वेळ येईन का परतुनी
वेळ येईन का परतुनी
वेदनाशी संवेदना कवटाळुनी
ओसाड पडलेल्या हृदयातुनी
अश्रू सुखाचे येतील का?भरुनी.
काळ जाईल का
हा पलटून,
वेळ येईन का
देवा ती परतून.
ना मन कुठे रमतंय ना त्याला कुठं सुखं दिसतंय, दिसतंय तर फक्त दुःख आणि दुःखच त्या यातना त्या वेदना ज्या पाहून काळीज भयंकर घाव झेलतंय, सुखाची पहाट पाहण्यासाठी डोळे आतुरतेने वाट पाहातायत, पन उजेडनारी प्रेत्येक सकाळ दुःखाचीच वार्ता घेऊन येतेय, ती वार्ता कशी ऐकावी अन ते द्रश्य कसे पाहावे, जे उरात आर पार चीर पाडून जातंय. कधी या दुनियेतुन जाईल हा महाभयंकर रोग अन सुखी होईल जनता सारी, याचीच वाट हा डोळा वर्षापासून पाहतोय, कधी थांबणार हे मृत्यूचं वादळ. ज्या वादळात अनेक घरटी उध्वस्त झालीत. जिकडे पहावं तिकडे हेच दिसतय का होतंय हे सर्व काही काहीच सुचत नाहीये. कोठे जावं कोठे चांगलं वातावरण असेल हेही काहीच कळायला मार्गदेखील उरला नाहीये. रोज रोज जे ऐकायला भेटतंय त्यावर विश्वास ठेवायला मन घाबरून जातय,कोण कुठे कुणाचं काय होईल अक्षरशः अनेक विश्वास न बसणाऱ्या गोष्टी कानी येत आहेत ज्या ऐकून किंवा पाहून मन खूप घाबरून जातंय आणि मनात एकच प्रश्न पडतोय कधी थांबणार हे. कोण थांबवणार याला, थांबणार का हे मृत्यूचं तांडव, खरंच हे सर्व काही थांबेल का? पूर्वीसारखा जीवन जगता येईल का?
सर्व व्यवस्थित तर होईल ना हे दूषित वातावरण जाऊन पूर्वीसारखे दिवस येतील का? ज्याचा आधार गेला त्याला आधार मिळेल का? ज्यांचे आई बाबा गेले त्याचे आई बाबा परतून येतील का? सांगणार देवा तुला हे शक्य होइल का? दुःखात असणारा संवसार परत सुखाचा होईल का?ओसाड पडलेले त्या हृदयातून अश्रू सुखाचे फुलून येतील का? हे तांडव थांबेल का? सर्वकाही पूर्वीसारखा होईल का? असे अनेक प्रश्न ज्याचे उत्तर मिळायला मार्ग नाहीये. हेच मनात नेहमी येतय, कधीही न घाबरणारे मन आज घाबरून जातय,घराचा आधार जाणं खरच किती वाईट आहे.अशा त्या घराला परत आधार येईल का? त्या घराचं घरपण परतून देशील का? मुलाबाळांचा सांभाळ करणारे त्याची आई बाबा परतुन देवा देशील का? अशा मुलांनी कोणाकडे पाहून जगावं? कसं जगावं? पैशाची चिंता अन्नपाण्याची चिंता. या घटना सतत म्हणाला ओढावत आहेत.
हे काय घडतंय. का घडतय काहीच कळायला मार्ग नाहीये. हातावर पोट असणाऱ्याचे पोट उपाशीच राहून चाललंय. हातातलं काम गेलेय, नोकरी गेली, आता करावं तरी काय जावे तर जावं कुठे, भविष्यात काय होईल अजून किती कसे दिवस काढावे लागतील कळायला मार्ग नाही हे सत्र अजून असं किती दिवस चालू राहणार, अजून कोणाकोणाच्या मृत्यूच्या घटना ऐकायला येणार, हे सर्व मन ऐकू शकेल का ते दुःख सहन होऊ शकत नाही रे देवा. भविष्यात कोणाचं काय होईल हीच चिंता सतत मनाला सतावतेय.
का रे ईश्वरा मानवाच्या नशिबाला का हे दुःख दिलंस अजून किती दिवस तुझ्या या घावात जगायचं. बस झालं ना रे तुझ्यातला देव कुठे गेला रे? का देव पण तुला भिडतंय, म्हणून असं वाईट घडतंय. सांग ना रे ईश्वरा, ना बोलण्यासाठी शब्द आहेत, ना बोलण्यासारखे काही उरलंय, सांग ना देवा कोणी हे रोगाचे बीज पेरलंय, आयुष्य सारं त्यात संकटाने घेरलंय. उध्वस्त झालं रे सारं सुखी संसाराचे डोळ्यासमोर वाटोळं होतोय, हे दुःख कसं पचवावे देवा. स्वतःला आता स्वतः नीच वाचवायचं आहे. मनात आशा आहे लवकरच हेही दिवस निघून जातील, अन् हे सर्व पलटून टाक रे मानवांचं सुखी जीवन परतून दे रे, देवा हीच तुझ्यापाशी प्रार्थना.
