Manasi Manasi

Romance

3.4  

Manasi Manasi

Romance

कधी रे येशील तू जिवलगा

कधी रे येशील तू जिवलगा

28 mins
596


अरे थांब ना. बोलशील कि नाही? सखी ची आर्त हाक,पण तो त्याच्याच तंद्रीत.

ही मैत्री म्हणावी कि अजून काही? हे काळ ठरवणार होता.

सखी, सोनेरी कुरळ्या केसांची, केतकी रंगाची आणि निळसर डोळ्यांची. परी च जणू. पण, सृजन काही ह्या सौंदर्याला भुलला नव्हता. तिला काही गर्व ही नव्हता तिच्या रूपाचा.पण सृजन इतका आवडला होता कि निदान त्यानं पाहावं, बोलावं असं खूप वाटत होतं पण छे ह्याच काहीतरी वेगळंच चालू होतं.

सखी तिच्या विचारातून बाहेर आली आणि सृजन तो पर्यंत निघून गेला होता.तिला त्यांची पहिली भेट आठवली.

निशू, अगं लक्ष कुठाय? सखी न निशू अगदी घट्ट मैत्रिणी.कधीच्या हाका मारतीये आणि तू? निशू नी एका मुलाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, अगं तो बघ! तो ग, ब्लू टी शर्ट वाला गं, कसला हँडसम आहे. सखी तिला बाजूला करून एकटक पाहतच राहिली. इतकी सुंदर बार्बी सारखी सखी. एका क्षणात त्याच्यावर भाळली. आहाहा, काय मस्त स्पोर्ट्स बिल्ट. खरंच किती हॉट आहे हा.

निशू, कोण ग हा? सांग ना,नाव काय? 

अग मला काय माहित? पण थांब लगेच माहिती काढते.

इतक्यात तो ब्लु टी शर्ट तिच्यासमोर आला. पण अरे हे काय, ह्यांन साधं बघितलं ही नाही.

सखी पार हिरमुसली. खरंतर तो तिच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या मित्राला निहाल ला भेटायला आला होता. ती जणु मध्ये नाहीच आहे.अशा थाटात तो निहाल ला भेटला आणि दोघ कॅन्टीनच्या दिशेने गेले.

निशू आता इरेला पेटली. तिनं लगेच तिच्या नेटवर्क ला कामाला लावलं आणि माहिती मिळाली.

घ्या मॅडम तुमच्या ब्लु टी शर्ट च नाव सृजन.

सृजन दामले, वय 20 sybcom आणि हो, राहतो कॉलेज च्या boys हॉस्टेल मधे बर का!

अजून काही? आणि निशू नी सखी कडे बघून डोळा मारला. हम्म्म्म, नाही अजून माहिती मी काढते. सखी तिला टाळी देत म्हणाली.

अगं पण आख्खं कॉलेजच्या मुलांचं माझ्याकडे लक्ष आहे आणि ह्यांन साधं पाहिलं पण नाही यार!

उगी उगी बाळा. पडेल हो, तो तुझ्याच प्रेमात पडेल. निशू आशिर्वाद द्यायच्या पोझ मधे म्हणाली.

सखी सुद्धा निशूच्या घरातच पीजी म्हणून राहत होती. मुळची ती कोकणातली, पण शिक्षणासाठी म्हणून ती मुंबईला आली होती.

आणि सृजन पक्का मुंबईकर. पण मनानी मात्र कोकणात रमणारा, निसर्ग त्याचा वीक पॉईंट.

यथावकाश निशू निहाल सखी आणि सृजन ह्यांची एकाच वर्गात असल्याने ओळख झाली आणि आता तर निहाल नी निशूला पटवायला सखी ची मदत मागितली. झालं, निशू आणि निहाल ह्यांचं प्रकरण मार्गी लागलं. पण, सृजन अजूनही तितका मोकळा नव्हता झाला.तो हातचं राखून वागायचा.

एके दिवशी त्यांनी सैंदन व्हॅलीचा प्लॅन केला. कोजागिरी ची रम्य रात्र. काजव्यांच्या ताटव्यानी नटलेली, चमचमणारी झाडं आणि चंद्राचा लख्ख प्रकाश, बस्स अजून काय पाहिजे! त्यांनी रात्री टेन्ट मधे मुक्काम करायचा आणि पहाटे त्या दरीत उतरायचं असा बेत आखला. निशू आणि निहाल रोमँटिक मूड मधे असल्यानं टेन्ट मधे गेले आणि सृजन आणि सखी त्यांना एकांत मिळावा म्हणून टेन्ट पासून थोडं लांब चालत आले. सखी मुळातच बोलघेवडी आणि त्यात सृजन बरोबर आज तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं. तिनं विचारलं, काय रे तूझ्या घरी कोण कोण असत?

सृजन गप्प..!

Sakhi: ओह्ह साहेब, बोला कि!

सृजन : कोणी नाही.

सखी : काय? अरे पण, निहाल म्हणाला आई असते. बाबा आहेत पण कामानिमित्त परदेशीं असतात.

सृजन : माहिती काढलीयेस ना? मग आता चौकश्या कशाला? तो चिडला आणि तरा तरा पुढे गेला.

ती मागून हाका मारत पळत आली. तो थांबला, काय आहे? परत असल्या पर्सनल चौकश्या नको करूस,नाहीतर आपली मैत्री संपली.

ती त्याचा हा रुद्र अवतार पाहून बिचकली, सॉरी सॉरी म्हणत पून्हा चालू लागली.

एका कड्यापाशी येऊन थांबली दोघं.आसमंत त्या दुधाळ प्रकाशाने भरून गेलेला. हवेतला गारवा धुंद पसरलेला आणि इतक्यात सखी नं त्याचा हात धरला.

इतक्या दिवसांचं मनात साचलेलं आज त्याला सांगायचंच असं तिचं पक्क ठरलं होतं.

ती एक पाय दुमडून खाली बसली आणि त्याला म्हणाली, सृजन i love u, will u marry me?

सृजन पाहतच राहिला, काय झालं नेमकं आत्ता?

हिनं, प्रपोज केलाय मला? 

तो तसाच ब्लँक उभा राहिला तिनं त्याच्या जवळ येत,त्याला बिलगत पुन्हा विचारलं. सांग ना, लग्न करशील माझ्याशी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अगदी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि प्रेमातच पडले. मी नाही तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकत आणि सृजन काही बोलणार इतक्यात तिनं त्याच्या गालवर ओठ टेकले.

सृजन नी तिला बाजूला केलं आणि तो तिला म्हणाला,

सखी, मी..

मी, तुला त्या नजरेनी नाही पाहिलं आणि हा काय पोरकट पणा आहे.

आता ब्लँक व्हायची वेळ सखी वर आली तिनं पाठमोऱ्या त्याला जाताना पाहिलं आणि तिला रडू आवरलं नाही. एका क्षणात त्या सुंदर कोजागिरीच्या चंद्राला जणू ग्रहण लागलं

सृजन ! अरे थांब ना, बोलशील कि नाही?

सखी ची आर्त हाक, पण तो त्याच्याच तंद्रीत पुढे चालत होता.

सखी आता एकटीच उरली होती. ते चांदणं, तो दुधाळ प्रकाश, ही शीतलता आता दाहक झाली होती. तिचे निळसर पाणीदार डोळे भरून आले. अन, क्षणात ते झरु लागले.

तिच्या मनात खोलवर काहीतरी तुटलं होतं.

सहन न होऊन ती तशीच तिथे बसून राहिली.

सखी. हे बघ, खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं ग. पण तू,

अरे! ही सखी कुठाय. इतका वेळ आपण एकटेच पुढे चालत आलोय आणि आता ही एकटचं बडबडतोय. हे लक्षात येऊन सृजन थांबला. मागे वळून पाहातो तर ती तिथच कड्यापाशी मान खाली घालून बसलेली दिसली.

सृजन धावतच तिच्यापाशी गेला.

तिला उठवत म्हणाला. अगं इथेच बसून राहिलीस, मी एकटाच बडबडत पुढे गेलो.

नाही, मला नाही यायचंय. जा तू, मुसमुसणारी सखी त्याच्या कडे नं पाहताच म्हणाली.

अगं, प्लीज रडू नकोस. तू खरच माझी खूप गोड़ मैत्रीण आहेस आणि तूला असं का वाटलं माझ्याबद्दल. मला अजून कळत नाहीये थोडासा वेळ दे ना. हे सगळं झेपायला, प्लीज चल, रात्र ही खूप झालीये. नाही, जा तू. प्लीज मला एकटं राहू दे.

नाहीये ना तुझ्या मनात माझ्याबद्दल काही, मग आता कशाला काळजी करतोयस? जा, आणि i m sorry. उगाच प्रपोज करून तुला दुखावलं.

त्यानी अनेक मिनतवाऱ्या करूनही ती ऐकेना.

शेवटी तो खाली वाकला आणि तिला तशीच उचलली. अरे, अरे, सोड. मी पडेन ना, सुज्या सोड रे.

सखी आता खाली उतरवण्यासाठी मिनवत होती, पण आता हा इरेला पेटला.

ऐकलं नाहीस ना, आता अशीच उचलून नेतो. म्हणत हळू हळू टेन्ट च्या दिशेनी चालू लागला. त्या धुंद वातावरणात त्यांना असं येताना पाहून निशू आणि निहाल ला जाम आनंद झाला. आयला, हा आणि चक्क हो म्हणाला. निशू तर सखी आणि सृजन च्या दिशेनी धावतच सुटली.

अरे, काय छुपा रुस्तुम निघालास रे. लगेच हो म्हणालास. माझ्या परीला. thank u, thank u soo much. सुज्या आणि त्यानी सखीला अलगद खाली उतरवलं. पण हिचे डोळे का असे रडल्यासारखे दिसतायत, म्हणत निशूनी तिला जवळ घेतलं. सखीचा बांध फुटला. पुन्हा हमसून हमसून रडायला लागली.

निशू आणि निहाल गोंधळली. पुन्हा एकदा सृजन काहीही नं सांगता तिथून निघून गेला आणि स्लीपिंग बॅग मधे जाऊनं झोपला.

सखी थोडी सावरली. तिनं घडलेल सगळं सांगितलं.

निहाल तिला म्हणाला, हे बघ सखी, शांत हो. आपल्याला कल्पना होती त्याच्या नकाराची,पण आता हे!

खूप मनाला लावून घेऊ नकोस. शेवटी त्याच्या मनातच नसेल तर तो काहीही केलं तरी या नात्याला स्वीकारणांर नाही.

अरे पण काहीच होप्स नाहीत का? ती अगदीच अगतिक झाली.

थोडी वाट पाहूया, त्याला वेळ दे. लगेच नको बोलायला.असं सांगून निहाल ही झोपायला निघून गेला.

निशू नी तिला जबरदस्ती स्लीपिंग बॅग मधे ओढलं आणि तिला हलकेच थोपटू लागली. ती निःशब्दता, नीरव शांतता. तिला अस्वस्थ करत होती.

सकाळी त्या दोघींनी परत जायचा निर्णय घेतला आणि मग, ह्यांनी ही प्लॅन रद्द केला. आता सगळे एका सुमो मधून परतीच्या प्रवासाला निघाले. गाडीत आधीच २ प्रवासी होते त्यामुळे, सखी आणि सृजन ला शेजारी बसाव लागलं आणि रात्री च्या जागरणामुळे ती पेंगुळली. सृजन नी अलगद पणे हात तिच्या माने मागे ठेवला आणि त्याच्या खांद्यावर ती निजून गेली. मधे चहासाठी गाडी थांबली आणि तिची झोप मोडली. बघते तर ती almost त्याच्या छातीवर डोकं ठेवून निजली होती आणि आता त्याला झोप लागलेली. तिनं ही अलगद त्याच्या मानेमागे हात दिला.

निशू मागून सगळं बघत होती. पण, सखीच असं गुंतणं तिला आवडत नव्हतं. तिनं खुणेनं तिला दटावलं पण ऐकेल ती सखी कुठली?

काही तासात ते परत पोचले. सगळे निहालच्या घरी आले. फ्रेश होऊन, लंच करूनच जा दोघी. म्हणत त्यानं त्याच्या कामवाल्या मावशींना स्वयंपाक करायला सांगितला.

सखी, तिला सृजन ची हाक आली. पण प्रतिसाद द्यावा तरी कसा हे नं कळून ती गप्पच राहिली.

सृजन जवळ आला. तशी ती सोफ्याच्या काठा कडे सरकली. तो शेजारी येऊन बसला. बोल ना गं, अजून राग नाही गेला का? बोल ना, त्याची आर्जव आता तिला बेचैन करत होती. पण निशूला वचन दिलं होतं.

अजिबात बोलणार नाही. होऊ दे कि त्याला ही त्रास. तस खुळं वय ते. प्रगल्भता कशी येणार? आता सुज्यानी तिला जवळ घेतलं आणि एखाद्या लहान मुलाला समजवतात तस बोलू लागला. ऐक ना, किती सुंदर नातं आहे. तुझं माझं मैत्रीचं. मला नाही ग ते गमवायचं आणि मला ह्या प्रेमाच्या भानगडीत पडायचच नाहीये.

तुला दुसरी कुणी आवडते का रे? तिचा भाबडा प्रश्न ऐकून त्याला हसूच आलं. नाही ग बाई, पण आता हा विषय बंद कायमचा. प्रत्येकाला एक भूतकाळ असतो आणि काही वेळा तो इतका गडद असतो कि तुम्हाला त्याला विसरता येत नाही.

असं काय घडलंय? सांग ना.आता मैत्रीण म्हणतोस ना. मग सांग कि, सखी नं पुन्हा त्याला छेडलं.

त्यानं रोखून तिला पाहिलं आणि चिडलेल्या स्वरात म्हणाला. कशाला पुन्हा पुन्हा त्रास देतीयेस? नकोय मला तुझी मैत्री सुद्धा, जातो मी.

त्याचं हे रूप पाहून ती जाम घाबरली.

आणि थांब, थांब म्हणत त्याच्या मागे धावली. पण तो लिफ्ट मधे शिरला आणि निघून गेला. ती पोचे पर्यंत दार बंद झालेलं. काय असेल याचा भूतकाळ? असा विचार करत मागे फिरली.


सृजन आज हॉस्टेल ला नं जाता घरी आला. आई नं तो अचानक आलेला बघून विचारलं, काय रे सगळं ठीक ना? तब्येत बरी आहे ना बाळा?

हो, त्यानं थंड प्रतिसाद दिला.

आई जवळ आली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. काय झालय मन्या. आई ला नाही सांगणार?

इतका वेळ मनात दाबून ठेवलेला हुंदका आता मात्र अनावर झाला.

आणि तो ओक्सबोक्शी रडू लागला.

आई, अगं काल रात्री मला सखी नं थेट लग्नासाठी विचारलं.

त्याला पुढे बोलवेना. आईला त्याची घालमेल कळत होती. त्याला सखी आवडते हे त्यानं कबूलही केलं होतं. पण त्याला तिला होकार कसा द्यायचा हेच उमगत नव्हतं.

आई काहीही नं बोलता त्याला थोपटत होती. शांत करत होती, आपण उद्या बोलूयात म्हणत ती त्याच्या साठी चहा करायला आत गेली.

तिनं ही पदराने डोळे टिपले.

सखी सारखी गोड़ मुलगी तिला ही सून म्हणून पसंत होती. पण, हा पण जीवघेणा होता केवळ स्वतः च्या मुलाच्या सुखाचा विचार करून ती एका मुलीच्या आयुष्याची माती नक्कीच करणार नव्हती.

तीने त्याला चहा आणि खायला दिलं. त्याची औषधं दिली आणि ती त्याच्या बाबांना फोन करायला आत गेली. सृजन ही फार काही नं बोलता त्याच्या समोरच्या फाईल कडे पाहात राहिला.

काय होता असा भूतकाळ, जो त्या मायलेकाला कुरतडत होता?

तब्बल 10 वर्षांपूर्वीची गोष्ट, एक दिवस अचानक श्रेया च्या पोटात दुखायला लागलं. तिला तातडीनं ऍडमिट केलं.खूप तपासण्या करून ही डॉक्टरांना काही कळेना, मग शाम आणि स्नेहा ह्या दाम्पत्यांनी थेट अमेरिका गाठली. गाठीशी असलेला सगळा पैसा पणाला लावला आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं.

श्रेयाच्या शरीरात पुरुषतत्व आहे आणि तिला गर्भाशय ही नाहीये. आता, म्हणजे ती नपुसंक आहे का, अशी शंका येऊन ती दोघे ही हादरली. पण नाही, ते ही सत्य नव्हतं. आता तिला ट्रान्सजेन्डर(लिंग प्रत्यारोपण) करावं लागणार होतं.

वयाची 10 वर्ष ती स्त्री म्हणून जगली पण आता तिचं रूपांतर शरीरानं पुरुषात होणार होतंआणि अस नं केल्यास तिच्या वाढी साठी ते अपायकारक ठरणार होतं.

अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि श्रेयाचा सृजन म्हणून पुनर्जन्म झाला. काही वेळा केवळ वैज्ञानिक गोष्टी घडतात तेव्हा त्या पेशंट च्या आणि नातेवाईक यांच्या मनोवैज्ञानिक पातळीवर किती उलथापालथ होते आणि झालेली गोष्ट पचवणं अजून अवघड होऊन बसत. सृजन च्या ही मनात आता नेमकी हीच खळबळ चालू होती. मला आवडलेली सखी ही विरुद्ध लिंगाची म्हणून आवडलीये कि मनानी मी अजून स्त्री आहे? आणि ती मला लेस्बियन म्हणून आवडतीये. भले आज 10 वर्ष तो पुरुष म्हणून जगत होता, पण पुरुष सुलभ भावना त्यांचं काय? त्या नक्की त्याच्या मनात, तनात उमटल्या होत्या का?

एकीकडे त्याला एक मुलगी आवडलीये हे ऐकून, आनंद मानायचा कि दुःख हेच त्याच्या जन्मदात्यांना ही कळलं नव्हतं.

सखीनं ठरवलं, काही दिवस कोकणात जाऊन यायचं घरी गेलो कि काही दिवस ह्या ताणातून आपण मोकळे होऊ. पण मग तिनं घरी न जाता तिच्या आजोळी गुहागर ला जायचं ठरवलं.आई ला, मामा ला कळवलं आणि त्याच संध्याकाळी ती गेली सुद्धा.

इकडे सृजन ही सैरभैर झालाय हे पाहून त्याच्या बाबांनी गुहागरची तिकीट ऑनलाईन बुक केली आणि त्याला मेल केली. अशा वेळी त्याला त्याचा बाबा खूप आवडायचा. त्याला न सांगता कळायचं. कि कोकण ट्रिप सृजन ला या ताणातून हलकं करेल. गुहागरला एका 3 स्टार हॉटेल मधे त्याची पुढच्या आठवड्यासाठी सोय केलेली होती. ड्राइवर आला आणि त्यानं फोन करून संध्याकाळीच निघून येतोय. अस हॉटेल ला कळवलं.

आता नियतीनं पुन्हा दोघांना समोर आणण्याचं दान टाकलं होतं.

काय होईल? हे प्रवासी एकत्र भेटतील? कि आपल्याच कोषात राहून परततील?


सखी मामाच्या घरी आणि सृजन ठरलेल्या हॉटेल मधे पोचले. हॉटेल विसावा.

नाव वाचताच त्याचं उद्विग्न मन जरा शांत झालं. हम्म आता इथे मिळेल निवांत विसावा. म्हणतं तो रूम मधे आला. फ्रेश होऊन त्यानं चहा मागवला आणि तो बाल्कनीतून समोरचा निसर्ग न्याहाळू लागला.


पुन्हा एकदा तेच विचार तीच गुडघ्यावर बसून प्रपोज करणारी सखी आणि आपण झिडकारलंय हे कळल्यावर हमसून हमसून रडणारी. माझी सखी. किती गोड़ दिसत होती. खरंतर मीच तिला विचारलं असतं.पण साला हा 'पण ' का नाही माझी पाठ सोडत आहे. जर तिला खरं कळलं. तरी ती मला स्वीकारेल? कि कायमची दुरावेल नकोय मला ती लांब जायला. निदान रोज बघतोय तरी. भेटतोय. ज्या काही पुसट स्पर्शाची देवाण घेवाण आहे ती ही संपेल.

स्पर्श मला तिचा स्पर्श हवाहवासा वाटतो पण म्हणजे नेमक काय होतं मला? आता ह्याच्या बद्दल कुणाशी बोलू आणि तो या विचारचक्रात असतानाच त्याच्या मोबाईल वर मेसेज टोन वाजला. अभि, अभ्या नी काय काम काढलंय. हा तर US ला आहे आणि आता काय काम? म्हणत त्याने मेसेज वाचला आणि लगेच त्याने अभि ला फोन लावला.

अभि: सुज्या लेका, विसरलास का?

सुज्या: नाही रे, पण आज कशी आठवण आली?


अभि: खूप महत्वाचं काम आहे. माझा एक रिसर्च पेपर आलाय आणि तो तुला पाठवलाय. वाच नक्की आणि तुझं मत कळव. आजच, प्लीज.कारण उद्या फायनल सबमिशन आहे.

ओक्के, म्हणत सुज्यानी मेल उघडला.

विषय- ट्रान्सजेन्डर री हॅब इन सोसायटी.

पुनर्वसन,ते ही माझ्या सारख्यांच.

तो आता अधाशासारखं वाचू लागला.अमेरिकेत म्हणे जसं लेस्बियन. होमो ला कायदेशीर मान्यता मिळाली तशीच तजवीज आता ट्रान्सजेन्डर साठी करण्यात येणार आहे. त्यांना कायद्यानी लग्न आणि दत्तक मूल घेण्याचा अधिकार मिळणार आहे.

ही खूपच आनंदाची बाब होती.पण तरीही. सखी ला माझं जे अस्तित्व आहे ते मान्य होईल? मला तिच्या पासून लपवून तिला मिळवायचं नाहीये. त्याची ही विचार शृंखला गुंफत गेली आणि इतक्यात सखी चा कॉल आला.एक मिस कॉल ही झाला. मग पुन्हा कॉल.

Hii काय रे? इतका वेळ फोन उचलायला? सखी नेहमीच्याच उत्साहात

ही इतकी नॉर्मल कशी झाली? इतक्या लवकर?

"अरे बोलणार आहेस ना माझ्याशी?

सॉरी यार, मीच समजून नाही घेतलं.उगाच 100 प्रश्न विचारत बसले पण, आपली मैत्री मात्र अबाधित ठेव बाबा रुसू नकोस. ऐक ना. मी मामा कडे आलीये so मी नाहीये मुंबईत.आले कि कॉल करते. बाय आणि हो. सॉरी परत एकदा. प्लीज माफ केलंस ना.

ह्याच उत्तर हम्म्म्म.

सखी ला ह्या अशा वागण्याची सवय होती. त्यामुळे तिनं ही विषय नं ताणता फोन कट केला.

सखी मुंबईत नाहीये पण मग आहे कुठे?

जाऊदे मी आता विचारत नाही. नंतर बोलीन तिच्याशी. पण आधी अभ्याशी बोलूयात.

त्यानं पुन्हा कॉल केला. पण बोलणं जुजबीच झालं. निवांत बोलतो म्हणत अभ्यानी कॉल बंद केला.

आता स्वारी भटकायला बाहेर पडली. संधिप्रकाश.

आणि सुरेख रंगांनी नटलेलं आकाश. तो किनाऱ्यावर पोचला. सूर्यास्त अहाहा. असा हा तेजाचा गोळा सागराच्या पोटात लुप्त होतो आणि मग तिमिर साम्राज्य अशा वेळी मन का कातर होतं. सखी, सखी आणि तिचेच विचार मनाभोवती पिंगा घालत होते. किती तरी वेळ तो तसाच बसून राहिला. त्या अथांग सागराकडे पाहात.

इथे त्याला कॉल करूनही ही अस्वस्थच होती. वर वर कितीही आनंदी नॉर्मल आहोत अस भासवत राहिली तरी आतून पार खचली होती. आत्ता तो समोर यावा. अन म्हणावं त्यानं. हो सखी मी तुझाच आहे कायमचा. पण छे त्यानं तर स्वतः हून हे ही नाही सांगितलं कि तो मुंबई बाहेर आहे. कुठे गेलाय कुणास ठाऊक.

आजी नी सखीला बोलावलं आणि तयार व्हायला सांगितलं. त्यांना एका नातेवाईकां कडे जायचं होतं.

योगायोग असा कि ते नातेवाईक म्हणजे हॉटेल विसावा चे मालक, विशाल पेंडसे होते. आता त्यांनी हा व्यवसाय त्यांच्या मुलाला नील ला द्यायचं ठरवलं होतं आणि त्याचं संदर्भात एक छोटीशी पार्टी ठरवली होती. हॉटेलच्या टेरेस वर.

सखी छान दिसत होती. गुलाबी रंगाचा पंजाबी आणि लाल ओढणी जाळीदार. मोकळे सोनेरी केस. हलका मेकअप. मुळातच ती किती सुंदर होती. आजी तिची दृष्ट काढत म्हणाली. जातीच्या सौंदर्याला काहीही खुलून दिसतं. चल निघूया?

आजी मामा मामी आणि सखी हॉटेल वर पोचले.

बऱ्यापैकी गर्दी होती नील सगळ्यांचं स्वागत करत होता.

सखी ला पाहून तर त्याची विकेटच पडली. आणि पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. नील अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्यानं लगेचच हे वडिलांना सांगून टाकलं आणि आज कार्यक्रम संपला कि तिला मागणी घालायची हे मनोमन ठरवून ही टाकलं.

इकडे सृजन रूम वर आला. आत येताच हाऊस कीपिंग वाला त्याला पार्टी साठी बोलवायला आला. पण सृजन ते टाळलं आणि जेवण रूम वर मागवलं.

सखी सगळ्यांशी हसून बोलत होती. मिसळत होती पण कुठेतरी ती तिचा एकटेपणा लपवायचा प्रयत्न करत होती. आपले एक गेस्ट जेवायला पार्टीत येणार नाहीयेत असा निरोप नील ला मिळाला आणि तो स्वतः सृजन ला बोलवायला खाली आला. आता त्याचा आग्रह मोडायचा नाही म्हणून सृजन ही तयार झाला आणि वर आला. एक टेरेस चा कोपरा त्यानं हेरला आणि तो त्या दिशेनी निघाला इतक्यात तिथे लाईट गेले आणि त्याचा कुणाला तरी धक्का लागला. ती व्यक्ति धडपडली आणि त्यानं सावरलं इतक्यात जनरेटर सुरु झाला आणि दिवे लागले

त्या प्रकाशात ती व्यक्ती त्याच्या मिठीत होती.

अर्थात, आपली सखीचं होती. त्याला वाटलं भास झालाय आणि तिची गत ही तीच होती. त्यामुळे काही क्षण असेच गेले आणि मग नील पुढे आला.सखी ला अलगद बाजूला करत म्हणाला. अगं लागलं नाही ना तुला कुठं? सॉरी सर एन्जॉय द पार्टी आजी आणि मामा समोर त्याला ओळख दाखवणं तिला अवघड होतं आणि हा कोण टिकोजीराव ज्यानं माझ्या सखीला माझ्या पासून लांब केलं म्हणत सुज्या चरफडला आणि रागानी निघून गेला सखी हळूच सटकली आणि सुज्या च्या रूम बाहेर आली. तिनं नॉक केलं आणि दार उघडताच ती पटकन आत शिरली.

तिनं दार लावून घेतलं आणि सुज्याला घट्ट मिठीच मारली. तिच्या या अनपेक्षित कृतीनं तो आधी बावचळला. पण सखी मिठीत होती आणि ह्या क्षणांनी मात्र जादू केली. त्यानं ही मिठीत तिला घेत तिच्या मानेवर किस केलं. रोमांचित झालेली ती दोघ त्या धुंदीत. त्या आवेगांनी वेढली गेली. त्यांचं पहिलं चुंबन आणि अचानक तो बाजूला झाला. चेहरा लपवून बाजूला गेला. सखी नं मागून येऊन मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यानं नाकारलं, ती ही रडवेली झाली ती जायला वळली आणि त्यानं हात धरून थांबवलं. सखी, कधी तरी तुला हे सांगणार होतो. पण आज सांगतो बस. ती बसली, तो तिच्या पायाशी बसला त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला मी ट्रान्सजेन्डर मुळे पुरुष झालोय. मूळ मी स्त्री होतो. मग त्याचा सगळा भूतकाळ त्यानं तिच्या समोर मांडला. आधी ती हे ऐकून चक्रावून गेली पण हळू हळू तिला परिस्थितीच भान आलं.

ती गप्प झाली. आणि मग काहीही न बोलता तिथून निघून गेली.

आज सगळं सांगितल्यामुळे त्याला एक शांतता मिळाली होती पण तीच्या मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती.

काय निर्णय घेईल सखी? समजून घेईल कि नाकारेल त्याला?


ती पुन्हा पार्टीत परतली आणि आजी जवळ डिश घेऊन उभी राहिली. पार्टी आता रंगत होती आणि अचानक नील आणि त्याचे आई बाबा समोरे आले. आजी मामा मामी ह्यांची जुजबी चौकशी सखी अन नील ची ओळखपरेड झाली आणि नील च्या बाबांनी आजी कडे सखीला मागणी घातली. सखी तिच्याच विचारात. तिला ऐकू ही आलं नाही. मामा नी सखी ला हाक मारली अगं ! लक्ष कुठाय?अं, हो. काय मामा? म्हणत ती गोंधळून बघू लागली. अगं नील चे बाबा म्हणतायत.आमची सून होशील का? काय? आत्ता मी काय बोलू? सॉरी काका. पण माझं शिक्षण चालू आहे आणि हा निर्णय असा कसा घेऊ आई बाबांशी पण काहीच बोलणं नाही झालंय ना. प्लीज मी नंतर कळवते.

सगळं एका दमात बोलून ती घाईनं निघून गेली आणि इथेच सगळ्यांना ती लाजून पळाली अस वाटून पुढची बोलणी करायला येतो. असा पेंडसेंनी सखीच्या वडिलांसाठी निरोप दिला. मामा आणि आजी जाम खुष होते. पोरीनं नाव काढलं. चांगलं सासर मिळालं. पण मामी ला मात्र काहीतरी गोम आहे असा संशय आला. सगळे घरी परतले. सखी ला निशूचे ५ मिस कॉल दिसले. तिनं कॉल लावला. निशू आधीच जाम चिडलेली त्यात हा सगळा घडला प्रसंग ऐकून वैतागलीच. ताबडतोब निघून ये म्हणाली. सखी न ही तीच ऐकलं आणि ऑनलाईन बस तिकीट बुक करून मगच आजीला सांगितलं. मी उद्याच जातीये. कॉलेज मधे महत्वाची परीक्षा आहे आणि तिचं वेळापत्रक आलय.फार खोलात न शिरता तिला परवानगी मिळाली.

इकडे सुज्याला ही चैन पडेना. त्यानी ही झाला प्रकार आईला कळवला आणि तो ही दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं म्हणून लवकर झोपला. आता सकाळी 6ची बस तिनं गाठली आणि सुज्या कार नी निघून गेला. तिला कॉल मेसेज करायचं धाडस त्याच्यात नव्हतं आणि त्याला काय वाटत असेल या विचारात तिनं ही कळवलं नाही.

इकडे पोचल्यावर अभि चा पुन्हा कॉल आला आणि सृजन नी त्याला सविस्तर मेल करतो सांगत वेळ मारून नेली. आता त्याला हे अभि शी बोलाव त्याला सांगावं असं वाटू लागलं. अभि, अभिजित हर्षे, एक दिलखुलास माणूस. अमेरिकेत गेली ७ वर्ष राहूनही मनानी मात्र मुंबईत रमणारा. प्रचंड लोकसंग्रह आणि माणसं वाचायचा छंद. खूपच जॉली आणि म्हणूनच कायम मैत्रिणींच्या गराड्यात. एक सहवेदना जपणारा समंजस मित्र. सृजन ला 4 वर्ष सिनियर आणि 12 वी नंतर अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणारा त्याचा शाळा मित्र. खरंतर शेजारी होता त्याचा. पण एकाच शाळेतही एकत्र जाण येणं. म्हणून मग ती मैत्री जास्त घट्ट. सुज्या साठी सदैव तत्पर असलेला.सुज्याचा एकमेव बेस्ट फ्रेंड् हा तसा निमगोरा. पिंगट डोळ्यांचा. फ्रेंच कट ठेवणारा आणि मुळात व्यायामाची आवड असणारा. त्यामुळेचं बॉडी बिल्डर सारखी पिळदार देहयष्टी होती.

सुज्या नी मेल पाठवली रात्री आणि इकडे. अभि ची गुड मॉर्निंग सुरु झाली. मेल मधे त्याने ट्रान्सजेन्डर विषयी बरेच प्रश्न विचारले होते.उदा. त्यांना पुरुषतत्व तयार होताना होणारे त्रास आजार काही व्यायाम आणि आहारातले बदल?

आणि मुळात प्रजनन क्षमता ह्यावर काही उपाय योजना?

अभि ह्या प्रश्नानी जरा सावध झाला. सुज्या हे का विचारतोय?

म्हणजे नेमकं हेच का जाणून घ्यायचय ह्याला? बच्चम जी दाल में कुछ काला हैं म्हणत त्यानं एकेक प्रश्नाला उत्तर लिहायला सुरुवात केली सृजन च्या केस मधे त्याला शारीरिक सुख देता येणार होतं पण प्रजनन शक्य नव्हतं. पण हे सगळं अभि त्याला मेल वर न लिहिता. प्रत्यक्ष भेटूनच बोलू. म्हणत त्यानं मेल delete केली आणि त्याची परीक्षा संपली कि तो लगेच भारतात येतोय असा मेसेज सुज्याला टाकला. आता 2 आठवड्यात तो परतणार होता.इकडे भारतात अभि च विमान उतरलं आणि तिकडे

निशू ला तिच्या आत्या कडे सिंगापूरला जावं लागणार होतं. तिच्या आत्याला आता नातवंड होणार होतं आणि निशू आत्या होणार होती. म्हणून मग आत्यानी निशूला बोलावून घेतलं आणि सखी तिला सोडायला एअरपोर्ट ला आली.

सखीला एअरपोर्ट वरून बाहेर पडत कॅब मधे बसताना पाहून अभि नं ही ड्राइव्हर ला गाडी तिच्या मागे घ्यायला सांगितली.

अभि आणि सखी एकमेकांना ओळखत नव्हते. पण सखी होतीच इतकी रेखीव आणि मोहक कि अभि ला ही तिची भुरळ पडली.वेळ होताच हातात.मग पत्ता काढायला काय हरकत आहे असा विचार करून तो तिचा पाठलाग करू लागला.

आता सखी. सुज्यापासून शरीरानं आणि काहीशी मनानं ही लांब गेली होती. मधल्या काळात त्यांनी एकमेकांना कुठलाच संपर्क केला नाही. पण सखीनं आता ट्रान्सजेंडर विषयी माहिती काढायला सुरुवात केली. मुंबईत अशा काही केसेस रजिस्टर आहेत का? कुठल्या हॉस्पिटल मधे ही सर्जरी होते. हा डेटा गोळा करायला सुरुवात केली. सुज्या मात्र तिच्या विरहात झुरत होता. आता निशू ही नव्हती तिचे अपडेटस कळवायला.

आज रेडिओ वर जुन्या मराठी गाण्यांची मैफल लागली होती.

दिवसामागून दिवस चालले. ऋतू मागुनी ऋतू.

कधी रे येशील. तू जिवलगा कधी रे येशील तू

आज एकाच वेळी हे गाणं चार जीव ऐकत होते आणि गुणगुणत ही होते आपापल्या जिवलगा साठी.


सृजन, सखी साठी.

सखी, सृजन साठी

नील आणि अभि सखी साठी.


काय होईल जेव्हा अभि ला कळेल सृजन सखीत गुंतलाय

आणि सृजन ला कळेल सखी अभ्याला आवडलीये

कोण बाजी मारणार? अन मुळात सखी काय निर्णय घेणार?



अभि ने घर पाहून ठेवलं होतं सखीच. आज त्यानं गुलाब ही पाठवले मग टेडी आणि मग एक ग्रीटिंग कार्ड.

नाव : your Admirer


सखी ला खात्रीच पटली, हा सुज्या असणार. ती ही आनंदली. पण, पण ते ट्रान्सजेन्डर. विषयी अजून माहिती काढायला हवी. असा विचार करून गप्प राहिली. एव्हाना निशू परतली. ह्यासगळ्यात 2 आठवडे उलटले आणि आल्यावर तिला सृजन कडून सगळं कळलं. अगदी हे सुद्धा कि सखी सध्या त्याच्याशी बोलत नाहीये.

अभि मात्र आस लावून बसला होता. योग्य संधीची आणि ती त्याला आयतीच मिळाली

सृजन आणि तो मॉल मधे गेले होते समोर सखी अन निशू सुज्या त्यांच्यापाशी गेला आणि निशूनी त्यांच्यात पॅचअप व्हावं म्हणून एक पार्टी ठरवली अगदी छोटेखानी. तिनं सृजन ला ही सांगितलं कि तुझ्या भावा ला घेऊन ये इकडे अभि खुश. सखी भेटणार म्हणून आणि तिकडे सखी. रममाण. तिला सुज्या भेटणार म्हणून.

सुज्या आणि अभि आता संध्याकाळची वाट पाहात होते.

एवढतात बेल वाजली. शेजारच्या काकू घाईत आत आल्या आणि सुज्या ला घेऊन गेल्या. त्यांचे सासरे घरीच पडले होते आणि तातडीनं त्यांना हॉस्पिटल मधे न्यायचं होतं. अभि घरातच झोपला होता म्हणून त्याला न उठवता सुज्या एकटाच गेला आणि त्यानं निशूला उशीरा येतो असं कळवून टाकलं.

अभिला लोकेशन पाठवून टाकलं आणि मी थेट येतो असा मेसेज ही टाकला.

अभि मस्त तयार होऊन निघाला आणि जाताना शॅम्पेन आणि चॉकलेट्स घेऊन गेला. अमेरिकेत राहून हे त्याच्या साठी नेहमीचंच होतं पण सखी ला मात्र खूप अप्रूप वाटलं.

तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिला इंप्रेस करता यावं म्हणून मग त्यानं त्याच्या शोध निबंधाविषयी बोलायला सुरुवात केली निहालशी आणि सखीच्या कानावर गप्पांमधला एक शब्द कानावर पडला,ट्रान्सजेन्डर. तिनं कान टवकारले.त्यानं खूपच सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली तशी निशू आणि सखी ही येऊन बसल्या. मुळात ट्रान्सजेन्डर म्हणजे काय? त्या बाबतची शस्त्रक्रिया.त्यासाठी सध्या अमेरिकेत काय चालू आहे आणि अशा किती केसेस वर त्यानं काम केलय इत्यादी

तिनं ही काही जुजबी माहिती विचारली एकंदरीत तिच्यावर त्याची छाप पडली होती अभि ही देखणाच होता.

निघताना ती याला सोडायला खाली आली आणि त्यानी सहज विचारलं टेडी गिफ्ट्स आणि गुलाब आवडले का? हो तर. म्हणत ती हसली तिच्या डोक्यात अजून ही हे सुज्यानीच पाठवले असणार आणि अभि त्याच्या बरोबर राहतोय म्हणजे त्याला माहिती असणार हा विचार.

पुन्हा दोघ विलग झाली आणि तिनं सुज्या ला कॉल लावला पण हॉस्पिटल च्या गडबडीत त्याच्या फोनची बॅटरी च संपली. सतत स्विच ऑफ ऐकून ती निघून गेली. गप्पा इतक्या रंगल्या होत्या कि सखीचा नंबर अभि न मागून घेतला आणि पोचल्या वर मेसेज केला. आजची पार्टी छान झाली आणि तुझ्यासारखी एक गोड़ मैत्रीण मिळाली गूड नाईट.

तिनं ही थँक यु. गुड नाईट चा रिप्लाय केला. आता उद्याच सुज्याशी बोलायचं अस ठरवत ती बाकीच्या आवरा आवरी साठी किचन मध्ये आली. निशू आणि ती आवरत असतानाच पुन्हा मेसेज. काय ग अजून जागी आहेस का.गप्पा मारायला वेळ आहे का?

तिला ही अभि ची कंपनी आवडली होती.

हो बोल ना. आवरतोय.

मग येऊ का मदतीला?

हो ये कि.

मग एक कप कॉफी मिळेल?

नक्कीच.

आलोच.

चल रे उगाच नको खेचू .

बघ खरंच आलो तर

येच बघूया..

आणि डोअर बेल वाजली. आत्ता कोण असेल ग? म्हणत सखी दार उघडते. आणि समोर अभि !

अभि !!!! अगं निशू हा खरंच आलाय. काय रे. घरी गेलाच नाहीस का?

नाही. पार्किंग मधेच होतो.म्हटलं गप्पा माराव्यात नव्या नव्या सखीशी. सखी ही भुलली ह्या दिलखुलास स्वभावाला.तस ही आकर्षण हे सगळ्यात परमोच्च क्षणी असत. या वयात त्यात अभि सारखा हुशार देखणा मित्र सतत आपल्याला attention देतोय आणि नेमका ह्याच वेळी आपल्या मनातला हिरो जरा साइड ट्रॅक वर गेला कि काहीही घडू शकत.

आता अभि चा परतायचा दिवस ठरला आणि मधल्या काळात सखी आणि सृजन यांच्या गाठीभेटी होऊच शकल्या नाहीत. सतत अभि मात्र सखी भोवती राहत होता. पण सृजन ला त्यानं सखी बद्दलच्या भावना नाही सांगितल्या.

अभि ने सुज्या ला ही अमेरिकेत यायला तयार केलं आणि आता महिनाभर तो सखी पासून दूर जाणार होता.

निघताना सखी आवर्जून एअरपोर्ट ला भेटायला गेली. सुज्या चे आई बाबा असल्या मुळे तिनं लांबूनच बाय केलं दोघांना. पण जसं त्यांनी बोर्ड केलं. एक मेसेज.

अभि चा. thank you soo much dear.

An airport has witnessed a most lovely kisses and hugs but let me add and lovely tears too!!!

किती छान लिहितो हा.

सुज्या ला का नाही सुचतं. नकळत तिच्या मनात आता सुज्या आणि अभि ची तुलना होऊ लागली.

आणि हाच क्षण खूप जपायचा असतो.

तिकडे पोचल्यावर आधी अभि नी मेसेज केला पोचलो ग. मग सुज्या. नंतर पुन्हा सुज्या ऑफलाईन पण अभ्या कायम ऑनलाइन.

असेच काही दिवस गेले सखी अभि मैत्री अजून दृढ होतं गेली.एकी कडे ट्रान्सजेन्डर ते पुरुष हा प्रवास सृजन पर करत होता. बॉडी बिल्डिंग. जिम.आहार आणि पुरुष मानसिकता ह्या सगळ्याच गोष्टी आत्मसात करत होता. फक्त सखी साठी आणि तिच्या साठी ही तयारी तिला दूर ठेवत करत होता सखी मनानं अभि कडे झुकत चालली होती.

आणि एक दिवस नील चा फोन आला सखी मी नील.आपण गुहागर ला भेटलो होतो. मी मुंबईत आलोय आणि तुझ्याच बिल्डिंग खाली तुला पिक अप करयला आलोय माझ्या मुंबईच्या हॉटेल च ओपनिंग आहे आणि तुझे सगळे नातेवाईक तुझी वाट बघतायत कसं वाटलं सरप्राईज?

अभि कडे झुकणार मन. नीलचा घरच्यांमुळे समोर आलेला पर्याय आणि मनात खोलवर रुतलेला सृजन

आता नेमकं काय घडेल? सखी अभि ला निवडेल कि?? अजून कुणाला??


सृजन आणि अभि आज एका पार्टी साठी आले होते. विशेष म्हणजे या पार्टीत सगळ्यात जास्त ट्रान्सजेन्डर पब्लिक होतं. ज्या मुळे सुज्या खूपच मोकळेपणानी वावरात होता. त्याला ह्या नव्या मित्रांबरोबर खूपच मोकळं वाटत होतं. राहून राहून सखीची जाम आठवण येत होती.

इकडे सखीला निल बरोबर जाण्याशिवाय पर्याय च नव्हता.

ती निल च्या कार्यक्रमात पोचली खरी पण मन अजूनही सुज्याच्या आठवणीत रमलं होतं तर मधेच अभि आठवून तिला वेगळ्याच एका नात्याबद्दल आकर्षण वाटत होतं ती मैत्री. ती आपुलकी ही तिला हवीहवीशी वाटत होती.आज सगळेच जण नीलच्या यशस्वी करिअर बद्दल भरभरून बोलत होते.अगदी कमी काळात त्यानं स्वतः च असं स्थान निर्माण केलं होतं हॉटेल व्यवसायात. त्याचे बरेच मित्र मैत्रिणीही आले होते आणि सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या ह्या जोडीवर आणि नील च्या आणि सखीच्या बाबांनी एक घोषणा केली नील सखी साखरपुड्याची सखी हबकली. हे काय आक्रीत. मला न विचारताच परस्पर कसं ठरवलं ह्यांनी. ती चिडली. पण इतक्या लोकांसमोर ती घरच्यांना उघडपणे विरोध नाही करू शकली.

साखरपुडा 1 महिन्यानी होता आणि ती आता लवकरात लवकर तिच्या आईबाबांशी सुज्या बद्दल बोलणार होती.

इकडे तिच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या सुज्यानी चक्क इतकी दारू प्यायली कि त्याला तोल ही सावरता येईना.अभि त्याला घेऊन रूम वर आला आणि नशेत सुज्या बरळत राहिला. त्याचं सखीला मिस करणं तिनं प्रोपोज करूनही नकार देणं. मग पुन्हा गुहागर भेट. अन पुन्हा तिच्या जवळ जाण. सगळं सगळं त्यानी अभिला नशेत सांगून टाकलं.

इतकं प्रेम करतो हा आणि पठ्ठ्या कधी बोललाच नाही. पण हिरो अब मेरी बारी हरकत नाही.

दोस्ती aahe तुझ्याशी आणि सखी नंतर आलीये आयुष्यात. असं स्वतः शीच बडबडत अभि सखीचे फोटो बघत राहिला. त्यानं एक निर्णय घेतला.

आणि सखी ला मेसेज केला.

Hii princess ! कशी आहेस. कित्ती मेसेज फोन केले. बाईसाहेब. रिप्लाय द्या कि

तेरा दिलवाला दोस्त.

नाम तो सुना ही होगा.अभि

आणि तो झोपायला निघून गेला. सखी ही चिडल्यामुळे घरी आल्यावर सरळ आई बाबांच्या खोलीत गेली.

आणि खूप तणतणत म्हणाली का परस्पर निर्णय घेतलात? माझं शिक्षण व्हायचंय करिअर व्हायचंय

नाही करणार मी लग्नबिग्न

आईनं विचारलं का ग? कुणी दुसरं आहे कि काय मनात?आणि असेल तर खुळ काढ नील तुझ्यासाठी उत्तम आहे आणि लगेच नाही लंग्न लावत आहोत फक्त साखरपुडा करतोय

पण मला तो ही नाही करायचाय प्लीज बाबा. ऐका ना.

आता बाबा काही बोलू नयेत म्हणून आईनेच सूत्र हाती घेतली आणि सखी ला ठाम पणे म्हणाली हे लग्न होणार आणि आम्ही तुझं भलचं करतोय आता वाद विकोपाला गेला आणि सखी न स्वतः ला कोंडून घेतलं.

आई बाबा समजावत राहिले पण जो वर त्यांनी निलच्या घरी फोन करून सध्या हा साखरपुडा रद्द करूयात असं कळवलं नाही तो वर दारच उघडलं नाही.

आता सखीचा निर्णय ठाम होता. फक्त शिक्षण आणि करिअर. तिनं ज्वेलरी डीझायनिंग चा कोर्स केला होता. कॉलेज करता करता. पण आता ती एका NGO ला ही जॉइन करणार होती. ती तोच विचार करत निजली.

सकाळी अभि चा मेसेज वाचून ती पुन्हा विचारात अडकली आणि रिप्लाय म्हणून फक्त हम्म्म्म लिहून पाठवला.

अभि आणि सुज्या ह्यांना एका जॉईंट कार्यक्रमासाठी आमंत्रण आल. खूप मोठी संधि होती. दोघांसाठी. काही मानसिक तर काही शारीरिक पातळीवरच्या स्पर्धा घेतल्या जाणार होत्या. ट्रान्सजेन्डर साठी आणि ही स्पर्धा अमेरिकेतल्या एका मोठ्या NGO नी ठरवली होती.

अभि नी सुज्या ला स्पर्धेत उतरायला तयार केलं

आणि पुन्हा सुज्याच येणं लांबल

स्पर्धा काहीशी ironman प्रकारातली होती जेणे करून ह्या अशा पद्धतिने ट्रान्सजेन्डर झालेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल. आता ही स्पर्धा होती 3 महिन्यांनी आणि तयारी साठी सुज्या ला एक कोच नेमला मुळातच ऍथलेट असलेल्या सुज्यानी खूपच उत्तम प्रगती केली.

इकडे सखीन निल ला भेटून तिच्या भविष्यातल्या योजनांबद्दल सांगितलं आणि हे ही कबूल केल कि तिचं सृजन वर प्रेम आहे आणि सध्या तरी ती शिक्षण आणि करिअरलाच महत्व देणार आहे तिचा ठाम निर्णय ऐकून मनावर दगड ठेवून नील नी माघार घ्यायचा निर्णय घेतला. पण अद्याप त्यानं तो विचार सखी ला सांगितला नाही. त्याला अजूनही वाटत होतं. कि ती त्यालाच मिळणार.

सखीनं ज्या NGO त काम करायला सुरुवात केली त्यांच्या कडून 4 स्वयंसेवक अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी जाणार होते. अर्थात ती नव्यानेच जॉइन झालेली असल्यामुळे ह्यात सखीच नाव न्हवतं.

तिला फारच वाईट वाटलं. आयती संधी हुकली.सुज्या ला भेटायची नकारण तिचे बाबा काही तिला इतके पैसे मोजून पाठवणार नव्हते.

सखी आणि सुज्यची भेट होईल? निल चा निर्णय तक बदलेल? आणि अभि..त्यानं नक्की काय ठरवलंय?


स्पर्धा आता जवळ यायला लागली होती आणि त्याची तयारीही जोरात चालू होती. तरीही काहीतरी कमी पडतंय असं सुज्याला सतत वाटत होतं आणि ती कमतरता होती सपोर्ट ची. सखी हवी होती त्याला आत्ता त्याच्याबरोबर पण सखीला कसं आणणार इथे?? सृजनच स्वगत नकळत त्याच्या डायरीत उमटलं आणि त्याच्या सराव पूर्वी तो ती डायरी टेबलवर विसरून गेला जेव्हा अभी घरात आला त्याने सहज डायरी चाळली. त्यानी सखी आणि निशू साठी तिकीट बुक करायला घेतली सखीचा पासपोर्ट नुकताच आला होता.तिला NGO कडून जायला मिळेल अशी वेडी आशा होती आणि म्हणूनच तात्काळ मधे पासपोर्ट काढला होता. त्यानं तिकीटस निशू ला मेल केली.

आणि व्हीजा साठी इन्व्हिटेशन पाठवलं. तिथे त्याने निशू ला फोन करून सुजा च्या मनातलं सांगितलं आणि सखी इथे हवी आहे याचीही कल्पना दिली. लगोलग निशु कामाला लागली. ती जामच उत्साहात होती. फायनली तिच्या लाडक्या मैत्रिणीची लव्ह स्टोरी मार्गी लागताना दिसत होती. पण मोठी अडचण होती. आई बाबा. सखीचे! काय आणि कसं सांगावं. तिनं पटकन आईला फोन केला. सखी सुज्या ह्यांच्या बद्दल ती आईशी बोलली आणि मग आईच्या मदतीनं तिनं सखीच्या आई बाबांच मन वळवायचं ठरवलं.आता तिने सखीच्या आई बाबांना फोन केला आणि सखीला तिच्याच NGO च्या इव्हेंट साठी पाठवायची परवानगी मिळवली तसच सोबतीला निशूललाही पाठवतोय असं सांगितलं. बऱ्याच प्रयत्नानंतर ते तयार झाले.तस ही त्यांना सखीच्या आनंदापुढे काहीच महत्वाचं नव्हतं.त्यात कोंडून घेणं प्रकरण ताजचं होतं.

आता काहीच आठवड्यात सुज्या भेटणार म्हणून सखी खुश होती. फक्त अट एकच. सुज्या ला सांगायचं नाही आणि मन मारून ती कबूल झाली. व्हिजा. तयारी शॉपिंग ह्यात दिवस कसे गेले कळलंच नाही.

आणि तो दिवस उगवला निशू आणि सखी ला सोडायला निशुची आई आणि सखी चे आई बाबा आले होते. इव्हेंट फक्त 4 दिवसाचा होता. त्यामुळे 10 दिवसाच्या शॉर्ट ट्रीपचीच परवानगी मिळाली होती.

मधल्या काळात सुज्याचा फिजिकल आणि मेंटल फिटनेस उत्तम वाढला होता. त्याचे विचार.मानसिकता आता पुरुष तत्वात पक्की मुरत होती. त्याचा न्यूनगंड ही कमी झाला होता.बऱ्याच थेरपीज मुळे आता त्याचं त्यालाच जाणवत होतं. कि तो सखी कडे एक पुरुष म्हणूनच आकर्षित झालाय. आणि ती त्याला त्याची जोडीदार म्हणून हवीये. आयुष्यभरासाठी.पण आता त्याला तिला पटवून द्यायचं होतं त्याच प्रेम.

मधल्या काळात Ngo बरोबर काम केल्यामुळे सखीला ट्रान्सजेन्डर बद्दल बरीच शास्त्रोक्त माहिती मिळाली होती आणि सृजन ला तिनं मनोमन स्वीकारलं होतं.

सखी आणि निशू एअरपोर्ट ला पोचल्या ठरल्याप्रमाणे अभि त्यांना घ्यायला आला होता ते थेट इव्हेंट च्या ठिकाणीच मुक्काम करणार होते.

सृजन च्या रूम मधे तो एकटाच बसला होता अभि चा फोन आला चल जरा बाहेर ये एक सरप्राईज आहे त्यानं रूम चा दरवाजा उघडला आणि समोर सखी. हातात गुलाबांचा बुके घेऊन. खूप सहज समोर आली ती. डेनिम डार्क ब्लु जीन्स. ब्लॅक लेदर जॅकेट. फिरंगी अप्सरा जणु सुज्या ब्लँक. नक्की हीच आलीये कि आपण स्वप्न बघतोय. बेस्ट ऑफ लक!! सखी नं हात पुढे केला. उं हमम हो म्हणत त्यानं ही हात हातात घेतला पण 10 सेकंद होउनही हात सोडत नव्हता. निशू नी मग हात पुढे केला आणि मधेच म्हणाली अरे मला पण wish करायचंय. सखी झालं का तुझं? सखी गोड लाजली. अलगद हात सोडवत मागे झाली. या क्षणी सुज्या ला निशूचा जरा रागच आला होता. पण निशू नसती तर सखी ही आज इथे येऊ शकली नसती. हे जाणवून त्यानं जरा रागाला आवर घातला.

निहाल?? तो कुठाय? का नाही आला?

अरे तो त्याच्या कामासाठी हैद्राबाद ला गेलाय. पण त्यानं ही तुला best wishes दिल्या आहेत. उद्या करेल तो फोन.

मग सगळेच रेस्तरॉ मधे आले सखी आल्यामुळे सुज्या प्रचंड खुश होता.आजवरच्या सगळ्या इथल्या गोष्टी तो तिला डिटेल मधे सांगत होता.

त्याची अंगकाठी ही सुधारली होती आणि तो जाणवण्या इतपत masculine दिसत होता. एक रुबाबदार. राजबिंडा सृजन. तिच्याच काय. तमाम पोरींच्या स्वप्नातला राजकुमारच जणु! आता जरा आराम करा म्हणत अभिनं त्या दोघींना त्यांच्या रूम मधे पिटाळलं आणि स्वतः सृजन च्या बरोबर वॉक साठी बाहेर आला.

त्यानं थेट विचारल.सुज्या सखी आवडते तुला?

हो,मग बोलला का नाहीस आधी? मी, मी घाबरत होतो.

का? आणि इतक्या गोड़ मुलीनं तुला प्रोपोज केलं हे पण नाही सांगावस वाटलं?? हीच का रे दोस्ती?

अभि !! यार तुझ्या पासून लपवायचं नव्हतं. पण तुला माहितीये माझा भूतकाळ. मी घाबरत होतो. तिला मी जसा आहे तसा आवडीन कि नाही? मी ट्रान्स मॅन आहे हे सत्य ती स्वीकारेल कि नाही आणि सगळ्यात महत्वाचे.मुळात मला तिच्या बद्दल वाटणाऱ्या भावना ह्या स्त्री सुलभ आहेत कि पुरुष सुलभ?? मी स्वतः च अडकून पडलो होतो रे या द्विधा अवस्थेत.

गेले काही दिवस इथल्या थेरपीज मुळे मला माझंच असं जाणवलंय की मी सखीशी एखाद्या नॉर्मल पुरुषासारखा जोडीदार म्हणून वावरू शकतो. एक पत्नी म्हणून तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. सुदैवाने माझ्या मेडिकल टेस्ट्स ही नॉर्मल आहेत आणि आज जेव्हा तिला भेटलो ना तेव्हा जास्त जाणवलं कि हिच्या शिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार ही करु शकत नाही. अभि नं त्याला मिठी मारली.इतक्या दिवसांचा मनावरचा ताण आज संपला होता. सुज्या मिठीत शिरून कोकरा सारखा रडत होता आणि सखी ला कायमच गमावलाय हे दुःख अभिला सलत होतं त्यामुळे त्याचे ही डोळे नकळत पाणावले.

स्पर्धा एकूण 4 दिवस चालू होती. आज शेवटचा दिवस उजाडला. सखीनं पुन्हा एकदा ऑल द बेस्ट म्हटलं. मात्र यावेळी सुज्यानी चक्क तिला मिठीत घेतल.

तिच्या कपाळावर ओठ टेकवत. थँक यु. म्हणून तो स्पर्धेला उतरला. स्विमिन्ग रनिंग वेट लिफ्टिंग याच बरोबर एक स्पेशल हर्डल रेस डिझाईन केली होती. ज्यात त्याला 4 लोकांचा टीम लीडर बनून छोटे छोटे सामने खेळायचे होते. निर्णय क्षमता. या वेळी पणाला लागणार होती.

एक एक करत त्याची टीम स्पर्धा जिंकत होती आणि नेमक्या मोक्याच्या क्षणी त्याचा एक मेम्बर जखमी झाला आणि त्याच्या टीम चा दुसरा क्रमांक आला. तरी ही निराश न होता यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं.

सखी उत्स्फूर्तपणे त्याला प्रोत्साहन देत होती आणि पाणावलेल्या डोळ्यांनी अभि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहात होत.. स्पर्धा संपली... निकाल जाहीर झाले आणि सृजन नं त्यानं कमावलेली मेडल्स घेऊन सखी कडे धावत आला त्यानं तिला त्या स्टेडियम च्या मध्यभागी आणलं. एक माइक हातात घेतला आणि सगळी मेडल्स तिच्या गळ्यात घातली गुडघ्यावर खाली बसला आणि त्या तमाम पब्लिक समोर तिला म्हणाला. सखी i really love u from bottom of my heart. will u marry me?

सगळीकडे पिन ड्रॉप शांतता. सखीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती ही खाली बसली आणि त्याच्या मिठीत शिरत म्हणाली, yes!...i will

टाळ्यांचा कडकडाट. बघणारे सगळेच ह्या गोड क्षणांनी भारावून गेले. खऱ्या अर्थी आज स्पर्धेचा उद्देश सफल झाला होता. पुनर्वसन...नव्हे सामाजिक मान्यता मिळत होती.सृजन सारख्या ट्रान्सजेन्डर ला.आपल्या समाजात आणि ते ही त्याच पहिलं वहिल प्रेम.

निशू धावत आली आणि सखीला मिठी मारत म्हणाली ह्या सगळ्याच श्रेय.अभि ला. त्यानच तुम्हाला आज एकत्र आणलय अरे.

पण हा अभि कुठाय? सगळीकडे शोधूनही तो कुठेच दिसला नाही.त्याचा फोन ही बंद येत होता.

आणि जेव्हा हे सगळे रूम वर परत आले.तेव्हा त्यांच्यासाठी अजून एक सरप्राईज वाट पाहात होतं.

अभि नं सखीच्या आणि सृजनच्या आई वडिलांना ही या दोघांबद्दल सांगितलं. सृजन च्या भूतकाळासह आणि आता तो कसा नॉर्मल आयुष्य जगू शकतो हे ही समजावून सांगितलं शेवटी दोन्ही घरातून होकार मिळवत त्यांनी आज सगळ्यांना एकत्र आणलं.

सखी आणि सृजन ला जवळ घेत दोघांनी आशीर्वाद दिले.


कधी कधी स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून दुसऱ्याच्या भावना जपणारा मित्र अभि.

लग्नाला नकार मिळूनही समजूतदारपणे बाजूला होणारा नील

आणि स्वतः च्या न्यूनगंडावर मात करत स्वतः च प्रेम मिळवणारा सृजन, सगळेच हिरो ठरले.

आणि शेवट गोड झाला.


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance