दुष्काळ
दुष्काळ
महाराष्ट्राला दुष्काळ म्हणजे शाप. महाराष्ट्रातील जनतेला भोगावे लागणारे भोग. न जाणो अशी परिस्थिती कायम का निर्माण होते. खरंच दुष्काळ संपणार नाही का ? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी ठरवले तर होकारार्थी मिळेल; पण आम्हाला खरोखरच मनापासून मनातले नेते मिळतात का? मिळाले तर त्यांना कामाचा निधी वापरता येतो का ? की त्यांना ह्या जनतेच्या विकासासाठी हा निधी वापरायचाचं नाहीये ? कधीकधी निधी परत पाठवले जातात. शोकांतिका आहे.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आपल्याकडे फक्त पाण्याचे टँकर उपलब्ध असतात. त्यातून तात्पुरते काम करायचे. लोकांना दिलासा दिलाय असं दाखवायचं. त्यातून फक्त पुढचे पाच वर्षे पूर्ण करायचे. पण दुष्काळ कायमचा घालवायचा नाही. त्यात श्रेय घेण्यावरून स्पर्धा चालू होते. दुष्काळ आला की विरोधकांना त्यांचे भागभांडवल. अशी परिस्थिती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. महिन्यातून एकदा, दोनदा पाणी मिळावे तेच पाणी
मुकाट्याने प्यायचे. का अशे व्हावे? भारतात पाऊस पडत नाही. पण मला माझा देश कुटुंब वाटत नाही. त्याच्या संवेदनांची जाणीव होत नाही. म्हणून माझा भारत पाण्यावाचून तहानलेला असतो. दुष्काळाचे फक्त राजकारण होते. जनावरे चाऱ्यापाण्यावाचून मरतात. भुकेल्या पोटी ते काहीही खातात. त्या खाण्यातून त्यांचा मृत्यू होतो. मला फक्त निवडून यायचे ते फक्त भरपूर धनसंपत्ती, पुढच्या पिढ्यांचे कायमचे भले करण्यासाठी. त्यांना काय होणार दुष्काळाची जाणीव ! ते तर बिस्लरीचे पाणी विकत घेऊन पिऊ शकतात. लोकशाहीतील सर्व प्रतिनिधी दुष्काळ निवारण करू शकतात. पण त्यांच्यात इच्छाशक्ती दांडगी पाहिजे. सेवा करण्याची भावना मनात बाळगली पाहिजे. शेतकरी सुखी तर देश सुखी ! पाणी म्हणजे जीवन रक्षण ते सर्वाना मिळाले पाहिजे. तरच आपले जीवन सार्थकी लागेल.