Ashok Veer

Others

2  

Ashok Veer

Others

देवमाणूस

देवमाणूस

2 mins
70


गेले सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढरं बरी. खरंच, या जगात माणसं ही इतक्या क्रूरतेने वागत असतात की ते पहाणाऱ्याच्याही अंगावर शहारे येतात. असे वाटू लागते की या जगात मानवरुपी दानवच वावरतात कि काय? याची अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभोवती पहात असतो. त्यांच्यात असलेल्या अवगुणांची ख्याती संपूर्ण समाजाला माहित असते. जगात देव हा नाहीच असे वाटायला लागते. जगात देव आहे की नाही हे माहित नाही. देव कोणी पाहिला आहे का? मानला तर दगडातही देव दिसतो, नाहीतर माणसातही राक्षस पहायला मिळतो.पण जगात अशा दोन व्यक्ती आहेत की त्या देवांपेक्षा कमी नाहीत. त्यांना आपण महादेवच म्हटले पाहिजे. या व्यक्तींना समाजानेही देवाचाच दर्जा दिलेला आहे. मग या व्यक्तीं कोण आहेत. तर या व्यक्तीं म्हणजे एक आई-वडील जे आपल्या मुलांना जन्म देतात. त्यांना लहानाचे मोठे करतात. आणि दुसरी म्हणजे शिक्षक. जी व्यक्ती आपल्या जवळ असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना देत असते. आई-वडिलांना आपल्या मुलांनी तर शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा जास्त शिकून प्रगती करावी व आपल्यापेक्षा त्यांनी धन दौलत, पैसा अडका, आरोग्य संपदा जास्त कमवावी असे नेहमीच वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. यामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. ते नेहमीच निःस्वार्थ भावनेने प्रयत्न करत असतात. जेव्हा त्यांचें स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्यांना अभिमान वाटतो. आकाश ठेंगणे वाटू लागते. याउलट या दोन व्यक्तींशिवाय इतर कोणालाही दुसऱ्या व्यक्ती आपल्या पुढे जात असल्याचे दुःख होते. त्या झालेल्या दुःखात ते नेहमीच पुढे जाणारांचे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. दुसऱ्यांचे पाय खेचण्याच्या नादात ते स्वतःची प्रगती करायची विसरून जातात. अशा या स्वार्थी जगात देव म्हणून वावरत असलेल्या या दोन देवमाणसांना माझा साष्टांग दंडवत...


Rate this content
Log in