आयुष्य
आयुष्य
एवढं आयुष्य स्वस्त मिळते का? आणि आपण खरचं कुणाचे आयुष्य एवढं स्वस्त करू शकतो का ? आयुष्याला काही किंमत राहिली नाही का ? एवढ्या लवकर आयुष्य संपवण्याचा विचार का करावा लागतोय ? अजुन तर जगण्याची सूरवात होती ना मग का हा शेवटची वाट धरण्याचा मानस ? आपले आयुष्य तिच्या / तिच्यावर अवलंबून आहे का ? आयुष्याला संपवण्यासाठी प्रेम करता का ? नैराश्य प्रेमातून मिळवण्याची गोष्ट आहे का ? आयुष्य उद्ध्स्त करण्यासाठी प्रेमाच्या आणा भाका का ? सुंदर आयुष्य मातीमोल करताना कुठलही सकारात्मक विचार येत नाही का ?
अश्या असंख्य प्रश्नांची यादी आज समोर उभा राहते आहे ! कारण वयाच्या 22 व्या वर्षी टीकटॉक ते इंस्ट्राग्राम रील्स असे प्रसिद्ध होण्याचा मान ज्याने अवघ्या काही काळात अलगद मिळवला तो आपल्या शब्द कला आणि स्टाईल चा जोरावर समीर गायकवाड व्हायरल झाला तेवढाच त्याचा चाहता वर्ग पण निर्माण झाला पण दुर्दैव हे की, काल सायंकाळी तोच समीर गायकवाड राहत्या घरी आत्महत्या करतो आणि शेवटी पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या आत्महत्येचे प्राथमिक कारण हे त्याचे प्रेम आहे असे स्पष्ट करतात...!
तेव्हा त्या समीरच्या वयाच्या आपल्या पिढीला बोलण महत्वाचे वाटू लागते त्यासाठी हा शब्द प्रवास माझ्या तमाम मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या सोबत एक जिवाभावाचा मित्र समजून समजून घ्या.. थोडा काळ जगायचे आहे सगळ्यांना मग का या थोड्या आयुष्यात शिल्लक कारणांनी आयुष्य उद्धवस्त करताय... मान्य हे वय प्रेम, मौज, मजा मस्ती आवडी निवडीचे आहे. म्हणुन डोळ्यांना आवडेल ते काळजावर गोंधत असाल तर आत्मपरीक्षण करा. (हे सांगण्याइतपत मी मोठा अजिबात नाही तरीही माफी मागुन सांगतो आहे. ) खूप कमी वयात सिद्ध होण्यापेक्षा प्रसिद्धीच्या मागे धावणे हे लक्षण सुंदर आयुष्याचे कधीच नसतात.... मान्य करु की माणुस प्रेमातुन खुप काही शिकतो पण प्रेमातून काही कारणास्तव आलेले दुरावे जर तुम्हाला नैराश्याच्या गर्दीत घेऊन जात असेल तर तुमच्या प्रेमाचा हा अपमान आहे हे समाजवुन घ्या.
जर तुमच्या प्रेमातून शेवटी वाद विवाद शंका कुशंका विश्वास अविश्वास जन्म घेणार असेल आणी हत्या आणी आत्महत्येसारखे शेवटचे टोकाचे पाऊल उचलणार असाल तर कोणालाही प्रेम करण्याचा अधिकार नाही. तिचा नकार आला म्हणून आत्महत्या तर कधी तिच्यावर हल्ला, तिची बदनामी, तिच्यावर अत्याचार, तिला त्रास, तीची हत्या तर तीच्यावर बलत्कार करण्याचा विचार करणारी मानसीकता जर तुमच्यात असेल तर एक लक्षात ठेवा तुमचे प्रेम नव्हते नाही आणी नसेल असेल ती फक्त आणी फक्त वासना आणी वासना... सुखाचे दुसर नाव प्रेम मग तुमच्या प्रेमात जर यातना वेदना शोध प्रतीशोध किंवा स्वताःचा आत्मघात असेल तर सरळ सरळ व्यवहार झालाय प्रेमाचा...
राहीला प्रश्न समीर गायकवाडचा तर एक कलाकार गमावला असेच मी म्हणेल कारण तीच्या वरहातुन जन्मास आलेला एक 15 सेकंद विचार मांडणारा रिल वरील विचारवंत, 15 सेकंद व्हिडोओ पोस्ट केल्याने प्रसिद्धी मिळते पण आयुष्य कुणाचे सिद्ध झाले ते कळवा. प्रसिद्धी पोट नाही भरत कधीच. खुप चांगले राहणे, दिसणे, बोलणे कला प्रदर्शित करणे यातुन आतील नैराश्य कळत नाही पण ते नैराश्य माणसला मारते. रिलवर विचार मांडत मोटिव्हेशन देणारे रियल लाईफ मध्ये पराभुत असेल तेही एण तारुण्यात तर हा दोष वयाचा नाही तर वयापेक्षा आलेल्या जास्तीच्या शहाणपणाचा आहे. कारण वरवर कितीही आनंद व्यक्त करा हो पण आत पोखरेलेला माणूस त्याच काय ? सोशल मिडीया वापरतांना आपण किती वेळ समाज कुटुबांला देतो याचा विचार केलाय का ?
नैराश्य कुणाला येत नाही असे कोणीही नाही. सगळेच जातात यातुन मी ही अनेकदा गेलोय यात शंका नाही पण यातुन बाहेर पडणे जर जमत नसेल तर आपण यंत्रमानव झालो असेच समजावे लागेल. आता आता प्रेमात पडणारी आपली पिढी एवढ्या लवकर प्रेमातून असले टोकाचे पाऊल उचलण्यासाठी आपल्याला तयार करत असेल तर हा शुद्ध आपला मेंदु कृत्रीम झालाय. नैराश्याचे शवटाचे पाऊल आत्महत्या कसे असू शकते. नैराश्यातून आत्महत्याचा विचार आल्यावर ज्यांना डोळ्यासमोर आईबाप दिसत नाही त्यांनी विचार करावा यात आपल्या आईबापाचा काय दोष ? काही दिवसात आलेल्या आणी गेलेल्या प्रेमासाठी जर जग सोडण्याचा विचार करणारी तरुण पिढी काय देशाचे भविष्य होणार ? कारण काय तर आमचे प्रेम संपले ? पण हे कधी कळणार की, खर प्रेम कधीच संपत नाही. नैराश्यातून कलाकार, कधी महान व्यक्ती जन्माला येतात पण हल्ली तर नैराश्यातून हत्या आणी आत्महत्या होत असेल तर नक्कीच कुठतरी तरुणांचे चुकत आहे.
हा जन्म पुन्हा पुन्हा नाही हे माहीत असुनही नकार न पचवू शकणारे, प्रेमात धोका मिळणारे जर आत्महत्येपर्यंत जात असतील तर हे दुर्देव आहे तुमचे आमचे की आपल्याला अजुनही प्रेम कळत नाही. एक विचारवंत असे म्हणतो की, मला तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठावरचे गाणे सांगा मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो. मग आपल्या ओठावरील गाणे कोणते. तीच्याकडे पाहीले आणी तिने तोडं वाकडे केले म्हणुन बेवफा तेरा मासुम चेहरा भुल जाने के काबील नही असे म्हणत बोबंलत फिरणारे काय देशाचे भविष्य असणार हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आज आपल्या समोर आहे.
मुळात सर्वात मोठा विचार काय तर, ज्यांच्या डोळ्यासमोर ध्येय, ज्यांच्याकडे आत्मविश्वास, ईच्छा आणी डोळ्यासमोर आईबाप म्हणुन प्रेरणा व आदर्श असतील त्यांच्याकड़े नैराश्य हिंसक विचार कधीच येत नाही हे लक्षात घ्या. आत्महत्याचा विचार करणारी माणस कधीच यश संपादन करत नाही मग माझ्या मित्र आणी मित्रांनो विचार करा तुम्ही कोणता विचार करता ? 15 सेकंद अभासी विश्वात वावरतांना स्वतःला खुप मोठ व्यक्तीमत्व समजण्याचा मुर्खपणा कधीच कर नका. तुमचे फॅन्स फक्त 2 बोटांचे धनी आणी साथीदार आहेत एक लाईक आणि एक कमेंट पुरते असतात. पण दवाखान्यात वेळप्रसंगी कोण उभा राहू शकते त्यांची काय ग्वाही. खोटेपणाचा आव आणुन मोठ होण्याच्या नादात नैराश्याच्या जत्रेत आयुष्य विक्री करु नका. प्रेमात पडा प्रेम पण लायकीत राहून आणी लायकीनुसार करा आणी लायकी असलेल्या व्यक्तीवर करा नाहीतर नालायका सारखे मरावे लागते. एक व्यक्ती गेल्याने किंवा आल्याने आयुष्य बदलत असाल तर तुम्ही यंत्रमानव झालात प्रेमात.
काळाच्या ओघात वाहत जाऊ नका काळाबरोबर झुंज देण्यासाठी नेहमी तयार रहा फक्त नैराश्य आले की, आपल्यातील सुप्त गुण ओळखुन त्यानुसार वावरा आपल्यातील सकारत्मकता जागृत ठेवा सत्सक विवेक बुद्धीन विचार करा आणी जगायल सुरवात करा. प्रेम आयुष्यभर सोबत असेल नसेल तरीही ते असेल तरी आनंदाणे जगा नसेल सौबत तरीही आनंदाने जगा उगाच व्देष देऊन घेऊन आयुष्य लयास जाऊ देऊ नका ही एक नम्र विंनती... मला हे सगळ लिह्ण्यासाठी पगार नाही पण तुमच्या सगळ्या बद्दल आत्मीयता आहे कारण तुम्ही सगळे तरुण योद्धे आहात जे ध्येयासाठी लढत आहात त्यात तुम्हालाही कधी या परिस्थितीतून जावे लागले तर हे वाचा आणी विचार कर उत्तर मिळेल हे मोटीव्हेशन नाही हे सगळ वास्तव आहे ते वास्तव म्हणून स्वीकारा...
