Janhavi Ambulage

Inspirational

3  

Janhavi Ambulage

Inspirational

चला, थोडं Upgrade होऊया

चला, थोडं Upgrade होऊया

4 mins
124


         
      आज सहजच Instagram वर reels पाहत असताना एक खूप सुंदर आणि विचार करायला भाग पडणारा video दिसला. इन्स्टाग्राम वर तो अर्धाच उपलब्ध होता म्हणून you tube वर शोधून तो पूर्ण video पहिला. हा video सर्वांनी पाहावा असाच आहे. सर्वांनी पाहावा या हेतूने मी link शेअर करत आहे. 

      विषय तसा आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यातीलच आहे, "Arranged Marriage". पण महत्वाचा आहे तो या video मधून दिला गेलेला संदेश. हा video पाहून आपल्या समाजात हळूहळू का होईना पण सकारात्मक बदल घडतोय या गोष्टीने जितका आनंद झाला, तितकंच वाईट video खालील काही लोकांचे comments वाचून वाटलं.

       यात एका मुलीला बघायला मुलगा आणि त्याचे कुटुंबीय आलेले आहेत. मुलगी तिच्या वडिलांना विचारते की, " बाबा मी फक्त त्यांना समोसे खाऊ घालूनच कसकाय ठरवू की याच मुलासोबत मला माझं संपूर्ण आयुष्य घालवायच आहे? " त्यावेळी त्या मुलीचे वडील तिला काहीच न बोलता सर्वजण तिची वाट पाहत असतात म्हणून खाली यायला सांगतात. मुलगी खाली येते, मुलगा मुलीला पाहतो, मुलगी मुलाला पाहते, सर्व औपचारिक प्रश्न मुलीला विचारून होतात. मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना मुलगी आवडते आणि ते त्यांची पसंती असल्याचे सांगतात. जेव्हा मुलीकडच्यांची पसंती विचारण्यात येते तेव्हा मुलीचे वडील म्हणतात की,  "आम्ही पण तुमच्या घरी येऊ, बघू की तुमचा मुलगा घरची कामे करतो की नाही, थोडाफार स्वयंपाक बनवू शकतो की नाही? " त्यावर मुलाच्या आईच उत्तर येत की मुलाला फक्त नूडल्स बनवता येतात. नंतर मुलीचे वडील नाराजीच्या सुरात सांगतात की, " माफ करा पण आमची मुलगी फक्त नूडल्स खाऊन जगू शकत नाही." काही क्षण सगळे शांत होतात आणि एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात की हे मुलीचे वडील काय बोलत आहेत. नंतर मुलगा म्हणतो की, " तुम्ही दहा दिवसांनी या आमच्या घरी मुलगा बघायला, मी तोपर्यंत थोडेफार पदार्थ बनवायला शिकेन!" मुलाकडून हे वाक्य ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरत आणि video संपतो.

      गोष्ट तशी साधीच पण नव्याने मांडण्यात आलेली. आपल्याकडे मुलगी बघायला गेल्यावर फक्त मुलीलाच हा प्रश्न विचारला जातो की तिला स्वयंपाक येतो की नाही. पण मुलाला कधीच हा प्रश्न विचारला जात नाही. कारण फार पूर्वीपासूनच अस चालत आलेलं आहे आणि यात काही चुकीचं आहे असंही मी म्हणत नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्या गोष्टी आधीपासूनच चालत आलेल्या आहेत त्यात आपण थोडं Upgradation करूया, "आपल्या विचारांचं Upgradation." जेव्हा या video खालील काही लोकांच्या मी comments वाचल्या, तेव्हा त्यात काही लोक सकारात्मक होते आणि काही नकारात्मक. " ज्या प्रकारे मुलींना स्वयंपाक करता येत असतो अगदी तसाच नाही पण थोडाफार साधा स्वयंपाक तरी मुलांना करता यायला हवा " हे विचारांचं Upgradation काही जणांना पटलं आणि काही जणांना अजिबात पटलं नाही.

      काही जणांच म्हणणं असेल की, जर मुलं पण स्वयंपाक करायला लागले, घरकाम करायला लागले तर मग मुली काय करणार ? पण मी म्हणते की जर मुलांनी शिकला थोडा साधा साधा स्वयंपाक करायला, केली घरातील थोडी छोटीमोठी कामे तर बिघडत कुठे ? चुकीचं काय ठरेल यात ? काही जण म्हणतील की, मुलांना अशी कामे करणं शोभत नाही, मुलांनी फक्त बाहेरचं काम करायचं व मुलींनी घर आणि त्यांचा जॉब दोन्ही सांभाळायचं हेच बरोबर आहे. पण संसार काय फक्त एकाचा असतो का? संसार दोघांचा म्हणल्यावर सर्व कामे, जबाबदाऱ्या दोघांनीही एकमेकांच्या साथीने पार पाडायला हवीत.

        जेवण दोघांनाही लागत ना, मग दोघांनाही बनवायला यायला नको का ? मुलांना अशी कामे करणं शोभत नाही हा विचारच मला गौण वाटतो. समजा कधी स्वयंपाक करायला घरी कोणी स्त्री नसेल तेव्हा मुलांनी काय करायचं? बाहेरचं खाता येईल पण किती दिवस? दररोज उठून तर आपण बाहेरचं खात नाही ना, आपलं घरच बनवलेलंच साधं जेवण असायला हवं वाटतं. सध्या कोरोनामुळे तर बाहेरच खाणं शक्यतो टाळतातच. मग मुलांनी इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी खिचडी, वरणभात, पोहे, उपमा, इ. असे साधे पदार्थ तरी बनवायला शिकायलाच हवेत. दुसऱ्याचं पोट भरण्यासाठी नाही तर स्वतःच पोट भरण्यासाठी. असे साधे पदार्थ बनवता आले तर किमान उपाशी राहण्याची वेळ तर येणार नाही. 

        जर मुलांनी स्वयंपाक करण्यात लाज बाळगली असती तर मोठे मोठे शेफ कसकाय बनले असते? इथे प्रश्न येतो आपल्या विचारांचा. आपण आपले विचार संकुचित न ठेवता वेळेनुसार आपल्या विचारांत बदल घडवून आणायला हवा. मुली जर मुलांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभा टाकतात, नौकऱ्या करतात तर मग मुलांनी पण थोडाफार स्वयंपाक शिकला, घरकामात मदत केली तर यात चुकीचं काय आहे ?

      प्रत्येक आई लहानपणापासून मुलींना सर्व कामे शिकवत असते त्याप्रमाणे मुलांनाही थोडीफार कामे शिकवायला हवीत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना कोणावर अवलंबून राहण्याची सवय लागणार नाही. आजकाल सर्वच मुलंमुली उच्च शिक्षण घेतात. शिक्षणाचा उद्देश हाच आहे की, उच्च शिक्षण घेऊन तरुणपिढीने समाजात सकारात्मक बदल घडवावा, समाजाचा विकास करावा. शिक्षण घेऊन नौकरी करणे आणि पैसा कमविणे इतकाच संकुचित हेतू तरुणांनी ठेवू नये असच मला वाटतं. माझे विचार काहींना पटतील काहींना पटणार नाहीत. कोणाची विचार करण्याची पद्धत आपण बदलू शकत नाही पण स्वतःच मत मात्र नक्कीच मोकळेपणाने मांडू शकतो.

     मला फक्त इतकंच वाटतं की, video मधील मुलीच्या वडिलांचा विचार आणि मुलीला बघायला आलेल्या मुलाचा विचार हा आपल्या समाजातील प्रत्येक मुलीच्या वडिलांचा आणि प्रत्येक मुलाचा विचार व्हावा.  कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझ्या लिखानामागचा उद्देश कधीच नसतो. माझ्या लिखाणामुळे समाजात सकारात्मक बदल व्हावा इतकीच माझी इच्छा आहे. नकळतपणे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational