धुकं
धुकं

1 min

349
रोजचा मार्ग या रस्त्यावरून अनेक लोक प्रवास करतात . त्यांना अगदी पाठ झाला आहे हा रस्ता.
पण आज आजची सकाळ थोडी वेगळी आहे कारण सगळीकडे मी आहे. मी धुकं.
आता फक्त माणसांना पाहतोय. काहींनी आपल्या गाडी चे दिवे चालू केलेत, इतरांनी वेग कमी केलाय. छान व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी चालवत आहेत पण अरे हे काय.
हेडलाईट नाही, इंडिकेटर नाही आणि एवढा वेग. आता हा धडकणार. धडकला!!
ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात ह्याला. आपल्या समोर जर कधी संकटे आली तर घाबरायचं नाही त्याला सामोरं जायचं पण व्यवस्थित विचार करून, असे जर बेधडक काहीही तयारी न करता कोणाचाही सल्ला न घेता सरळच पुढे निघालो तर अपघात होणं नक्की आहे.