छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी महाराजांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते. त्यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते थोरले चिरंजीव होते.
छत्रपती शिवरायांच्या सहवासात बाल संभाजी सर्व शस्त्रास्त्र, राजकीय आणि बौद्धिक शिक्षण पार पडले. त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन ते लहान असतानाच झाले. त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
संभाजी महाराज नऊ वर्षांचे असताना शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी सोबत नेले होते. संभाजी महाराज अत्यंत शूरवीर होते. तसेच ते अनेक भाषांत पारंगत देखील बनले होते. शिवरायांनी स्वतः त्यांच्यासोबत वेळ व्यतित केल्याने मुघल सत्ता आणि इतर शत्रूसत्ता यांचे हेवेदावे आणि स्वार्थी वृत्ती यांबाबत ते चांगलेच निष्णात झाले होते.
इ. स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले. शिवाजी महाराज त्यानंतर दक्षिण भारत मोहिमेवर गेले. तरुण संभाजी महाराज हे राजदरबारात रुळू लागले पण त्यांची सावत्र आई सोयराबाई आणि अमात्य अण्णाजी दत्तो यांच्याशी त्यांचे मतभेद होऊ लागले. नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी.....राजे मुजरा, मुजरा त्या झुजाँर
पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....तुमच्या या जखमांतून
वाहनारया रक्ताला, रागंड्या तुमच्या सहनशक्तीला..... ..पुन्यवान
समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड
स्वतःला....... तुम्ही शूरवीर, तुम्हीच रणवीर,
तुम्हीच नरवीर,तुम्हीच धर्मवीर.....तुम्ही होता धैर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर,
तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...अजिक्यं झुजीं दिल्या, गनीमाचीँ वाट लावीली,
फितुराचीँ मान छाटली.......... .कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली,
माय बहिनीचीँ आब्रु राखली........कि तीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,घाबरुन
तुम्हा आसमतं फाटला.......... .हवेगत चालवीली तलवारीची पाती,
कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती..........ज्याने
जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें काय कौतुक, ईथेच होतोनतमस्तक
मी अपसुक.......... मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय
पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!जय जिजाऊ-जय शिवराय-जयशंभूराजे!
