Monalisa Guje

Inspirational

4.1  

Monalisa Guje

Inspirational

गर्व कबुतराचा

गर्व कबुतराचा

1 min
334


आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली. स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला. झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला. कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली. कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली.


कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं. पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला. कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाणा चुकायचा. म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला. कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational