडी करता येईल आपल्याले तिथूनच..!'

 रहीमने राम च्या गोष्टीचा मनोमन विचार केला.

 राम उत्तराची वाट पाहत क्षणभर स्तब्ध झाला.

थोड्यावेळने "ही दोस्ती तूटायची न्हाय..!अस म्हणून

 रहीम ने मान हलवली.

काहीच दिवसात दोघांनीही शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी एकता नगर मधे जवळ -जवळ ले आउट विकत घेतले.

 मुलांचे उच्च शिक्षण अन सुखसोईचे जीवन हे स्वप्न उराशी बाळगून दोघांनी आपापल्या जमापुंजीतुन वर्षभरात शहरात टोलेजंग घर बांधली व आपापल्या घरावर दोघांनीही मोठ्या अक्षरात देखील राम-रहीम अशी नाव सुद्धा कोरली. रामभाऊ ने थाटामाटात सत्यनारायन पूजा केली तर रहीम ने कुरानखानी करून गृह प्रवेश केला.गावातील व प्रतिष्टित लोकांची मेजवानी झाली. कुरआन खानी कार्यक्रमात आलेला एक मेहमान रहीम ला सल्ला देत बोलला,

 "रहीमभाई आपने घर बोहोत बढिया बनाया है..

 पर...मुस्लिम बस्ती में अगर होता....तो.....!"

 "क्या फर्क पड़ता हैं मिया.. जीस पर हम सब रह रहे है..

 वो जमीन भी तो एक ही है.."

 "हा..मगर अपने लोगो के कॉलनी में रहते तो ठीक रहता..!

 "मिया सादियो हमारी गंगा जमुना तहजीब चलती आ रही है .. और मैं कभी ऐसी सोच भी नहीं रखता..और आप भी मत रखिये..! 

अस म्हणत रहीम ने त्याचे तोंडातले शब्द तोंडातच खामोश केले.

शहरात स्थायिक झाल्यावर राम-रहीम दोघांचे शेतीवाड़ी करीता गावकडे जाने-येणे नित्यनियमाने सुरुच होते. दोघे एकाच मोटर सायकलवर जायचे.दुपारी सोबत आनलेली भाकर-भाजी जेवायचे.गड़ी माणसं कडून कामकाज करून घ्यायचे.सहा महीने हे सगळ व्यवस्थित सुरु होत. इकडे शहरात निवडणूकीचा बिगुल वाजला.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.एकता नगरात प्रचारकर्ते, कार्यकर्ते यांच्या फेऱ्या सुरु झाल्या.जाती-धर्मानुसार कार्यकर्ता यांचे राम-रहिमच्या यांच्या घरी जाने-येणे सुरू झाले. ओळखी,पहचान वाढत गेली आता राम-रहिम दोघे शहरात रैली,मोर्चे यामधे सामिल व्हायला लागले.भाषण त्यांच्या कानी पडायला लागली.धार्मिक समारंभात देखील दोघांना बोलवनी होऊ लागली. आपली प्रतिष्ठा वाढत असल्याचा भ्रम दोघांना मनोमनी होऊ लागला.इकडे शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले.गड़ी माणसाचा मनमानी कारभार सुरु झाला.

शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्यास सुरुवात झाली.

रामभाऊ ने स्वतःची मोटर सायकल घेतली.आता दोघे आपापल्या दुचाकिने गांवामधे,शेतीकडे अकेले जाऊ लागले.हे सर्व पाहुन गावातील लोकदेखील थोड़े

अचंबित व्हायला लागले.

एके दिवशी एक पुढारी रामचंद्र च्या घरी आला. धर्म,समाजकारण,राजकारण या विषयावरील चर्चा रंगत गेली.बोलता बोलता पुढारी हळूच बोलला,

 "रामभाऊ पाच महिन्याने तुमच्या ग्रामपंचायत ची निवडणूक आहे म्हणे..महिला सरपंच पद राखीव झालय..!

" हो भाऊ साहेब...पण मला राजकारणात काही 

 इंटरेस नाही..!

"अहो रामभाऊ इंटरेस्ट घ्यावा लागतो..तुम्ही आपले मानस..या सगळ्या गोष्टी आपल्या समाजासाठी कराव्या लागतात... गावात तुमची प्रतिष्ठा आहे..पद आल की अजून वाढनार...!"

"हो पन...भाऊ साहेब तिला नाही जमनार हे सगळ..!

 "अहो रामभाऊ तुम्ही आहे ना...शेवटी कारभार माणसंच करतात...आम्ही आहोच सोबत..माझ्या या निवडणूक प्रचारात आम्हाला साथ दया...आम्ही तुम्हाला देऊ...!

एवढं बोलुंन नमस्कार करत पुढारी निघून गेला.

 लगेच दोन दिवसाने समाजाचा एक नेता रहीम शेख च्या घरी हजर झाला.त्यांच्याही मजहबी बाता रंगत गेल्या.

लगेच नेताने अपनी मन की बात समोर ठेवली,

"रहीम भाई सुना है आपके पंचायत का इलेक्शन होने

 वाला है..!"

"हा साहब पर उससे हमे क्या..हम भले और हमारा काम भला..!

 "रहीम भाई जरा सोचो..हमारे देहातो के लोगो के हालात क्या है..हमारे लोगो के मौजूदा हालात कैसे होते जा रहे है...

 तुम्हे मौका मिला है....तुम इसे सुधार सकते हो..!

 "ये सब ठीक है साहब...पर मेरे बीवी से ये राजकारण 

 नही होगा..!"

"रहीम भाई सब कारोबार तुमको ही करना है..बाकी हम लोग तो है ही आपके साथ..! ईस इलेक्शन में तुम हमारी मदत करो....हम तुम्हारी करेंगे.."!

 राम-रहीम दोघेही पुढारी-नेत्यांच्या जाळ्यात पुर्णपने अड़कुन गेले.रामचंद्र ची बायको शारदा व रहमची बीवी सलमा यांनी लाख कोशिश करुनही राम-रहीम च्या डोक्यातलं राजकारणाच भूत उतरल नाही.शेवटी काहीच न चाल्याने दोघींनी माघार घेत पतींना साथ द्यायचे नाईलाजाने ठरवले.

आता राम-रहीम च्या डोक्यात धार्मिक कट्टरतेची बीजे उगवायला सुरवात झाली.त्याला खतपानी देखील जोमाने भेटु लागलं.दोघांचे स्व धर्मीय कार्यकर्ता सोबत जोरा सोरात निवडणूक पूर्वतयारी करीता प्रचारकार्य सुरु झाले. दोघांनी आप-आपल्या घरावर स्व धर्माचे झेंडे देखील चढवले.स्वतःचा धर्मच सर्वश्रेष्ठ आहे ही भावना त्यांच्या मनात रुजू लागली.दोघांनी घरावर कोरलेले राम-रहिम हे नाव पुसून टाकले.दोघांच्या घरा वरच्या नावा सोबतच मनाचा देखील बटवारा झाला.दोघे एकमेकांना नफरतच्या नजरेनेने पाहू लागले.दोघां-मुलांचे एक मेका सोबतचे अभ्यासही बंद करण्यात आले.

त्याच दरम्यान बाहेर राज्यात मन्दिर-मस्जिद चा अवमान झाल्याच्या अफवा सोश्यल मीडिया वर रंगु लागल्या. घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर मार्चे निघू लागले.पोलीस प्रशासन हे दोन्ही पक्ष यांना ह्या अफवावर विश्वास ठेवू नका म्हणून शांती-अमन राखण्यासाठी वारंवार विनंती

करत होते.

शुक्रवार चा दिवस उजाडला.राम-रहीम दोघेही नेता- पुढाऱ्यांच्या प्रचार कार्यासाठी सकाळीच निघुन गेले.

दुपारी एकता नगर मधून मोर्चा निघाला.कट्टर पंथीयांनी आपला डाव साधला.मोर्चात कोणीतरी दगड फेक केली.

अचानक मोर्चाचे रूपांतरण दंगलीत झाले.एक दोन मोटर सायकली जाळल्या गेल्या.आजुबाजुच्या घरावर पत्थरबाजी सुरु झाली. हे सगळं एकता नगरात राम-रहीम च्या घरसमोर सुरु होतं.दगडफेक करणाऱ्यांच्या नजरा राम रहीम च्या घरांच्या झेंड्यावर गेल्या. दोघांच्या घरांच्या काचा फुटायला सुरुवात झाली. तेवढ्यात रामचन्द्रच्या १० वर्षाच्या मुलाला झप-दिशी एक दगड डोक्याला लागला.तो तसाच पटकन खाली बेशुद्ध होऊन पडला. डोक्यातून घळाघळा रक्त वाहू लागलं.शारदा दरवाजे खिडक्या बंद करत आरडा-ओरडा करू लागली.साडीचा पालव टरकन फाडून सुमितच्या डोक्याला बांधला काय करावं तिला सुचेना.पोलिसांच्या गाड्या एकता नगरात घुमू लागताच पत्थरबाजी करणारे, मोर्चा काढणारे पळून गेले.थोड्यावेळाने शांतता झाली. रहिमची बीवी सलमाने आपल्या घराचा बंद कलेला दरवाजा हळूच उघडून मुलगा सुलेमानसह शारदाच्या घराकडे धाव घेतली. रामचंद्र ची पत्नी शारदा खूप घाबरली होती.सलमानने तिला धीर दिला.बाहेर चौकात जाऊन पटकन ऑटो घेऊन आली.शारदाने तेवढ्यात आवरासावर केली.सलमा शारदाने सुमितला ऑटो मध्ये बसवलं तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता मुलाच्या डोक्यातून वाहणारं रक्त पाहून दोघा बायांचे अश्रू वाहत डोळ्यातून टपकत होते. हे सगळं पाहून ऑटोवाला चाचा ऑटो चालवत बोलत होता

"बेटी कुछ नही होगा आपके बच्चे को ..उस भगवान खुदा पर भरोसा रक्खो..!"

शारदा मनोमन देवाला तर सलमान खुदाला याद करत होती

हे सगळ पाहून लहान सुलेमान देखील रडत होता.

हॉस्पिटलसमोर पोहोचताच ऑटो वाला चाचा आपल्या दोन्ही हातात लहान सुमितला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.डॉक्टरांनी लगेच उपचार करायला सुरुवात केली.

रामचन्द्रला ही सर्व घटना कळताच तो धावत-पळत हॉस्पिटलमध्ये आला. तेवढ्यात डॉक्टर बाहेर बोलले,

"सुमित जाधव पेशंटचे नातेवाईक कोण आहेत ?"

 घाईगडबडीने सर्व डॉक्टर समोर उभे झाले.

 मी.. डॉक्टर साहेब.. मी रामचंद्र जाधव सुमितचा

 वडील आहे.

 "बघा मुलाच्या डोक्याला मार लागल्याने खूप रक्त गेल आहे. त्याला ओ निगेटिव रक्त द्यावे लागेल..!

"कोणत्या माणसाचं रक्त चालेल डॉक्टर साहेब..."

 अहो रामचंद्रजी.. रक्ताला कोणतीच जात-धर्म नसते.

 ते कोणत्याही माणसाचं चालतं.! 

 आमच्याकडे ओ निगेटिव ब्लड उपलब्ध नाही.तुम्ही लवकर शोधून आना.."

मोर्चात झालेल्या दंगलमुळे सर्व नेता-पुढारी यांनी मौन धारणा केली होती.रक्तासाठी रामचंद्रने सगळ्या कार्यकर्ते पुढारी यांना फोन लावले कोणीच फोन उचलत नव्हते.रामचंद्रच्या संपूर्ण परिवारत कोणाचेही ओ निगेटिव्ह रक्त नव्हते शेवटी रामचंद्र असह्य होऊन हॉस्पिटलमधील बाकावर बसला.हे सर्व बाजूला उभी असलेली सलमा बघत होती.तीन रहीम ला फोन लावला सर्व कहानी सांगितली.रहीम भागदौड़ करत हॉस्पिटल मधे पोहचला.डॉक्टर सोबत बातचीत केली.लगेच डॉक्टरानी त्याला आता emergency रूम मधे बेडवर लेटवून सुई लाऊन रक्त घ्यायला सुरवात केली.सुमित ला रक्त देण्याची प्रक्रिया सुरु झाली.सलमा दोन्ही हात वर उचलत दुआ करत होती बाहेर बसलेला रामचंद्र गहिवरुन हे सगळ पाहत होता.तासाभरात सुमीत शुध्दिवर आला.आई-आई करत भानावर येत होता.डॉक्टर बाहेर येत रामचंद्र ला बोलत होते.

 "रक्त वेळेवर मिळाल्याने तुमच्या मुलाच्या जीव वाचला..!

 डॉक्टराचे शब्द ऐकताच रामचंद्र गहिवरून थेट रहीम च्या बेडकडे गेला.रहीम असाच बेडवरून उठून शर्ट घालीत होता. रामचन्द्रला भरून आलं तो लगेच त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. 

" मुझे माफ कर दे मेरे दोस्त..! असं म्हणत त्याला बिलगून रडतच होता. रहीमच सुद्धा हृदय भरून आलं.दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडत होते. दोघांचेही अश्रूच्या पाण्याने जणू मनातील मळ स्वच्छ धुऊन निघाले. 

दोघांच्याही बायकांचे त्यांच्याकडे पाहून डोळे पाणावले.

 दोघेही एकमेकासोबत गहिवरून बोलत होते.

"मित्रा सुख शांती, आनंदी जीवन हे आपल्या गावाकडेच होत..! इथे राहून आपल्या विचारांचा देखील बटवारा झाला ..!"

"सही कहा मेरे भाई नफरत की वजह से हम दोस्त से दुश्मन बन गये थे..!"

ही दोस्ती तुटायची नाही..!असं म्हणत पुन्हा एकदा रहीम ने रामचन्द्रला मिठी मारली. दोघेही आता गावाकडे परत जाण्याचा निर्धार पक्का करत एकमेकांचे आनंदाश्रू पुसत होते....

            


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy