छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
ज्यांच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उदयास आले अशा त्या राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवताच आमच्या अंगावर काटा येतो असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही तर ते दहा पटीने वाढवले असे धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा.
अन्यायाच्या काळोखाला कायमचं नष्ट करून संपूर्ण महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्या सारखा तेजस्वी प्रकाश देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. परंतु जरा विचार करा शिवजन्मापूर्वी काय परिस्थिती होती या महाराष्ट्राची? अरे पाच- पाच सुलतानी सत्ता थै थै नाचत होत्या या महाराष्ट्राच्या माती वरती. मंदिराच्या मंदिर लुटली जात होती. घराघरातल्या आया-बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. जणू संपूर्ण महाराष्ट्रच मुघलांच्या कैदेत खितपत पडला होता. आणि अशाच परिस्थितीत एक दिवस राजमाता जिजाऊ शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या. आणि प्रार्थना केली हे शिवाई देवी, गोरगरिबांच राज्य येण्यासाठी, बहुजनांचा राज्य येण्यासाठी, मराठ्यांच राज्य येण्यासाठी, मला एक पुत्र दे. आणि वाराही शांत झाला, दगडालाही पाझर फुटला. आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचाच जन्म झाला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. म्हणून एक कवी असे म्हणतात की, किसी के पेट मे से बाप पैदा होता है, किसी के पेट मे से पाप पैदा होता है, मगर जिजाऊ जैसी मा के पेट में से बापो का बाप शिवबा पैदा होता है! मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं ते आज आम्ही समजून घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. अहो , छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. बघता-बघता शिवाजी महाराजांनी राजगड रायगड प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्य प्रचंड मजबूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा केवळ त्यांच्या तलवारीच्या पात्यावर अवलंबून नव्हता तर तो अवलंबून होता त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेवर. मग काय होती? ही विलक्षण बुद्धिमत्ता ती आज आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जगाच्या इतिहासाला आठशे वर्षांची परंपरा आहे परंतु आजपर्यंत कुणालाही असे वाटले नाही की, आरमाराची स्थापना करावी पण वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. तुम्ही आजही गुगल वर टाका "द फादर ऑफ इंडियन नेव्ही" तेव्हा एकच नाव येते आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा रक्ताला बेैमान न होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे. आज आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आपल्याला वाटते की, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या परंतु जर राजमाता जिजाऊ सारखी माता आज निर्माण झाली तरच राजे पुन्हा जन्माला येईल. परंतु जर आज घराघरातल्या जिजाऊ गर्भातच मारल्या जात असेल तर सांगा कसे येणार राजे जन्मालाफोडल्याव? सांगा कशी फुलतील फुल अशा कळ्या तोडल्यावर? सांगा कसा लागेल दिवा अशा पणत्या फोडल्यावर? आणि सांगा कशी घडेल जिजाऊ अशा गर्भातच मुली मारल्यावर? आणि जर राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या नाही तर शिवाजीराजे कसे येणार जन्माला? अरे,दुसऱ्या देशातील पोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन, स्पायडरमॅन तयार करावे लागतात पण महाराष्ट्रातील पोरं भाग्यवान आहेत की त्यांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. अहो, महाराष्ट्राची पुण्याई होती की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या आभाळावरती असा इतिहास करून ठेवला आहे की, त्याचा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल. खऱ्या अर्थाने जर आज समाज परिवर्तन करायचे असेल तर आज या अज्ञानात असलेल्या समाजाला जागे करण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे शिवचरित्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची. कारण शिवचरित्र हे एक पुस्तक नाही, शिवचरित्र हा एक ग्रंथ नाही, शिवचरित्र हे एक चरित्र नाही, तर शिवचरित्र हा एक विचार आहे आणि तो विचार आज प्रत्येकाच्या मनामनात पोहोचणे ही काळाची गरज आहे.
आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवचरित्राचा प्रसार चालू आहे पण दुर्दैव इथं वाटतं की, आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावाने पोकळ तुताऱ्या वाजवल्या जातात आणि आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बिड्या विकल्या जातात. अरे त्यांना तरी दोष द्यायचा कुणी कारण ते तर बिड्याविके आहेत पण ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर बिड्याफुके आहेत .ज्यांच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उदयास आले अशा त्या राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवताच आमच्या अंगावर काटा येतो असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही तर ते दहा पटीने वाढवले असे धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा.
अन्यायाच्या काळोखाला कायमचं नष्ट करून संपूर्ण महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्या सारखा तेजस्वी प्रकाश देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. परंतु जरा विचार करा शिवजन्मापूर्वी काय परिस्थिती होती या महाराष्ट्राची? अरे पाच- पाच सुलतानी सत्ता थै थै नाचत होत्या या महाराष्ट्राच्या माती वरती. मंदिराच्या मंदिर लुटली जात होती. घराघरातल्या आया-बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. जणू संपूर्ण महाराष्ट्रच मुघलांच्या कैदेत खितपत पडला होता. आणि अशाच परिस्थितीत एक दिवस राजमाता जिजाऊ शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या. आणि प्रार्थना केली हे शिवाई देवी, गोरगरिबांच राज्य येण्यासाठी, बहुजनांचा राज्य येण्यासाठी, मराठ्यांच राज्य येण्यासाठी, मला एक पुत्र दे. आणि वाराही शांत झाला, दगडालाही पाझर फुटला. आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचाच जन्म झाला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. म्हणून एक कवी असे म्हणतात की, किसी के पेट मे से बाप पैदा होता है, किसी के पेट मे से पाप पैदा होता है, मगर जिजाऊ जैसी मा के पेट में से बापो का बाप शिवबा पैदा होता है! मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं ते आज आम्ही समजून घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. अहो , छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. बघता-बघता शिवाजी महाराजांनी राजगड रायगड प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्य प्रचंड मजबूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा केवळ त्यांच्या तलवारीच्या पात्यावर अवलंबून नव्हता तर तो अवलंबून होता त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेवर. मग काय होती? ही विलक्षण बुद्धिमत्ता ती आज आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जगाच्या इतिहासाला आठशे वर्षांची परंपरा आहे परंतु आजपर्यंत कुणालाही असे वाटले नाही की, आरमाराची स्थापना करावी पण वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. तुम्ही आजही गुगल वर टाका "द फादर ऑफ इंडियन नेव्ही" तेव्हा एकच नाव येते आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा रक्ताला बेैमान न होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे.
आज आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आपल्याला वाटते की, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या परंतु जर राजमाता जिजाऊ सारखी माता आज निर्माण झाली तरच राजे पुन्हा जन्माला येईल. परंतु जर आज घराघरातल्या जिजाऊ गर्भातच मारल्या जात असेल तर सांगा कसे येणार राजे जन्मालाफोडल्याव? सांगा कशी फुलतील फुल अशा कळ्या तोडल्यावर? सांगा कसा लागेल दिवा अशा पणत्या फोडल्यावर? आणि सांगा कशी घडेल जिजाऊ अशा गर्भातच मुली मारल्यावर? आणि जर राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या नाही तर शिवाजीराजे कसे येणार जन्माला? अरे,दुसऱ्या देशातील पोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन, स्पायडरमॅन तयार करावे लागतात पण महाराष्ट्रातील पोरं भाग्यवान आहेत की त्यांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. अहो, महाराष्ट्राची पुण्याई होती की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या आभाळावरती असा इतिहास करून ठेवला आहे की, त्याचा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल. खऱ्या अर्थाने जर आज समाज परिवर्तन करायचे असेल तर आज या अज्ञानात असलेल्या समाजाला जागे करण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे शिवचरित्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची. कारण शिवचरित्र हे एक पुस्तक नाही, शिवचरित्र हा एक ग्रंथ नाही, शिवचरित्र हे एक चरित्र नाही, तर शिवचरित्र हा एक विचार आहे आणि तो विचार आज प्रत्येकाच्या मनामनात पोहोचणे ही काळाची गरज आहे. आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवचरित्राचा प्रसार चालू आहे पण दुर्दैव इथं वाटतं की, आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावाने पोकळ तुताऱ्या वाजवल्या जातात आणि आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बिड्या विकल्या जातात. अरे त्यांना तरी दोष द्यायचा कुणी कारण ते तर बिड्याविके आहेत पण ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर बिड्याफुके आहेत . ही या महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे.आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कभी वोटो के लिए मरे, कभी नोटो के लिए मरे ,अगर होते भगतसिंग जिंदा तो केहते सुखदेव हम भी क्या इन हराम जादो के लिए मरे. म्हणजे महापुरुषांनी या मातीसाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी, मराठ्यांच्या सत्तेसाठी बलिदान दिले. परंतु दुर्दैवाने ते बलिदान आज आपण विसरत चाललोय. हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचेच दुर्दैव म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्या मध्ये कधीही एक रूपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. परंतु आज त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये जणू भ्रष्टाचाराचा बाजाराच भरला आहे. म्हणून मला असे वाटते की, नशीब शिवाजी महाराजांनी किल्ले डोंगरावर बांधले ते जर जमिनीवर बांधले असते तर त्याचे सातबारे देखील आमच्याच नावाचे निघाले असते. आज बरेच लोक असे म्हणतात कि, शिवाजी महाराज मुस्लिम धर्माचे विरोधक होते. जर असे असेल तर शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख कोण होता? तर तो होता एक मुसलमान इब्राहीम खान. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही जाती- धर्माविरुद्ध नव्हता तर तो लढा केवळ आणि केवळ अन्यायाविरुद्ध होता. हा इतिहास आज आम्ही समजून घ्यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने तो इतिहास आज आम्हाला कधी समजूनच घेता आला नाही. म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये कधी जातीपातीच्या पलीकडे गेलाच नाही. तो इतिहास आपण विशिष्ट जातीपुरता मर्यादित ठेवला. ही आज या महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे.
आज तुम्हाला या समाजाची मनपरिवर्तन करायचे असेल तर गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची. परंतु दुर्दैवाने आज आपण शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ डिजे वर गाणे लावून नाचण्याइतकेच मर्यादित ठेवले. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांची ज्ञानपीठ होत्या,विद्यापीठ होत्या, आणि संस्कारपीठ देखील होत्या. मित्रांनो आज आपण आपल्याला या महाराष्ट्रामध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज शिकवले पण दुर्दैवाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले गेले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. आज आपण अभिमानाने गाडीवर लिहतो, जय शिवराय ,जय शंभूराजे, जगदंब, परंतु तीच गाडी जेव्हा संध्याकाळी बिअरबारच्या दुकानासमोर उभी राहते तेव्हा या मराठी मनाला वाटतं की आज कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच पाऊल ज्या ज्या किल्ल्यावर पडलं खरं तर तिथं त्यांच स्मारक बांधायला पाहिजे पण आज आपण किल्ल्यावर सोडून समुद्रात स्मारक बांधून बांधतोय. म्हणून या मराठी म्हणाला वाटतंय की आज या महाराष्ट्रामध्ये आपण कुठेतरी चुकतोय. आज आपण शिवजयंती व्हाट्सअप ला स्टेटस ठेवून किंवा गाडीला झेंडे लावून डिजेवर गाणे लावून नाचून साजरी करतो. परंतु जर आपण त्या ऐवजी शिवचरित्र वाचून त्याचा आदर्श घेऊन शिवजयंती साजरी केली तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. आज शिवाजी महाराजांचा आदर्श घेणे हीच खरी काळाची गरज आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून विचारातून, प्रेरणेतून नवीन पिढी निर्माण केली तर नक्कीच आपला भारत देश पुढे जाईल. गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, बहुजनांच्या, मराठ्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करून अगदी शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्त्रियांचे रक्षणकर्ते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा........!
