Vanita Bhogil

Tragedy

3  

Vanita Bhogil

Tragedy

जन्मदात्री

जन्मदात्री

3 mins
304


  आई वडील कुठे चुकतात कुणी सांगेल का?  गरीबीत दिवस काढनाऱ्या आई वडिलांनी ,पीढिजात जमीन होती तिला हात न लावता त्यात काही पिकवून, 

नाहीच भागले तर दुसऱ्यांच्यात मोल मजूरी करून मुलांची पोट भरली. दोन मूल,दोन मूली जशा दोघी लग्नाच्या वयात आल्या तस लोकांचे कर्ज काढून लेकिंचि लग्न केली...  लग्नाच कर्ज फेडन्यासाठी बापानी पंधरा वर्ष लोकांच्यात सालानी गडी म्हणून रक्त पडेपर्यंत शिळया भाकरिवर काम केली.

 मुलींची बाळंतपण आली...सण सणावाराला कपड़े घे, बोळावण्या कर...काढ़ कर्ज... ते फेडन्यासाठी आईन लोकांची सारवान केली, लहान मुलगा बारावी पर्यंत शिकवला, पुढे तो शिकलाच नाही,       


मोठ्याच लग्न करून दिल.. तस बायकोच ऐकून लगेच वेगळा निघाला. लहान मुलगा करतुकीस येऊन पण काम धंदा करत नव्हता.

 म्हणून बापानी काळजी पोटी बोलायला चालू केल.. बाबारे काम नाही केलस तर पोट कस भरशील? आमच्या माग तुझ कस होईल?आजुन तुझ लग्न व्हायच आहे... तू असा मग मुलगी कोण देईल लग्नासाठी वगैरे... अस बोलतच बाप जेवत होता. या शाहण्या लेकान का बडबड करतो म्हणून बापाच्या कंबरेत लाथ घातली.. वयस्कर बाप तसाच तोंडावर पडला.....  काय पाप केल मी म्हणून बापान हाय खावून जेवण सोडल. बाराव्या दिवशी बापाची तिरडी बाहेर काढली...  पण त्याला मोठ्या बहिणीणी सुद्धा जाब विचारला नाही. मयतीचा आणी बाकी विधिचा खर्च नातेवाईकानी केला.

 

 राहिली आई... तिचे हाल तर कुत्र पण बर असे करून ठेवले. नातेवाईकानी मिळून लहान्याच लग्न लावून दिल. आता तरी सूधारेल. पण त्याची बायको आणी तो घरात बसून खायचे. आणी रोज दुसऱ्यांच्यात मजूरी करून ति आई याना खायला घालायची. भोळी होती बिच्यारी. कुणी मुलाबद्दल सांगीतल तरी नाही माझा मुलगा खुप चांगला असच म्हणायची. शेती दोघानी वाटून घेतली, अर्धा एकर आईसाठी दया अस गावकरी म्हणाले, जो आईला संभाळील त्यालाच ति जमीन ठरली. लहान्याला आयत खायची सवय होती, मि आईला संभाळतो म्हणाला.  दहा वर्ष तिनच त्याला त्याच्या बायकोला आणी त्याच्या तिन लहान मुलाना संभाळल, 


तिचं शेत पन यान विकुन टाकलं, स्वतःच्या वाटनीच पण विकुन खाल्ले. त्या आईचे किती हाल होते पण मोठा मुलगा आणि दोन मुलिनी कधी साधी विचारपुस सुद्धा केली नाही. आता ति थकत चाली होती,  ज्याना शेत खाल्ले तो गावात खुप कर्ज बाजारी झाला, आईचे पैसे येणे बंद झाले म्हणून तो एक दिवस शहरात मूल बायकोला घेऊन निघाला, आईचा जीव... ती म्हणाली नको जाऊ आपन करु काहीतरी, मी आजुन कामाला जाईल,  तो ऐकायला तयार नव्हता, मग तीं म्हणाली मी पण येते तुझ्यासोबत मला कोन बघेल? त्यावर त्याने आईला ढकलुन दिल आईच डोक फुटल रक्ताची धार लागली. पण यान बघितल नाही की याच्या बायकोणी पन बघितल नाही. आईने त्याचा पाय धरला नकोस जाऊ रे त्या निर्लज माणसाने आईच्या मुस्कटात मारली, आई चक्कर येऊन दारात पडली, या निर्दयी माणसाने घराला कुलुप घातल आणी निघुन गेला...

 

   मोठी मुलगी तिला दोन मूली, छोटी मुलगी तीला तीन मूली आणी एक मुलगा. मोठ्या मुलाला दोन मूली एक मुलगा, छोट्या मुलाला दोन मूलगे एक मुलगी. एवढा मोठा परिवार. तो गेल्यावर ती आई देवळात राहु लागली, मोठ्या मुलाची बायको तर बघू पण देत नव्हती.. नवरयाला म्हणायची शेत म्हातरिच त्यानं विकुन खाल्ले आपण का सांभाळा? मुलींना सगळ्या गावान निरोप दिला. त्या म्हणाल्या आमच्यासाठी त्यानी काय केल. किती करणीधरणी केली? मग आम्ही का बघाव तिला......बिच्यारी चार मुलांची आई देवळात अर्ध लुगड नसुन अर्ध खाली अंथरायची आणी गावात भिक मागून जगु लागली. नाते गोत्यातले येऊन कधीतरी बघायचे. थकुन निजायची. गावातील लोक येताजाता बघायचे, जीवंत आहे का म्हणून... एक दिवस पडली सगळ्या हातपायला जखमा झाल्या, त्या जखमासुधा तिला तिच्या डोळ्यांनी नीट दिसत नव्हत्या.


 आठ दिवसात खूपच आजारी झाली गावकरयानी मुलींना निरोप पाठवून सांगीतल, त्या म्हणाल्या तीं देवळात झोपते आम्ही कस भेटायच तिला आमचिपन इज्जत जाईल. ज्याच्यासाठी हाड उगाळली त्यानं तर गावकरी फोन करतील म्हणून नंबर सुद्धा बदली केला. त्या दिवशी त्या आईची प्राणज्योत पहाटेच मावळली, गावकऱ्यांनी नातेवाईकाना कळवल, मुलींना सुधा कळवलं. मयतीला आल्या आणी खूप जीव असल्यासारख रडू लागल्या... 

आणी हो तिचा सुद्धा अंत्यविधी गावकरी आणी नातेवाईक यानी मिळून केला.😭

   

पण ज्या मुलाना जन्म दिला त्या मातेसाठी ना कुनाकडे कधी वेळ ना कुनाकडे कधी पैसा होता. सगळ्यांच्या घरी सगळ बरयापैकी म्हणजे मजेत आहे. मग का हो त्या आईला अस काय लागत होत जे जन्म दिलेल्या मुलाना ओझ वाटाव? का दया आली नसेल कुणालाच चौघातुन,  एवढा विसर पडतो का? खरच पैशापुढे प्रोपर्टी पुढे जन्मदात्यांच्या मायेचा लीलाव होतो? कसल हे दुर्भाग्य 'शाप लागावा याना, मगच समजेल याना आई वडिलांच प्रेम काय असत'


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy