Akshay Kamble

Romance Tragedy

3  

Akshay Kamble

Romance Tragedy

एक असाही शेवट....

एक असाही शेवट....

10 mins
813


    काही वर्षांपूर्वीची गोष्ट. परगावी शिक्षणासाठी असलेला आनंद काही दिवसाच्या सुट्टीवर स्वतःच्या गावी येतो. आनंदच्या चांगल्या स्वभावामुळे गावात त्याचा चांगल्या लोकांशी संपर्क असे. आपल्या गावासाठी व समाजासाठी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे बदल घडवून आणता यावा असा त्याचा विचार होता. त्याच्या घरात आई, वडील आणि तो एवढाच परिवार होता. त्याचे वडिल हे शेतकरी होते व आई ही गृहिणी होती. त्यांनी शेळ्या पाळल्या होत्या. 

      आनंदचा गावी आलेला पहिला दिवस मित्रांबरोबर व गावातील लोकांच्या सानिध्यात निघून गेला. दुसर्‍या दिवसापासून तो शेळ्यांना रानात चारायला नेण्याचे काम करायला लागतो. सकाळ व संध्याकाळ दोन वेळेला आनंदचं शेळयांना रानात चारायला घेऊन जायचा. शेळयांना रानात घेऊन गेल्यावर तो रानातील पक्ष्यांचे आवाज ऐकत बसत, रानटी प्राणी बघणे, रानात गाणी गुणगुणत बसत, कधीकधी अभ्यासाचे साहित्य सोबत घेऊन जात व रानात बसून अभ्यास करत, तर कधी मित्रमैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत बसत. अशाप्रकारे तो रानात गेल्यावर वेळ घालवत. त्याने रानात गेल्यावर बसण्यासाठी काही ठराविक जागा शोधून ठेवल्या होत्या. 

          एकेदिवशी तो असाच शेळयांमध्ये रानात गेला असताना त्याचे एक बसण्याचे ठिकाण आंब्याचे झाड होते. तो बसायचा त्याच झाडाखाली त्यादिवशी एक मुलगी येऊन बसली होती. रानाच्या वरच्या बाजूला शेळ्या लावून तो त्या झाडाखाली जाऊन बसतं. परंतु, त्यादिवशी त्याचे लक्ष आंब्याच्या झाडाखाली गेलं तर तिथे एक मुलगी येऊन बसली होती. आनंदला मनात असं वाटत की, ही मुलगी कोणाला तरी भेटायला आली असेल तर आपण काही वेळ इथेच थांबू जेणेकरून तिला त्रास होवू नये. असाच अर्धा तास निघून जातो. तरीसुद्धा तिला कोण भेटायला आलेलं नसत मग शेवटी तोच त्याच्या जागेवर बसण्यासाठी त्या झाडाच्या दिशेने जातो. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. त्यातील काही प्रश्न ती मुलगी कोण असेल? कुठून आली असेल? का आली असेल? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत असतात. कारण, एवढे दिवस तो रानात शेळ्या घेऊन येत आहे. परंतु, कधीच त्याला एकटी मुलगी दिसली नव्हती. त्यामुळे त्याला जरा घाबरल्यासारखं होतं असं करत तो त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहचतो. तो आल्याचं बघून ती मुलगी दचकून उठून उभी राहते. तेथेही काही वेळ शांततेत जातो. कारण, दोघांमध्ये कोणीही काहीही बोलत नाही. मग न राहून आनंदचं सुरुवात करतो. 

    तो तिला कोण तुम्ही? कुठून आलात आणि इथे कशाला आला आहात असे प्रश्न विचारतो. आनंद, मी अनु, मी तुमच्या शेजारच्या गावची आहे. मी मुंबईला असते . माझं सर्व शिक्षण सुद्धा मुंबईलाच झाल आहे. काही दिवसांसाठी मला माझे बाबा गावी घेऊन आले आहेत. माझी आईच तीन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. आनंदच्या मनात पाल चुचकते की, या मुलीला माझं नाव कसं माहित, तिला तर मी आज प्रथमच पाहतोय . शेवटी मनात आलेली शंका तो तिला विचारतो. तर ती बोलते, या रानाच्या खालच्या बाजूला आमचं शेत आहे तिकडं मी शेतीतील कामासाठी दोन -तीन दिवस झाले येत आहे. तेव्हापासून मी तुम्हाला पाहत आहे. तुमच्याबरोबर दुसरे गुराखी असतात त्यांनी तुम्हाला हाक मारली होती तेंव्हा तुमच नाव मला माहित झाले. तुमचा स्वभाव व विचार छान आहे आणि आवाजसुद्धा. तुमचं फोनवरचं बोलण मी नकळत त्यादिवशी ऐकलं त्यावरुन मला अस वाटलं. तो पुन्हा तिला प्रश्न विचारतो, परंतु तुम्ही आज अचानक इकडे का आलात? 

      अनु सांगते, म्हटलं की एवढा छान आणि सुंदर विचारांचा माणूस आहे. आज त्यांना भेटूनचं यावं म्हणून आले. आता अनु, आनंदला प्रश्न विचारते, की तुम्ही मलाच प्रश्न विचारताय तुम्ही पण तुमची माहिती सांगा की मला. आनंद सांगतो, मी तुमच्या शेजारच्या गावचा आहे. मी शिक्षणासाठी परगावी असतो. काही दिवसांच्या सुट्टीवर मी गावी आलो आहे. माझ्या घरी माझे आईवडील व मी आम्ही तिघेजण असतो. आणि आम्ही शेळ्या पाळल्या आहेत. आईवडिलांना जरा मदत म्हणून रोज शेळयांना चारायला रानात घेऊन येतो. अनु म्हणते, तुमचं विचार छानच आहेत. आणि कुटुंबसुद्धा. बरं, मी निघते. उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटायला याचवेळी येईन. अशाप्रकारे अनु, आनंदचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते. परंतु, आनंदला अस वाटू लागत की, आपण एवढा संवाद साधला की खूप दिवसांपासून आपली तिच्याशी मैत्री आहे. आणि तो तिच्या विचारांत गुंतून जातो. 

         पुन्हा दुसर्‍या दिवशी त्याचवेळी अनु त्याच आंब्याच्या झाडाखाली येऊन बसते. परंतु, आज ती आनंदच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते. त्यामुळे आनंद तिथे पोहचताच तिला पाहून भारावून जातो. आणि तो स्वतःला विसरून तिच्यामध्ये गुंतून जातो. एकमेकांच्या आवडी -निवडी, छंद, करीअर याबद्दल त्यांच्यात बोलणं होत. 

 अनु ही एक कॅन्सरग्रस्त मुलगी असते. परंतु, याबद्दल ती आनंदला काहीही सांगत नाही. 

 कारण, तिला आयुष्यातील उरलेले दिवस आनंदाने, उत्साहाने जगायचे असतात. तिला स्वतःला आनंद देऊन त्याच्या बरोबर समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद द्यायचा तिचा प्रयत्न असतो. त्यामुळे उरलेले काही दिवस ती आनंदच्या सानिध्यात घालवण्याचे ठरवते. अनु, ही स्वभावाने व मनाने प्रेमळ, समजुतदार, काळजीवाहू, कष्टाळू मुलगी असते. स्वतःच्या परिस्थितीवर व दुखावर विचार करत न बसता दुसर्‍यांच्या आनंदात आपला आनंद मानून आयुष्य जगायचे. जेणेकरून उरलेले दिवस सुंदर आणि मजेशीर जातील.

     याच विचाराने ती आनंदच्या आवडीचा स्वयंपाक करून एका डब्यात घेऊन येते. आंब्याच्या झाडाखाली येऊन ती त्याची वाट बघत बसते. आज आनंदला आनंदाने ती आपल्या हाताने जेवण भरवणार असते. अशात काही वेळातच तो तिथे येऊन पोहचतो. ती त्याला डोळे बंद करायला सांगते आणि त्याच्या समोर स्वतः आणलेला डबा उघडून ठेवते. त्याला डोळे उघडायला सांगते.हा सर्व प्रकार पाहून तो प्रफुल्लित होऊन जातो. ज्या आनंदाची अनुला गरज असते तो तिला मिळतो. अनु, त्याला आपल्या हातांनी काही घास भरवते. या क्षणाने ते दोघेही आनंदाने व प्रेमाने भारावून जातात. त्या दोघांच्या चेहर्‍यावर फक्त आनंदी आनंद फुलेला असतो. त्यामुळे अनुच्या मनात या आनंदाबद्दल समाधान असतं. 

      अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातील काही दिवस निघून जातात. दररोज ती दोघं नवनवीन कल्पना आणि गोष्टी करून एकमेकांना आनंद देतात. अनुच्या अशा स्वभावामुळे आनंदसुद्धा आपल्या आईकडून तिच्या आवडीचे जेवण बनवून डब्यात घेऊन येतो. ते जेवण अनु मनसोक्त आनंदाने खाते. कारण, तिला आईचं प्रेम मिळालेले नसते पण, आज आनंदमुळे आईच्या हाताची चव चाखायला मिळते. आणि आनंद मुळे आईच्या हातचं जेवण तिला रोज मिळत त्यामुळे ती खूप मनसोक्त आनंदी असते. एकमेकांच्या आनंदात, सुखात एकमेकांना सामावून ते आपलं आयुष्य सुखदायक बनवतात आणि नातं घट्ट करतात. त्यांना एकमेकांबद्दल जवळीक, आपुलकी, आपलेपणा, आधार, विश्वास, प्रेम वाटू लागते. या काळात ती एकमेकांसाठी जीव की प्राण बनून जातात. यात आनंदला अनुचं खर आयुष्य माहित नसत. पण, त्याला तिच्याबद्दल व तिच्या परिस्थितीबद्दल जाणीव असते. तो तिच्या मनासारख वागतो, वावरतो. एकमेकांचे मन राखून ती दोघं आपलं आयुष्य सुखात व सुंदर जगत असतात.

असेच त्यांचे काही दिवस मनसोक्त आनंदात व सुखात निघून जातात. काही दिवसांनंतर एकेदिवशी आनंद शेळ्या घेऊन रानात जातो व तो त्या आंब्याच्या झाडाखालच्या जागेवर जाऊन बसतो. तो खूप वेळ अनुची वाट पाहतो. परंतु, तिचा दररोज येण्याची वेळसुद्धा निघून जाते. ती त्यादिवशी रानात आनंदला भेटायला येत नाही. यामुळे आनंदचं मन अस्वस्थ व काळजीने कासावीस होते. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. नक्की काय झाले असेल? अनु, आज का आली नाह? घरात काही कळल नसेल ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत असतात. तिच्यासाठी आणलेला डबा तो तसाच घेऊन घरी जातो. आईच्या नकळत तो डब्यातील जेवण व्यवस्थित घरातील जेवणाच्या भांड्यात काढुन ठेवतो. व तो न जेवता एकांतात जाऊन एका शांत जागी बसतो व सतत अनुचा विचार करत बसतो. तो त्यादिवशी घरात शांतपणे विचार करत बसतो. कोणाशीही काहीही बोलत नाही. जेवण करत नाही. अशा वातावरणात आनंदचे दोन दिवस निघून जातात. तो अनुच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याला असे वाटते की, आपल्या तिच्या घरी जाण्याने तिच्या आयुष्यात अजून अडचणी येतील. व त्यामुळे तिला जास्त त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे तो न जाण्याचा निर्णय घेतो. 

        तिसऱ्या दिवशी तो पूर्णपणे अगोदर विचार करून रानात शेळ्या चारायला घेऊन जातो. आज अनु भेटायला आली तर तिला आपल्या मनातलं सगळं सांगायच. असाच सर्व विचार करून तो रानात शेळ्या घेऊन जातो. आज अनु, त्या आंब्याच्या झाडाखालच्या जागेवर लवकर येऊन बसलेली असते. आनंदच्या येण्याची वाट पाहत. परंतु, ती आज खूपच अस्वस्थ असते. कारण, ती तिच्या आजाराच्या त्रासाने वैतागून गेलेली असते. तो आजार आता जास्त प्रमाणात वाढलेला असतो. आणि तिला डाॅक्टरांनी दिलेले आयुष्याचे दिवस सुद्धा कमी राहिलेले असतात. यामुळे ती आज खूपच अस्वस्थ झालेली असते. 

          आनंद, त्या आंब्याच्या झाडाच्या काही अंतरावर येऊन पोहचतो तोच त्याला अनु आलेली दिसते. त्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलते. तो त्याच जोशात तिच्या दिशेने जातो. परंतु, तिच्याजवळ पोहचताच तिचा अस्वस्थ चेहरा पाहून त्याचे हसू क्षणातच निघून जाते. यात तो स्वतःला सावरून तिची विचारपूस करतो. तिला तु दोन दिवस मला भेटायला रानात का आली नव्हतीस? असा प्रश्न विचारतो. अनु, जी गोष्ट आनंद पासून लपवत असते तिचं गोष्ट त्याला आता सांगावी का? या प्रश्नाचा ती मनात विचार करते. ती स्वतःला सावरत आनंदला सांगू लागते,

    आनंद, मी तुला दोन दिवस भेटायला आली नाही कारण, घरातील वातावरण जरा बिघडलं होतं आणि माझे बाबा जरा आजारी असल्यामुळे मी तुला भेटायला आली नव्हती. अशाप्रकारे ती आज सुद्धा आनंदला खरं कारण सांगत नाही. जेणेकरून त्याला त्रास होऊ नये म्हणून ती सांगत नाही. आनंदसुद्धा तिला आज खूपच अस्वस्थ असल्यामुळे समजून घेतो. तिला बोलतो की, मला तुला काही तरी सांगायच आहे. ती बोलते, सांग मग बिनधास्त जे तुला सांगायच आहे ते. तो बोलू लागतो, अनु, तु माझ्याशी लग्न करशील का?

 तु माझी अर्धांगिनी होशील का? अनु, पुन्हा काही क्षणासाठी अस्वस्थ होते. तिला आनंदला काय सांगावे आणि काय बोलावं तेच कळेनासे होत. तिला तिच्या आयुष्यातील परिस्थिती बदल आनंदला सांगायच नसत. मग ती एकमेकांच्या जातीचा आधार घेत त्याला बोलते, अरे,आनंद तुझी आणि माझी जात वेगवेगळी आहे. त्याला आपलं दोघांच लग्न होऊ शकत नाही. मग तो तिला बोलतो, अगं, प्रेम हे सर्वश्रेष्ठ भावना आहे. त्यात आपल्या जाती वेगळ्या असल्याने काही अडचण होत नाही. त्यात आपलं प्रेम महत्वाचं आहे. आपण चांगल्याप्रकारे करीअर करू नंतर पुढील निर्णय घेऊ. आपण दोघे एकत्रित येऊन सर्व गोष्टी व्यवस्थित करूया आणि सगळ्या गोष्टी नक्की व्यवस्थित होतील. 

      अनु बोलते, अरे, हो तुझं सगळं बरोबर आहे. पण, मला विचार करायला जरा दोन दिवस वेळ दे. मी तुला नक्की उत्तर देईन. तो बोलतो, अनु, तुला जेवढे दिवस वेळ घ्यायचा आहे तेवढे दिवस वेळ घे. पण, मला नक्की उत्तर दे. अनु, मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. अनु, ही त्याचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते. दोन दिवस ती पूर्णपणे सर्व गोष्टींचा विचार करते. तिच्या मनात सतत असा विचार येतो की, तु एका शांत ,भावनिक, हुशार मुलाला फसवू नको. त्याला जे खरं आहे ते सांग. जेणेकरून दोघांना ही कमी त्रास होईल. आपल्याला आनंदच्या समोरासमोर या सर्व गोष्टी व्यवस्थित बोलता येणार नाहीत. त्यामुळे आपण त्याला पत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लिहून देऊ. ती असा विचार करून आनंदसाठी पत्र लिहिते. त्यात ती घडलेल्या सर्व घटना, गोष्टी व खरी परिस्थिती मांडते. 

     अशाप्रकारे ती पूर्णपणे व्यवस्थित पत्र लिहून ते पत्र घेऊन ती दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदला भेटायला जाते. आज त्या दोघांची शेवटची भेट होणार असते. त्यामुळे अनु, आनंदच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते. तो सुद्धा आज लवकरच तिला भेटायला आलेला असतो. ती त्या नेहमी भेटण्याच्या जागेवर पोहचते. ती आल्याबरोबर आनंद तिचे स्मितहास्य करीत गुलाबाचे फूल देऊन स्वागत करतो. ती त्याच्या स्वागताचा मनापासून स्वीकार करते. तेही स्वतः स्मितहास्य करून गुलाबाच्या फुलाचा आनंदाने स्वीकार करते. त्यानंतर अनु बोलायला सुरुवात करते आणि त्याला समोरासमोर काही गोष्टी सांगते. काही क्षणांनी खूप भावनिक होऊन आणि स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत. ती निशब्द होऊन त्याच्या हातात तिने लिहिले पत्र देते व ती शेवटी एवढेच बोलती की, आनंद ही आपली शेवटची भेट आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या पत्रात आहेत त्यामुळे हे पत्र नक्की मनापासून वाच व एक आठवण म्हणून हे पत्र आयुष्यभर जपून ठेव. स्वतःची व्यवस्थित काळजी घे आणि घरच्यांचीसुद्धा वेळोवेळी काळजी घे आणि ज्यांच्यामुळे आपली भेट झाली, ओळख झाली, आनंदात दिवस घालवले त्या तुझ्या लाडक्या सर्व शेळयांना जप आणि त्यांची सुद्धा चांगली काळजी घे. एवढं बोलून अनु, तिथून निघून जाते. ती कायमची......

  अनु, तिथून निघून गेल्यावर आनंद तिने दिलेले पत्र वाचू लागतो. त्या पत्रातील काही ओळी -

  प्रिय, आनंद...

            मी तुझी खरचं खूप मोठी गुन्हेगार आहे. आजपर्यंत मी तुझ्यापासून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट लपवली होती. ती मी तुझ्या समोरासमोर सांगू शकलो नसतो म्हणून हे पत्र लिहिले. आनंद, मी एक कॅन्सरग्रस्त मुलगी आहे. माझे आयुष्यातील काहीच दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे मला माझे बाबा गावी घेऊन आले. जेणेकरून मला मुंबईमध्ये राहून जास्त त्रास झाला असता त्यामुळे त्यांनी मला गावी आणले. मी गावी आले आणि तुझ्यासारखा एकदम सुंदर आणि सकारात्मक विचारांचा मित्र मला भेटला. तेव्हाच मी ठरविले होते की, या व्यक्तीबरोबर आपले उरलेले दिवस आनंदाने, उत्साहाने व जोमाने आपल्याला घालवता येईल यामुळे मी तुझी भेट घेतली. तु नावाप्रमाणेच सदैव आनंदी असणारा व्यक्ती होतास. आपल्या आनंदात दुसर्‍याला सामावून घेणारा असा होतास. जेव्हा तु मला लग्नाबद्दल विचारणा केलीस तेव्हाच मी तुला सगळं खरं सांगणार होते. परंतु, तुला सगळं सांगितलं असतं तरी सुद्धा तु माझा पूर्णपणे स्वीकार केला असतास हे मला माहीत होते. तुझा स्वभावाचं आहे तसा दुसर्‍यांच्या वेदना वेळोवेळी समजून घेणे, त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे सावरणे. तु शांत, भावनिक, हुशार, स्वतःपेक्षा दुसर्‍याला महत्त्व देणारा, मदत करणारा असा स्वभाव असल्यामुळे तुला मी काही सांगितलं नाही. 

       आनंद, तु तुझा स्वभाव असाच शेवटपर्यंत ठेव एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. प्रेम नक्कीच सर्वश्रेष्ठ असतं. आपलंसुद्धा तसंच जिव्हाळ्याचं, आनंदातलं, एकमेकांची जपणूक करणारं, विश्वासाचा आधार जपणारं,असं आपलं प्रेम होतं. तुझी अर्धांगिनी होणे मला मनापासुन आवडले असते. आणि माझ्यात तशी इच्छा तयार झाली होती. पण, मी माझ्या आजारामुळे तुला आयुष्यभर साथ दिली नसते. एखाद्या व्यक्तीची अर्धवट साथ सोडून दिली तर त्या व्यक्तीला मानसिक त्रास खूप होतो. त्यातुन तो सावरणे कधीकधी शक्य नसते आणि तुझ्यासारखा स्वभाव असणारी माणसे यातून बाहेर येणे सहजासहजी शक्य नसते. त्यामुळे तुला एवढा मोठा धोका आणि त्रास द्यायचा नाही. जेणेकरून तुझ्या आयुष्यात नको तो बदल होईल. यासाठी या पत्रातून तुझ्या ठराविक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

     जे खरं प्रेम असतं ते खरचं त्या व्यक्तीला मिळत नाही. असंच आपल्या दोघांच्या नात्याचं झालं. त्यामुळे यातुन तु स्वतःला सावर आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुला नक्कीच आयुष्यात जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती भेटेल. 

आणि ती योग्य व्यक्ती तुला भेटावी एवढीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.........

                    

                         तुझीच प्रिय सखी, 

                       अनु....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance