STORYMIRROR

Sanuu Shinde

Romance

4  

Sanuu Shinde

Romance

अपेक्षा

अपेक्षा

8 mins
265

" किती गोड जोडी आहे नजर न लागो कोणाची " श्रुती आणि मानस च्या डोक्यावरन हात फिरवत आजी म्हणाल्या .


मानस आणि श्रुती सगळ्यांची फेवरेट जोडी जेवढा मानस समजुतदार तेवढी च श्रुती ही चांगली दोघ ही एक आयडियल कपल होते मानस ऑफिस मध्ये मोठ्या पदावर कामाला होता श्रुती ही एक इंटिरियर डिझायनर होती 


" चला आत्ता आम्ही निघतो " मानस


" अरे थोडा वेळ तरी थांब " निशा


" नको ताई आई वाट बघत असेल आम्हाला निघायला हव " श्रुती


" बर पण या हा मग परत " निशा


" हो नक्कीच " 


दोघे निघाले मानस ने तिला घरी सोडले आणि मिटिंग साठी ऑफिस ला निघुन आला त्याची मिटिंग ओवी देशमुख सोबत होती ओवी त्याच्या मध्ये इंटरेस्टेड होती तिने त्याच्याकडे नंबर मागितला पण त्याला याची भनक सुद्धा नव्हती म्हणुन त्याने सहज नंबर दिला 


संध्याकाळी तो घरी आला तर श्रुती झोपली होती त्याला वाटल थकली असेल म्हणुन लवकर झोपी गेली त्याने तिच्या अंगावर ब्लॅन्केट टाकल आणि तिच्या फोरहेड वर किस करून बाहेर आला तर आई ने त्याला जेवायला दिले जेवण झाल्यावर तो सहज बाल्कनीत उभा होता तर ओवी चा मेसेज आला 

Hi पासून सुरू झालेल्या गप्पा मग 2 तास चालल्या रात्री तो खुप उशीर झोपला ओवी खुप खुश होती त्याच्याशी बोलुन


दुसर्‍या दिवशी दुपारी ऑफिसमध्ये ओवी त्याच्या साठी जुस घेऊन आली थोडा वेळ दोघांच्या गप्पा झाल्या 


रात्री परत तिने त्याला मेसेज केला त्याने ही रिप्लाय दिला तिने त्याला सहज इम्प्रेस केलेल त्यांची चॅटिंग सुरू होती तोच श्रुती आली त्याने तिला हाक सुद्धा मारली नाही तो खुप वेळ हसत होता श्रुती ला काही कळेना नंतर आईने हाक मारली म्हणुन तो बाहेर गेला श्रुती ने सहज त्याचा फोन बघितला ती बेडवर बसुन त्यांची चॅटिंग वाचत होती


मानस आता आला आणि त्याने तिच्या हातातुन फोन हिसकावून घेतला श्रुती ने हळु आवाजात विचारल " ही कोण आहे? " फ्रेंड आहे म्हणून मानस झोपून गेला 


पुढच्या चार - पाच दिवसात त्याच वागण खुप बदलल होत तो श्रुती शी पहिल्यासारखा बोलायचा नाही रात्री दोन - दोन वाजेपर्यंत बाल्कनीत ते काॅल वर बोलायचे श्रुती ला त्याच्या वागण्याने त्रास होत होता ती जेव्हा पण त्याच्या शी बोलण्याचा प्रयत्न करायची तो काही रिस्पॉन्स करायचा नाही 


ऐके दिवशी ऑफिस मध्ये तो खुप लेट पोहचला केबिन मध्ये आला तर ओवी आधीच तिथे होती 


" hi "


" hi आज एवढा लेट "


" हो श्रुती खुप लेट उठली आणि मग नंतर तिने मला उठवल " 


" हो का " श्रुती च नाव ऐकून ओवी ला राग आला 


" बाय द वे तु आता इथे "


" हो तुला इन्विटेशन द्यायला आलेले "


" कसल "


" माझा birthday आहे आज "


" ओह्ह happy birthday "


" ये नक्की "


ऑफिस मधुन संध्याकाळी 7 वाजता तो घरी आला श्रुती तिथे च कोपर्‍यात बसुन पुस्तक वाचत होती तो सरळ बाथरूम मध्ये गेला अंघोळ करून बाहेर आला त्याने ब्लॅक शर्ट कोट वेअर केलेल आणि आरशासमोर उभा राहून तो केस ठिक करत होता श्रुती उठली आणि त्याच्या मागे येऊन उभी राहीली " कुठे जाताय " तिने प्रश्न केला 


" कुठे नाही ओवी ची बर्थडे पार्टी आहे "


" काय ? नका जाऊ " मानस ने थोड रागात पाहिल 


" सांगितल ना नका जाऊ मग नाही जायच " श्रुती 


" का ? शीज माय good friend " मानस थोड चिडत म्हणाला 


" असु दे पण तरी नाय जायच आज वैदिक चा बर्थडे आहे आणि ओवी च्या बर्थडे पेक्षा त्याचा बर्थडे जास्त महत्वाचा आहे ok " श्रुती 


" कोण वैदिक ? "


" कोण काय माझ्या ताईचा मुलगा " 


" श्रुती प्लीज तु जा ना यार एकटी "


" म्हणजे त्या चार दिवसाच्या good friend साठी तुम्ही माझ्या वैदिक बर्थडे बुडवताय ताई ला खुप वाईट वाटेल "


" मी त्यांना फोन करून साॅरी बोलेन "


" नाही मला काही माहित नाही तुम्ही माझ्यासोबत यायच "


" मी नाही येणार जायच तर एकटी जा नायतर बस घरात " मानस खुप रागात म्हणाला आणि निघुन गेला


मानस पार्टी मध्ये आला तो ओवीला शोधत होता ओवी ने ब्लॅक बॅकलेस वन पीस घातला होता तो तिला पाहुन फॅल्ट च झाला त्यांनी एकत्र डान्स केला नंतर ड्रिंक केल्या 

पार्टी संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले पण मानस अजुन ही ओवी सोबत च होता त्याने खुप ड्रिंक केलेली त्यामुळे त्याला काही कळत नव्हत त्या गोष्टीचा ओवी ने फायदा घेतला 


रात्रभर घरात सगळे काळजीत होता मानस अजुन कसा आला नाही श्रुती ने त्याला सारखे काॅल करत होती पण ओवी ने त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला श्रुती खुप काळजी त होती ती समजुन गेली कि नेमक काय झाल असेल ? 


सकाळी जेव्हा मानस ला जाग आली तेव्हा ओवी त्याच्या मिठी होती थोडावेळ तो ही खुष होता पण आत्ता श्रुती ला आणि घरच्यांना काय सांगाव त्याला कळेना तो थोड्या वेळाने घरी आला तर आई ने त्याला कुठे होतास विचारते तेव्हा तो म्हणतो " अग रात्री उशीर झाला म्हणुन मग मी शुभम च्या घरी गेलेलो " तर आई त्याला ओरडते " काय हे मग एक फोन करून सांगता नाही आल का तुला " तो आत रूममध्ये येतो श्रुती त्याला काही च बोलत नाही .



" ते काल उशीर झाला म्हणुन " मानस कापत्या आवाजात म्हणाला. 


" ओवी कडे च झोपलात " श्रुती 


" अग नाही शुभमकडे गेलो होतो हव तर फोन करून विचार त्याला " मानस 


" खर च शुभम दादांकडे गेलेलात " श्रुती 


" हे बघ आता तु टिपिकल बायकांसारख बोलु नको "


" ज्या बाईचा नवरा मागच्या सात - आठ दिवसांपासून मैत्रिणीशी रात्री दोन वाजेपर्यंत बोलत असतो ती अजुन काय च बोलणार " श्रुती चा स्वर रडका होता 


" श्रुती खर च साॅरी हे बघ काल रात्री आमच्यात "


" काय झाल ते ठाऊक आहे मला " मानस आता खुप घाबरला तो परत काही बोलायच्या आत ती बाहेर गेली 


मानस आवरून ऑफिसमध्ये आला ओवी आज ऑफिस

ला आली नव्हती त्याला थोडा स्वतःचाच राग आला चार दिवसांची मैत्री असलेल्या ओवी साठी आपण श्रुती शी अस वागाव त्याला श्रुती हवी होती पण ओवी च काय ?


संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरात कोणी त्याच्याशी बोलत नव्हत तो खोलीत आला तर श्रुती नव्हती त्याने पायल ( बहिण ) ला विचारल तर आई ने त्याच्या एक कानाखाली वाजवली काही वेळाने त्याला दुपारचा प्रकार कळाल पायल ने सांगितल कि दुपारी ओवी घरी आलेली आणि तिने काल तु काय केलस ते सगळ श्रुती वहिनी ला सांगितल आणि ती म्हणाली तु आणि ती लग्न करणार आहे म्हणुन वहिनी ने इथुन निघुन जाव मानस ला आता खुप राग आला ओवी ची हिम्मत कशी झाली श्रुती ला इथुन जायला सांगायची तो ओवी च्या घरी आला ओवी ने दार उघडल " हाय बेबी " 


" शट अप " 


' काय झाल " 


" तु आज माझ्या घरी आलेलीस "


" हो "


" हाव डेअर यु तुझी हिम्मत कशी झाली श्रुती ला घरातून निघून जायला सांगायची "


" कशी म्हणजे आता ती तिथे राहु शकत नाही "


" ए हे ठरवणारी तु कोण "


" अस का बोलतोयस मानस " 


" ऐक आपल्या हातुन चुक झाली माहित आहे पण या चा अर्थ मी तुझ्याशी लग्न करेल असा नाही मी खरच तुझी माफी मागतो मी काल घरी जात होतो तरी तुच मला अडवलस "


" पण I love you "


" इट इज नोट लव इट्स अॅट्रक्शन "


" नो मानस आय सिरियसली लव यु "


मानस कडे आता काही पर्याय नव्हता त्याला तिच व्हावच लागल एक महिन्यातच त्यांच ब्रेकअप झाल अर्थात अॅट्रक्शन जास्त दिवस टिकत नाही त्याने श्रुती ला एकदा ही फोन केला नाही या एका महिन्यात आत्तापर्यंत सगळ्यांना मानस आणि ओवी बद्दल कळाल होत आता मानस ला थोडी लाज वाटली स्वतःचीच आजुन त्यांचा डायवाॅर्स झाला नव्हता श्रुती तिच्या आई बाबांकडे राहत होती ओवी सोबत ब्रेकअप च्या दीड महिन्यानंतर तो श्रुती च्या घरी आला या 3 महिन्यात सगळ्यांचा राग निवळला होता सगळ्यांनी त्याला माफ केल होत फक्त श्रुती सोडुन 


" जावईबापु या ना " श्रुती च्या आईने दार उघडल 


" मी श्रुती ला न्यायला आलोय " मानस 


हे ऐकताच श्रुती च्या घरच्यांना खुप आनंद झाला तिच्या आई बाबांना वाटायच श्रुती तरुण आहे आणी जर आत्ता मानस तिला सोडुन गेला तर तिच परत लग्न ही होणार नाही कदाचित त्यांची श्रुती ने एकटीने आयुष्य काढाव अशी इच्छा नव्हती ते तिला पाठवायला तयार झाले  


" मी नाही येणार " श्रुती तिच्या रूमच्या दारातून च म्हणाली मानस तर पाहतच राहिला 


" का ? तु चल आत " आई तिला खोलीत घेऊन आली 


' श्रुती काय हे ? जाणार नाही म्हणजे "


" मला त्यांच्या बरोबर राहायचे नाही "


" का पण "


" आई कस राहु त्यांच्या बरोबर मी " 


" ते काही मला माहीत नाही तुला जावच लागेल " आई चे शब्द ऐकुन तिला खुप वाईट वाटल तिला वाटल आई बाबांना आपण जड झालो आहोत म्हणून ती स्वताः ची बॅग भरायला लागली 


आई च्या ही डोळ्यात पाणी आल तिला श्रुती च फ्युचर दिसत होत जर श्रुती मानस सोबत गेली नाही आणि इथेच राहिली तर आपण गेल्यावर शकील आणि वैभवी ( श्रुती चे दादा वहिनी ) हिची काळजी नाही घेणार आख्या आयुष्य भर तिला नवर्‍याने सोडलेली बाई अस लोक म्हणतील त्यांना आपल्या मुली च भले हव होत 


काही वेळाने श्रुती बॅग घेऊन बाहेर आली दादा वहिनी निरोप घेऊन ती मानस सोबत निघुन गेली तिला आई बाबांचा खुप राग आलेला 


गाडीत दोघ ही शांत होते त्याला साॅरी म्हणायच होते पण हिम्मत होईना तिचे अश्रु थांबायचे नाव घेत नव्हते " साॅरी श्रुती " तो म्हणाला पण तिला काही फरक पडला नाही 


घरी पोहचल्यावर पायल ने तिला मिठी मारली तिने ही स्माईल केली सगळ्यांना भेटली काही वेळाने ते खोलीत आले ती सोफ्यावर जाऊन झोपली आणि मानस बेडवर . 


दुसर्‍या दिवशी सकाळी ती उशीरा उठली मानस आवरून तयार होता ती बाहेर आली तर मानस ने आईला इशारा केला तर आईने तिला सांगितल " आज मानस ने ऑफिस

ला सुट्टी घेतली आहे तुम्ही दोघ आज फिरायला जा " श्रुती ला लगेच कळाल हा प्लॅन मानस चाच आहे तिने त्याच्या कडे पाहिल तर त्याने नजर दुसरी कडे वळवली ती रूममध्ये येऊन रेडी झाली तिने लाल रंगाची साडी नेसलेली काही वेळाने तो बाहेर गेला .


काही वेळाने ते दोघे एका हाॅटेल मध्ये आले त्याने तिला सांगितल " पहिले आपण नाश्ता करून नंतर मी तुला कुठे तरी स्पेशल ठिकाणी नेणार आहे तुला काय हवय ते ऑर्डर

कर " तिला कळाल आज चा अख्खा दिवस आपण फिरणार च आहोत तिने ढोकळा ऑर्डर केला नाश्ता झाल्यावर तो वाॅशरुम मध्ये गेला आणि मग ती इकडे

तिकडे बघु लागली तर आजुबाजुला बसलेल्या कपल्सवर गेली तिला वाटल " काळ किती ही बदलला असला बायकांना किती ही सुट मिळाली असली तरी बाई कडुन केल्या जाणाऱ्या अपेक्षा त्याच जर मानस च्या जागी ही चुक केली असती तरी कोणी मानस कडुन अपेक्षा ठेवली असती का कि त्यांनी मला माफ करावे मग माझ्याकडुन च का मी एक स्त्री आहे म्हणुन " तेवढ्यात मानस आला 


***


Next part : - 18 January 



Rate this content
Log in

More marathi story from Sanuu Shinde

Similar marathi story from Romance