angad darade

Others

2  

angad darade

Others

आई

आई

2 mins
259


    प्रत्येक आई मध्ये एवढं सामर्थ असतं ते मापात मापता येत नाही, कश्याने तोलता येत नाही, आईच्या मायेचे गणित बेरीज तज्ञ महंतानी ही कळनार नाही.भल्या भल्या लेखकांच्या लेखणी सुद्धा संपतील पण ते शब्दात ही लिहिता येन्य शक्य नाही,एक प्रचलित म्हण आहे लोखंडाची साखळी तुटेल पण आई ची माया कधी तुटणार नाही. अशी ती आई आहे.जिचं वर्णन मलाही माझ्या लेखनीने करता येत नाही.या विश्वा मध्ये सर्व काही मिळेल, पण स्वतःची जन्मदाती सोडून कुणाला कितीही प्रेमळ भावनेने माय म्हणलं तरी ती आपली जन्मदाती आई होनार नाही. त्यामुळे बाबानो वेळ अजून गेलेली नाहीये. ज्यांना आई बाबा आहेत त्यांनी आत्ताच त्यांच्या सेवेला लागा.या विश्वात सर्व काही भेटेलच मात्र आई अन बाबा स्वतःचे कधीच मिळणार नाहीत,इतर कुण्याच्या आई ला किती माय म्हणा क्षणिक सुखाचा भास होईल पण ती जन्मदाती होनार नाही. आपल्या आई ला खुप चांगलं संभाळा परिस्थिती कशी असो श्रीमंत असो वा गरिब. तुमच्या आईला फक्त वेळोवेळी पोटभर भाकर व एक प्रेमाचा शब्द आई म्हणलं तरी तिचे पोट भरते. ज्याच्यावर आईचा आशीर्वाद आहे ते सदा सुखी राहिलेले आहेत. आईचा छळ करणाऱ्या पापीष्ट औलादीना नरकात जागा मिळानार नाही.प्रेमात पडून कुणाला प्राण अर्पण करण्यापेक्षा आई बाबा च्या स्वतःच्या प्राणाला अर्पण करा, तो मरणार नाही मात्र त्याचं आयुष्य नक्कीच वाढेल हे मात्र सत्य आहे.


  आपली आई कशी ही असो पण ती आपल्याला देवा पेक्षा कधीही मोठीच असते. पोटच्या बाळा साठी ती सतत कष्ट करत असते. वेंदना सहून असंख्य संकटाना पेलून, मृत्यू सामान यातनाना भिडून आपला ती सांभाळ करत असते. आयुष्यात मध्ये आपल्या आई बाबा नी आपल्या बालपणीे काळा ला हरवून आपल्याला वाचवलेलं असतं बाल वयात जेवढे आई बाबा आपली काळजी करतात तेवढे कुणीच करत नाही. काळाचंही बळ आई पुढे कमी पडत असतं, अशा आई बाबाना कधीच दुःखवू नका


     हे विसरून जाऊ नको मानवा,आत्ताच तुला कळणार नाही. फिरशील वन वन शोधत पुन्हा तू,आई तुज ती मिळणार नाही. गरीब श्रीमंती येईल ऋतूप्रमाणे,वेळ कधीच सारखी असंणार नाही.जगी होतील सर्व नाते तुझे,आई बाबा सारखे कुणी तुझे होणार नाही. आईची सेवा ही ईश्वर सेवे हुन अधिक असते, मंदिरात जाण्याने देव लवकर तुला मिळणार नाही, पण आई बाबा ची सेवा करून पुण्याई घेशील तर देवाला तुझ्या सारखा प्रिय कुणी असणार नाही. आई बाबा च तुझे देव, सदा सुखात त्यांशी ठेव. मनी कधी कुणाचे ऐकूण त्यांचा द्वेष करू नको, पत्नी चा छळ करू नकोस व पत्नीचे ऐकूण आई बाबा चा ही छळ करू नकोस, मानावा आयुष्य छोटं आहे. कधी काय होईल सांगणं कठीण आहे. वेळे आधी सावध हो.देव कुठे शोधू नकोस.तुझ्या आई बाबातच देव आहे हे ओळखुन घे.आईची पुण्याई सतत तुझ्या सोबत राहील, आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ दे आई बाबा च्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल.


  आईच्या सेवेने तिच्या पुण्याईनेच स्वर्ग आणि वैकुंठ आहे मंदिरात एक देव तर घरामध्ये दोन आहेत ते आपले आई बाबा,ईश्वराच्या व आई बाबा कृपने सदा सुखं संम्रर्धी नांदेल देवा पाशी प्रार्थना करा, अन आई बाबा ची सेवा करा यातच आयुष्याचा उद्धार आहे.


Rate this content
Log in