angad darade

Others

4.3  

angad darade

Others

स्वभाव

स्वभाव

2 mins
290


पाहत होतो त्या दिव्याकडे

दिव्यातल्या त्या वातीकडे

वात मात्र स्वता जळत होती

स्वतः जळून इतरांना ती

प्रकाश देत होती


     कधी दिव्यातल्या त्या वातीचा विचार करून त्या वाती प्रमाणे समाजसेवे साठी आपण त्या वातीतले कितपत गुण अंगीकर्त केले कधी निरीक्षण केलं असेल का कोणी, स्वतःला संपवून वात मात्र सतत दुज्यांना प्रकाश देत राहिली स्वतःला राखीत मिसळली, मात्र काळोखात थोडा उजेड पाडून कधी कोणाच्या तरी कामी आली, हेच त्या दिव्यातल्या वातीचे महत्व मनता येईल.


पाहत होतो त्या झाडाकडे

झाडाच्या त्या फादीकडे

फाडीच्या त्या पानाकडे

पान मात्र स्वता उन्हात तळत होतं

स्वता उन्हात तळून इतरांना

सावली ते देत होतं


  दुष्काळातील जेव्हा भयंकर उन्हाळा चालू होतो त्यात झाडेची झाडे वाळू लागतात, अति उष्ण स्वरूप त्या झळा

घेतात. अंगाला जेव्हा चटके बसू लागतात, तेव्हा मात्र कोणत्यातरी झाडाचा सहारा घेऊन थंड गार सावलीत विश्रांती केली जाते,पण हा विचार केला का? ज्याच्या सावलीत आपण विश्रांती घेतोय तो किती घाव सहन करून आपल्या थंड अशी छाया देण्यासाठी जिव मुटीत देऊन उन्हाचे चटके सहतोय.मात्र एकवेळ आपण ज्याच्या सावलीचा सहारा घेतला त्यालाच तोडून टाकतो, हे मानवाच्या वागणुकीला शोभतं का? हाच प्रश्न पडतो.


पाहत होतो त्या नदीकडे

नदीतल्या त्या पाण्याकडे

पाण्याच्या त्या वेगाकडे

पाणी मात्र सतत वेगाने धावत होतं

पुढचं एखादं रोप सुखून जाईल का

या चिंतेन सतत ते वाहत होतं 


नंदीच सतत धावणे चालू राहते त्या पाण्याचा वेग पावसाने कमी जास्त होतो मात्र ते वहायचं चालूच राहते प्रत्येक गावों गावी ते नदीचे पात्र समावलेलं असतं गाई गुरांना रानवातील पशु प्राण्यासाठी झाडे वेली साठी त्यांची तहाण भागवण्यासाठी नेहमी ते वाहत राहतं, कधी थकत नाही, त्याला साऱ्या जीवाची नक्कीच चिंता असेल असं म्हणायला ही काही हरकत नाही.या सृष्टी मध्ये असे अनेक आहेत ज्यांचा पाण्याच्या थांबन्यामुळे विनाश नक्कीच होइल.मात्र ते सतत आणि सुरळीत चालू राहते.


पाहत होतो या माणसानंकडे

माणसाच्या त्या व्रतीकडे

माणूस मात्र स्वार्थी बनला होता

स्वार्थी बनून एकमेकांना संपवायला

तो टपला होता.


 पण आज माणसे बदलून गेली आहेत नाते जपतांना स्वार्थ पाहूनच जपली जातायत, त्यात माणसं ओळखन खूपच कठीण होऊन बसलं आहे, निसर्गाचा नास करत करत माणसं तिथंच थांबली नाहीत आता ते माणुसकी चा ही नास करत आहेत स्वार्थी स्वभावाने त्यांना एवढं आधाळे केले आहे की त्यांना त्यापासून दूर करणं हे अशक्यच मनायला हरकत नाही, एकाच ताटामध्ये खाऊन त्याच ताटामध्ये ओकणारा काळ आला आहे पूर्वी चा काळ तो निघून गेला आज प्रेत्येक जन इथे स्वार्थी बनला आहे पद पैसा प्रसिद्धी मनातील अनेक चांगल्या वाईट भावनेच्या इच्छा प्राप्त करण्यासाठी माणूस माणुसकी ची हद्द पार करून कधीचाच पुढे गेला आहे, व तो काय काय करेल यांचे अनुमान लावणं ही कठीणच आहे.


Rate this content
Log in