कालभ्रमण (Kaalbhraman)
कालभ्रमण (Kaalbhraman)
महेश भोसले, एक अतिशय हुशार शास्त्रज्ञ, इंडियन इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या गुप्त संशोधणावर काही निवडक लोकांसोबत काम करत होते. अभियान होतं, एक कालभ्रमण यंत्र म्हणजेच टाइम travelling machine बनवणे. यंत्र जवळपास पूर्णत्वास आलं होतं. Luch time मध्ये ते एक पुस्तक वाचण्यात दंग झाले होते, महेश सरांना इतिहासात खूप रुची होती . त्यामुळे जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा ते ऐतेहासिक पुस्तके वाचत असत. "सर कुठलं पुस्तक वाचताय ?" महेश सरानी चष्मा डोळ्यावरून बाजूला घेत वर पहिला . "अरे अजिंक्य , ये ये बस .". "सर, म्हटलं , एवढे तल्लीन होऊन कुठलं पुस्तक वाचताय ?" अजिंक्यने परत विचारला . अजिंक्य साठे, महेश सरांच्या टीम मध्ये जुनिअर सायंटिस्ट होता, आणि कालभ्रमण यंत्र बनविण्यात त्याचा हि मोठा हातभार होता . महेश सर पुस्तका कडे पाहून म्हटले , "मी संध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचतोय . महाराज आपल्या वडीलांप्रमाणे अतिशय शूर , हुशार , पराक्रमी तर होतेच पण साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते . तुला माहितीये , त्यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी बुध-भूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला . या शिवाय त्यांनी इतरही अनेक ग्रंथ लिहिले . पण ... दुर्दैवाने अशा महान राजाला शत्रूने त्यांच्याच जवळच्या लोकांच्या मदतीने धोक्याने पकडले ." "काय धोक्याने पकडले ?" अजिंक्यने आश्चर्याने विचारले . "होय धोक्याने " महेश सर पुढे बोलू लागले "संभाजी महाराज february सोळाशे ऐकोन नव्वद मध्ये , कोकणातील संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात मुक्कामी होते . तेथून पुढे त्यांना रायगडाकडे कूच करायचे होते . महाराजांना पकडण्यासाठी निघालेल्या मुकरब खाना ला महाराजांच्या फितूर लोकांनी जवळचा रास्ता दाखवला . या मुले मुकरब खानाचे सैन्य 4-5 दिवसांचा ऐवजी अवघ्या 2 दिवसात संगमेश्वरला पोहचले . आणि पुढील इतिहास तर सर्वानाच ठाऊक आहे " ..... hmmmm असोत , आपली time machine चाचणी साठी तयार आहे ना ? "हो सर , उद्याच चाचणी होणार आहे ". ऑफिस मधून निघताना अजिंक्यला राहून राहून महेश सरानी संभाजी महाराजां बद्धल सांगितलेली माहिती आठवत होती . "जर महाराज त्या दिवशी धोक्याने पकडले गेले नसते तर , महाराज अजून काही वर्ष जगले असते तर ? महाराष्ट्राचा इतिहासच किती वेगळा लिहिला गेला असता ?" विचार करत करत अजिंक्यला कधी झोप लागली कळले नाही.
दुसऱ्या दिवशी अजिंक्य ऑफिस ला वेळेच्या आत पोहचला . आज time machine ची चाचणी होणार होती . चाचणीची पूर्व तयारी करता करता दिवस निघून गेला . संध्याकाळ झाली . महेश सरानी खात्री करून घेतल्यावर चाचणी सुरु करण्याची अनुमती दिली . अजिंक्य स्वतः चाचणीत सहभागी होणार होता . एका मोठ्या काचेच्या गोलात त्याने प्रवेश केला . तो खुर्चीत बसल्यावर बाहेरून महेश सरानी काही बटनं दाबली. क्षणार्धात तो काचेचा गोल प्रचंड वेगानी जागेवर फिरू लागला . अजिंक्यची शुद्ध हरपली . काचेच्या गोलात धुरचं धुर झाला आणि अजिंक्य अचानक दिसेनासा झाला . महेश सरांना कळून चुकलं काही तरी गडबड झाली आहे . अजिंक्य दुसऱ्या कालखंडात गेला तर आहे पण , कालखंड नियंत्रित करण्याचे बटण मात्र खराब झाले होते .
महेश सरांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसून येत होती . त्यांच्या प्रयोगाची सुरुवात तर यशस्वी झाली होती , पण अजिंक्यच काय ? कुठे गेला असेल तो , भविष्यात असेल कि भूत काळात ? तो ठीक तर असेल ना ? तो कधी वापस येईल आणि व्यवस्थित वापस येईल ना ? महेश सरानी अजिंक्यला वापस आणण्यासाठी बिघाड झालेल्या यंत्राला दुरुस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले .
इकडे अजिंक्य जेंव्हा शुद्धीत आला तेंव्हा त्याला लक्षात आले तो एका दगडी शिव मंदिराच्या परिसरात पडलेला होता . आजू बाजूला बरीच झाडी झुडपे होती . त्याचे डोके जड झाले होते आणि तो कुठल्या काळात आला आहे कुठल्या जागेवर आला आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात हातात भाला आणि पाठीवर ढाल असलेल्या २ लोकांनी त्याला पाहिलं . अजिंक्यला पाहून ते थोडे गोंधळात पडले पण पटकन त्याचे हात बांधून त्याला शेजारीच असलेल्या एका मोठ्या वाड्यात आणले. तेथे असलेले सर्व लोकांचा पोशाख हा जवळपास सारखाच होता आणि त्यांच्याकडेहि भाले तलवारी अशी शस्त्रे होती. अजिंक्यला एका अंधाऱ्या खोलीत नेण्यात आले. मंद दिव्यांच्या प्रकाशात अजिंक्य तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कळून चुकले होते कि तो भूतकाळात आला आहे. पण कुठल्या काळात हे त्याला समजत नव्हते. इतक्यात सगळे सैनिक सावधान झाले. त्यांना कोणी तरी येत असल्याची चाहूल लागली होती. अचानक त्या अपुऱ्या प्रकाश असलेल्या खोलीत एका तेजस्वी पुरुषाने प्रवेश केला आणि त्याच्या तेजाने ती खोली उजळून निघाली. "महाराजांचा विजय असो". तेथील सैनिक बोलले. "राजं ह्योच तो इंग्रजांचा हेर. वाद्या मागच्या शिव मंदिरा जवळ पकडला ह्याला" "काय रं, संभाजी महाराजांच्या राज्यात येऊन हेरगिरी करण्याची तुझी हिम्मत कशी झाली. सैनिकाने डोळे मोठे करून विचारले . "संभाजी महाराज !!! मी स्वप्न तर बघत नाहीये ना ?" अजिंक्य पुटपुटला .... "व्हय संभाजी महाराज, स्वराज्यात हेरगिरी करण्याची काय शिक्षा असते ठाऊक न्हाई व्हय तुला .
अजिंक्य डोळे विस्फारून बघताच राहिला . महाराजांच्या तेजस्वी रुपाला तो जितके शक्य होईल तितके तो डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करू लागला . सोन्याच्या कलाकुसरीने नटलेल्या त्या जिरेटोपला राजांच्या मस्तकी विराजमान होण्याचा गर्व असावा . भेदक डोळ्यां वरील कपाळावर , विसावलेली ती भगवी चंद्रकोर स्वतःला आकाशातल्या खऱ्या खुऱ्या चंद्रकोरी सामान समजत असावी. महाराजांच्या उरावर घट्ट विळखा घातल्यामुळेच , जणू काही अंगरख्याला वेगळी चमकत आली असावी. गळ्यातल्या कवड्याच्या माळेला महाराजांच्या सतत हृदयाशी असण्याचे सुख मिळत असावं. महाराजांच्या पायाला आराम देण्याचे भाग्य मिळाल्याचे समाधान त्या नक्षीदार मोजडीला सतत वाटत असावे . ती तलवार , ती कट्यार .. या सर्व वस्तू निर्जीव असूनहि किती नशीबवान होत्या.
अजिंक्य भान हरपून महाराजांचे रूप न्याहाळीत होता . "कोण हायेस तू . कोणासाठी हेरगिरी करतोय ". सैनिक ओरडला . पण इकडे अजिंक्यच्या गालावरून अश्रू ओघळतच होते . महाराज उमजून गेले , हा कोणी हेर नाही . सैनिकांना अजिंक्य चे हात मोकळे करायला सांगून ते म्हणाले "आपण हेर दिसत नाही , कोण आहात आपण , कोठून आलात ?". अजिंक्य अजून हि धक्क्यातून सावरला नव्हता . डोळे पुसून त्याने महाराजांना प्रति प्रश्न केला आपण संगमेश्वर मधल्या सरदेसाई च्या वाढ्यात आहोत का ? "होय " महाराजांच्या चेहऱ्यावर कठोर आणि शांत भाव होते . "आपण रायगड कडे कूच करणार आहात काय ?" महाराज चकित झाले . सैनिकाने अजिंक्यच्या मानेवर तलवार ठेऊन विचारले “तुला कस ठाऊक ?” अजिंक्य पुढे बोलू लागला "महाराज तुमच्या जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला आहे . मुकरब खानास तुमचा ठाव ठिकाण सांगितला आहे . तो कधीही इथे पोहचेल . महाराजांनी भुवया घट्ट करीत विचारला "कशावरून " ?
"महाराज माझे नाव अजिंक्य आहे आणि मी भविष्यातून आलो आहे . आम्ही एक कालभ्रमण यंत्र तयार केल आहे जेणे करून आम्ही दुसऱ्या काळात जाऊ शकतो .तुमचा येणारा इतिहास आम्हास ठाऊक आहे . सध्या ची वेळ खूप वाईट आहे. तुम्ही रायगडा कडे जाऊ नये . "काय... तिकडे इतिकात खान स्वराज्याच्या राजधानीला वेढा घालण्यास निघालाय आणि आम्ही रायगडाला जाऊ नये ?" महाराजांनी मोठ्या आवाजात विचारले "पण महाराज तुमच्या सोबत दगा फटका होणार आहे." अजिंक्यने महाराजांना सावध करण्याचा प्रयत्न केला "अजिंक्यराव तुमचे म्हणणे सत्य असेलहि . भविष्यात जाऊन तुम्ही संकटाना पाहू शकाल , कदाचित तुम्ही त्यांना टाळू हि शकाल पण अशाने संकटांचा सामना करण्याची ताकदच तुम्ही गमावून बसाल . औरंगजेब आपल्या सोबत धोका करू शकतो हे माहित असूनहि आबासाहेब आग्र्याला गेले होते ना , आणि तेथून सुखरूप वापस हि आले . अफजलखान आपल्याशी भेटी दरम्यान दगा फटका करू शकतो याची पूर्ण कल्पना असूनहि महाराजांनी त्याचा सामना करून त्याला संपवले ना. जर महाराजांनी भविष्यातील जोखीम जाणून आपले पाऊल मागे घेतले असते तर हे स्वराज उभं करू शकले असते का ? आपल्या मावळ्यांचा विश्वास , प्रेम मिळवू शकले असते का ?. नाही अजिंक्य राव नाही ....."
"एक विनंती आहे" ... संभाजी महाराज दीर्घ श्वास घेत बोलले .... "महाराज ...... विनंती नाही , आपण फक्त आदेश करावा ." अजिंक्य काकुळतीला येऊन बोलला . महाराज पुढे बोलू लागले , "भविष्य पाहण्याची कामना मनी बाळगू नका , भविष्य घडवण्याची हिम्मत अंगी आणा . भविष्यातली संकटाची तमा न बाळगता आपण त्याचा सामना करा . लक्षात ठेवा , जे संकटांशी झुजणार नाही ते भविष्य घडवू शकणार नाहीत …. येतो आम्ही." अजिंक्यने भरलेल्या डोळ्यांनी महाराजांचे अखेरचे दर्शन घेतले . महाराजांच्या पायासमोर आपला माथा टेकवला . त्याला पुढील घडणाऱ्या प्रसंगांची कल्पना होती . पाठमोऱ्या महाराजां कडे बघत त्याने आपले डोळे पुसले . महाराज पुढील प्रवासाला निघाले होते . जीवाची पर्वा न करता संकटाला निधड्या छातीने सामोरे जाणारा तो फक्त छावाच असू शकतो . धन्य ते शंभू महाराज आणि धन्य ती महाराष्ट्राची पावन भूमी.
इकडे महेश सरानी बिघडलेले यंत्र दुरुस्त केले होते आणि अजिंक्यला वापस आणण्याचे बटण दाबले . काचेचा गोल परत प्रचंड वेगाने फिरू लागला . अचानक अजिंक्य काचेच्या गोलात परत दिसू लागला . प्रयोग शाळेतील तापमान कमालीचं वाढले होते . एका मोठ्या आवाजा सहित काचेच्या गोलाचे तुकडे झाले. सोबत प्रयोग शाळेचेहि खूप नुकसान झाले. ते यंत्र आता स्थिरावले होते . महेश सरानी अजिंक्यला प्रयोग शाळेबाहेरच्या रूम मध्ये आणले . थोड्याच वेळात अजिंक्य शुद्धीवर आला . महेश सरांचा जीव भांड्यात पडला.
अजिंक्यने झालेला सगळा प्रसंग त्यांना सांगितलं . महेश सरांचा कंठ दाटून आला होता . आणि थोड्याच वेळात महेश सरानी कालभ्रमण यंत्राच्या प्रयोगाला कायमचे बंद करण्याची घोषणा केली.
