एक दिवा लावू ज्ञानाचा
एक दिवा लावू ज्ञानाचा
दिवा आरोग्याचा सुख - समृद्धी
अन् शांतीचा लावू या,
समता अन बंधू भावाच्या प्रेमात
सर्वजण चला न्हावूया. ॥१॥
धैर्य, बळ अन कष्टाचा
दिवा सर्वांच्या हाती देऊ या,
त्याच्या प्रकाशामधुनी
मार्ग प्रगतीचा मग काढू या .॥२॥
अंध:कार नष्ट करण्यासाठी
एक दिवा सर्वांनी लावू या,
नैराश्याने ग्रासलेल्या मनात
आत्मविश्वास चला जागवू या. ॥३॥
अज्ञानरुपी अंध:कार
समूळ नष्ट करु या,
ज्ञान- विज्ञानाची कास धरूनी
ज्योत मनामनांत पेटवू या. ॥४॥
प्रत्येकाने तेवत ठेवावा
एक दिवा आपुल्या आत ,
त्यात माणूसकीचं तेल अन
वात्सल्याची असावी वात. ॥५॥
ज्योतीने ज्योत पेटवू या
ज्ञानाचे दिवे लावू या,
लक्ष दिव्यांच्या प्रकाशात
घरं - दारं सारी उजळून टाकू या. ॥६॥
लॉकडाऊन झाली गावं अन् शहरं
ठप्प झाले होते मग सारेच व्यवहार,
तळहातावर पोट असणाऱ्यांना
मदतीचा देऊ चला मग आधार. ॥७॥
