angad darade

Tragedy

4.0  

angad darade

Tragedy

जगणं झालंय वाऱ्यावर

जगणं झालंय वाऱ्यावर

3 mins
278


जगणं झालंय वाऱ्यावर 


कारे क्रूर वागतोस निसर्गा

घाव केलास पिकांवर , 

नको छळूस अजून अता 

जगणं झालंय वाऱ्यावर .


  गरीब शेतकऱ्यांच जगणं काय असतंय ते गरीब शेतकऱ्यांला माहिती त्याच्या घरी येऊन पहा , पहा काय काय करावं लागत त्यांना जिवंन जगण्यासाठी , किती वेदनांना कवटाळून दुःख पचवाव लागतंय अपेक्षाच ओझं वाहून स्वप्नं नुसते स्वप्ना पुरतेच उरतात त्यांना प्रत्येक्षात स्पुर्ती करण्यासाठी मात्र काहीच नसतंय .

  आम्हीं शेतकऱ्यांच्या दारी जन्मला आलो म्हणुन , आम्हीं पाप करुन जन्मला आलो की काय असं वाटायला लागलंय या निसर्गाच्या व्यवस्था मुळे .

आम्हीं सर्व शेतकऱ्यांनी घाम गाळून फक्त कष्ट करायचं ऐन वेळी पावसानं यायचं आणि आमची सारी मेहनत उन्हातान्हात घाम गाळून केलेलं कष्ट निसर्गान त्याच क्रूर धारण करुन क्षणातच नाहीस करायच .

 जगाचय तर कसं इथं कोन येणार मदतीला कोन पाठीराखा होणार ज्यांना आम्हीं विमा भरला ते का ? 

  एकाद्या मोठ्या कंपनी एजनसीच लूसकान झालं की लगेच विमा कंपनी त्यांना तात्काळ मदत करते आम्हीं दिवस दिवस रांगेला लागुन पिंक विमा भरला , अता आमच्या पिकांचे भयंकर लूसकान होऊन 90 टक्के पिंक वाया गेलं आहे .मात्र त्याची कुणी येऊन पाहणी देखील केली नाही , मंग असं का ? का प्रत्येक जन शेतकऱ्यांवर दुर्लक्ष का करतोय हा प्रश्न आम्हांला सतत वेदना देतोय .

  निवडनुकाच्या वेळी प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्यांचा स्थानिक कार्यकर्ता घरी यायचा काय काय ते बोल बोलायचा , तुमची मुलं नौकरी लाऊ म्हणायचा , रोजगार उपलब्ध करुन देऊ म्हणायचा , वातावरण अगदी प्रसन्न करुन जायचा .पण आज ती लोकं तोंड देखील दाखवला तयार नाहीत .महामारी ने प्रचंड प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली यात आमची मुलं बाळ खूपच होरपळून निघालीत अनेकांनच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर बेकारीचे वेळ आली आहे , त्याच कुणाला ही काही घेणं देणं नाही की काय असं वाटायला लागलंय .

 निसर्गाने याही वेळी कोप केला धो धो वाऱ्यासह पडुन सारं आमचं जगणं क्षणातच वाऱ्यावर केलं ऊस मातीत झोपविला तर सोयाबीन कापूस मुग नासऊन टाकला. या वर्षी अता जगायचं कश्यावर पिंक वाटोळं झालं अता ते परत तर येनार नाही ना मंग हे वर्ष कसं काढायचे , शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना कधी आयत खायची सवय नसती ते मेहनतीनेच कष्ट करुन जीवंन जगतात पण अश्या वेळी आमचं कष्टच सारं वाया गेलं अता कश्यावर जगायच , जवळचा सारा पैसा बी भरण नागरनी पेरणी फवारणी खूरपणी या साऱ्या मेहनतीत गेला. हाती अपेक्षा होती ती फक्त उभ्या पिकांची ते ही अता नाही . नशिबान आमचा छळ केला की काय असं वाटायला लागलय .

 जवळ तर पैसा नाहीच पण ज्यातून आम्हांला आर्थिक मदत होणार होती ते पिंक पण नाही , अता जगावं की मरावं हा एकच उपाय आमच्या समोर उभा आहे.

मुलं घरी बसूनच आहेत कुनि त्यांना काम देयला तयार नाहीये अता पुढील सुगी येईपर्यंत शेतकरी असून सुध्दा मजूरी करुनच पोट भरायची वेळ आलीये पोटा साठी वनवन भटकायची वेळ आलीये , अश्या वेळी होत असेल तर माय बाप सरकारने काम उपलब्ध करुन रोजगार निर्मिती करावी ही शेतकऱ्यांच्या आम्हां मुलांची आपणास विनंती आहे. रडून मारण्यापेक्षा आजची शेतकऱ्यांची मुलं आम्हीं लढून मरूत , पण जिकडे पहावं तिकडे काहीच दिसत नाही ना घरी थांबावे वाटतंय ना रानात जाव वाटतय रानातले ते रक रक करनारे दृश्य पाहुन काळजात काहूर उठतय . जगणं फार अवघड होऊन बसलं आहे कधी बाजरीच , कडूळाच धस्क्ट पायात आर पार घुसून मोठं दुःख झालं तरी त्यावर उपाय करण्यासाठी देखील आर्थिक परिस्थितीत आडवी येतेय आट आट दिवस त्या वेदना सहन करुन ते दुःख पचवाव लागतंय , केलाच असा तसा उपाय तरी कधी पावसाच्या चिखलान त्यात पाणी जाऊन ते चिकट पना धरून केवढा त्रास देतय त्या वेदना फक्त होनरालाच जानवेल बाकीना त्यांच्या वेदना जखमा ऊन काही घेणं देणं नाहीये 

  शेवटी हाच प्रश्न पडतोय का वागतात सर्वच आम्हां शेतकऱ्यां सोबत असे .निसर्ग ही का येवढा क्रूर झालाय त्याला अजून आमचे किती हाल करायचेत ना मरू देतोय ना जगु देतोय, देतोय ते फक्त वेदना आणि दुःखंच .

 

भरलीय विहीर सारी 

वाहतो वरूनच बोरं

गेलंय नासुन पिंक सारं 

मनी लागलाय घोरं


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy