जगण्याची पद्धत
जगण्याची पद्धत
असं म्हणतात तुमच्या जगण्याची क्वालिटी ही तुम्ही ज्यांच्या संपर्कात येता त्यांच्यावर देखील अवलंबून असते. आयुष्यात फक्त चांगली माणसं येऊन उपयोग नसतो तर त्यांची किंमत ओळखून त्यांचा मान ठेवण्याची जाणीव असणं हाही महत्वाचा भाग असतो. आपलं एकटेपण हे अनेकदा ह्या अशाच चांगल्या दर्जाच्या माणसांना डीच करून, काही सुमार व्यक्तींच्या मोहात अडकण्याचाच परीपाक असतो...
आपल्या जगण्याचं मूल्यांकन इतर कुणी करु नये हे जसं खरं आहे तसंच इतरांचं आयुष्य, इतरांची स्वप्न आपली समजून जगण्याच्या मोहात आपण एकटेपणाची वाट तर धरत नाही ना हे समजून घेण्याची जबाबदारी पण आपलीच असते.
