Gangasagar Kadam

Inspirational

3.5  

Gangasagar Kadam

Inspirational

जगावेगळे नाते

जगावेगळे नाते

1 min
207


जगात असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ ; ते म्हणजे आई. आपल्या नशिबात एकही दुःख नसतं जर आपलं नशीब आईने लिहिलं असतं. आईचे गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मीठी ही तिच्यासाठी सर्वात मोठा 'दागिना ' असतो. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात...


जीवन घराच्या भाकरीची चार तुकडे असतात आणि खाणारे पाच जण असतात ; तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे आई. मायेचा सागर असते आई ! जीवनाला आकार देते आई ! हजार व्यक्ती येतील आयुष्यात पण...


आपल्या चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी , डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्री , डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ती फक्त आणि फक्त आई...


पुनर्जन्माची काय पुण्याई असावी आई , जन्म तुझ्या पदरात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला ग आई , नऊ महिने तुझ्या गर्भाशयात वाढलो गं आई... न बोलताही तुझ्या लेकराला काय हवं हे समजून घेतेस ग तू आई... आपल्या सुखा दुखात जीवनातलं कठीण प्रसंगात आपल्या सोबत असते ती फक्त आणि फक्त आई. देवाकडे काही मागत असताना प्रथम आईसाठी आयुष्य मागा ;तुमचे आयुष्य आपोआप वाढेल !

तात्पर्य. -: आई सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमचा खरा मार्गदर्शक आईच असते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational