Monalisa Guje

Children Stories Inspirational

3  

Monalisa Guje

Children Stories Inspirational

जिद्द

जिद्द

2 mins
299


खूप दिवसान पूर्वीची गोष्ट आहे. सर्कस पाहण्यासाठी मी आणि माझे सहकारी गेलो होतो. सुरू होण्यास आणखी वेळ असल्याकारणाने आम्ही आजू बाजूच्या आंगणात फेरफटका मारू लागलो.

वेगवेगळ्या जनावरांना पाहता पाहता अचानक नजर पडली एका मोठ्ठ्या हात्ती वर, केवढा मोठा होता तो अगदी त्याने ठरवले तर सगळं उध्वस्त करून टाकू शकतो हे मोठ्ठे खांबा सारखे पाय, अशी त्याची प्रतिमा होती. पण आणखी थोडे जवळ जाऊन पहिल्या वर लकशात आले की त्याला मात्र बेड्या न्हवता, तर त्याच्या पायात फक्त एक साधी रशी बांधलेली होती. तो पिंजऱ्यात देखील ठेवलेला न्हवता.

हा ऐवढा शक्तिशाली, बलवान कधीही ती साधी रशि तोडून तिथून पळून जाऊ शकला असता, पण केवळ एक बारीक अश्या रशी तो आडून राहिला? हा प्रश्र्न मला सतावू लागला.

जवळच ह्या हत्तीला प्रशिक्षण देणारा माणूस होता. मी हिम्मत करून त्याला विचारले.

हा हत्ती एका झटकयात ही रशिी तोडू शकतो.मग हा असे करत नाही का?

त्यावर त्याने मला उत्तर दिले

"जेव्हा हा हत्ती पिल्लू होते तेव्हा आकाराने देखील लहान होता, त्या वेळी आम्ही ही राशी वापरायचो, त्याच्या त्या वयात ही त्याला बांधून ठेवण्यासाठी भरपूर होती, जसा तो मोठा होत गेला, त्याचा विश्वास दृढ झाला. की तो कधी ही राशी तोडू शकणार नाही. त्यामुळे तो आता प्रयत्न ही करत नाही"

हत्तीं स्वतःला सोडवत न्हवताआणि छावणीतून पळून न जाण्याचे एकमेव कारण म्हणजे कालांतराने ते शक्य नाही असा विश्वास त्यानी स्वीकारला.

जगाने आपल्याला पाठीशी घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण नेहमी जे काही प्राप्त करू इच्छित आहात ते शक्य आहे या विश्वासाने प्रयत्न नेहमीच सुरू ठेवा. आपण यशस्वी होऊ शकता यावर विश्वास ठेवणे ही वास्तविकता यश मिळविण्यातील सर्वात महत्वाची पायरी आहे.


Rate this content
Log in