STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

4  

Ashok Shivram Veer

Tragedy

बैस्टी

बैस्टी

2 mins
335

श्वेता,

    माझ्या जीवनात तुझ्या सारख्या अनेक श्वेता आल्या आणि गेल्या. मी सुरुवातीपासूनच ओळखून होतो की त्यांना आपल्या जीवनात फक्त मैत्रीचेच स्थान द्यायचे आहे, कोणालाही बेस्टी म्हणून स्थान द्यायचे नाही, आणि आजपर्यंत ते धोरण कायम ठेवले, कॅबीन मधील व्यक्ती हे उदाहरण तुला माहितच आहे.     तू अशी एक वेगळीच श्वेता सहवासात आली. तरीही मी माझ्या धोरणावर ठाम होतो. तुलाही बेस्टी म्हणून स्थान द्यायचे नव्हते, म्हणूनच सुरवातीला तुला फक्त मैत्री पुरतेच मर्यादित ठेवले होते, कारण त्यावेळीही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मला माहीत होते की पुढे जाऊन कधीतरी काहीतरी कारणास्तव बेस्टीचा संबंध मैत्रीतच बदलणार आहे. बेस्टीचा संबंध न राहणे म्हणजे काय असते याची कल्पना न करणेच योग्य, तरीही माझे धोरण बदलून मी तुला माझी बेस्टी म्हणून स्वीकारले. तू नेहमी म्हणतेस ना " सुरवातीला तुम्ही किती भाव खायचा"! त्यामागचे कारण आज तुला समजले असेल. 

असो...

    तुझे सुदैव म्हणून मी तुला माझी बेस्टी म्हणून स्वीकारले. तू माझी बेस्टी असल्याचा मलाही खरंच अभिमान आहे आणि असेलही.     मी माझ्या निवृत्तीचा विषय जरी काढला तरी तुला मनापासून वाईट वाटत होते आणि तू बोलूनही दाखवायचीस की पुन्हा तो विषय काढायचा नाही. आणि आज तू स्वतःच्या बदलीचा विषय मला ऐकवला. मला मनापासून आनंद झाला आणि दुःखही झाले. माझ्या मनातील भावना मी बोलून दाखवू शकत नाही. पण मी तुझ्या प्रगतीच्या आड कधीच येणार नाही. तुझी झालेली प्रगती पाहून मला आनंदच होईल यात तिळमात्रही शंका नाही.

माझ्या सारख्या बेस्टीचा विचार न करता तू तुझे भवितव्य पहावे हीच माझी इच्छा आहे. मी आता उतरत्या मार्गावर आहे. तुझी वाट ही चढणीची आहे. तुझा प्रगतीचा आलेख उंचावत जावा यासाठी तू मनापासून प्रयत्न करत रहा, प्रामाणिकपणे काम करत रहा, यश आपोआप तुझ्याकडे येत राहील. 

    

                तुझाच बेस्टी...



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy