एकविसाव्या शतकातील स्त्री
एकविसाव्या शतकातील स्त्री
एकविसाव्या शतकातील स्त्री व आव्हाने
बहुरुपात वावरताही
भाव नसतो कधी सक्तीचा !
अभिमान म्हणूनच नेहमी
वाटतो मला स्त्रीशक्तीचा !
एकविसाव्या शतकातील आजची स्त्री अठराव्या व एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील स्त्री पेक्षा खूप वेगळी आहे. तिने समाजजीवनावर आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. तिने आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाण समाजाला करून दिले आहे. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री ही आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारत आली आहे . तिने आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची या समाजाला करून दिले आहे. स्त्री एक माणूस आहे आणि कोणते क्षेत्र तिला अप्राप्य नाही हे तिने सिद्ध करून दाखवली आहे. आधीची स्त्री चूल आणि मूल हे तिचे कार्यक्षेत्र कोणत्या चुलीवर ही व मुलावर ही तीचा अधिकार नव्हता.
मात्र आजच्या स्त्रीने नवेरुप जगाला दाखवून दिले आहे. ती भारताची, इंग्लंडची पंतप्रधान होऊ शकते. त्या अधिकारी होऊ शकते. एकविसावे शतक स्त्रीला खूप काही दिले आहे. मुख्य म्हणजे आत्मविश्वास. आजच्या युगात स्त्री ही विचारी आहे, ती काळानुसार बदलू पाहत आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री महदंतर आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग जातो आहे तो विकासाकडे, प्रगतीकडे, वैभवाकडे.
जी स्त्री हाताने भाकर बनवू शकते त्याच हाताने देशाची सत्ता सुद्धा चालू शकेल. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून. भारतीय नौसेनेत काही स्त्रिया वरच्या जागेवर आहेत. याचा अर्थ स्त्री पुरुष इतकेच निर्भय, कणखर, धैर्यशील कार्यशील राहू शकणार आहे. ही झाली नाण्याची एक बाजू आता एकविसाव्या शतकातील स्त्रियांची आव्हाने पहिले तर खुर्ची स्थितिशील असते तर पुरुषांच्या खुर्चीला पण असतात. आणि उर्धगामी असते. दुय्यमत्व फक्त स्थानात नसते ते दृष्टीत असते, वृत्तीत असते, प्रत्यक्षात दर्जात, यातील वाईट भाग असा आहे की कळत नकळत स्त्रियांनी ते स्वीकारले नसते तर मिळालेल्या स्थानाबद्दल आणि तिच्या मनात पुरुषाबद्दल कृती तिची भावना असते नवरा काही आपल्याला सवलती देतात कुटुंबीय आपल्याला नोकरी-व्यवसायाच्या काळात बाहेर जाऊ देतात वगैरे गोष्टी बदलत स्त्रीने उपकृत केली जाते पण आपल्या क्षमतेनुसार कौशल्यानुसार नोकरी व व्यवसाय करणे हा आपला हक्क आहे आणि तो कोणाच्या कृपेवर नव्हे तर व्यक्ती म्हणून ती बजावण्याचा अधिकार आहे.
एकविसावे शतक पदार्पण केले चंद्रावर जाण्यासाठी म्हणे बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे. केली पण आधी आपले विचार निश्चित गरजेचे आहे
विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली पण आजही स्त्रीला आव्हाने पेलावेच लागतात. उच्च तंत्रज्ञानासाठी क्षेत्रात प्रगती केली पण आजही आपले विचार नीचे दर्जाची ही स्त्रीला पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. मुलींना बाहेर पडताना ॲसिड हल्ला, बलात्काराच्या गोष्टींना सामोरे जावे लागते आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का?
मुलगा न झाल्यास मुलगी झाल्यास नातलग शोक करताना दिसतात म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.
लहानपणापासूनच असा भेदभाव केला जातो मुलांना दिली जाणारी खेळणीसुद्धा न्यूनगंडाची भावना निर्माण करतात.मुलांना मोटार विमान अशी खेळणी दिली जातात तर मुलींना बाहुली दिली जाते स्त्री ही व्यक्तित्व नव्हे ती एक वस्तू खेळणी आहे याची जणू शिकवणच असते. लहानपणीच घरात सती , सावित्री, पार्वती, सीता यांच्यासारखे गोष्टी घरात सांगितल्या जातात.
पार्वती पतिव्रता होती हे नेहमी मनावर बिंबवले जाते पण तिचा कणखरपणा तिची जिद्द वाखाणणी कोणीच करत नाहीत. या जगाच्या रथाची दोन चाके आहेत ती म्हणजे स्त्री आणि पुरुष परत व्यवस्थित चालवायचा असेल तर दोन्ही चाकी सारख्याच गतीने चालवण्यासाठी स्त्रीरूपी चालकास सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे स्त्री स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम असली पाहिजे.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय स्त्री सशक्तीकरण!
