STORYMIRROR

Kashmira Gupte

Abstract Horror Others

3  

Kashmira Gupte

Abstract Horror Others

अदृश्य गुहा

अदृश्य गुहा

2 mins
194

दहावीचा पेपर संपला आणि मुले आनंदाने नाचू लागली.मुलांचे‌ फिरायला जाण्याचा बेत आखला.

तुषार, सचिन,रिया, सोनिया,राजू .हे खूप मित्र घट्ट होते.तुषार हुशार होता त्याचे आईवडील बँकेत नोकरी करत होते.सचिन गरीब होता त्याचे आईवडील घरकाम करत होते.रिया घाबरट होती .दिसायला सुंदर होती. आईवडील देवाघरी गेल्याने ती आजी काकू बरोबर राहत होती.सोनिया आणि राजू श्रीमंत घराचे भाऊ बहीण होते त्यांच्या आईवडिलांचा बिझनेस होता.

सोनिया आणि राजू ने मित्रांना आपल्या घरी बोलावले आणि तेथून ते आणि त्यांचे कुटुंबीय गावी फिरायला गेले.सोनिया आई ने तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासाठी फिरायला जाण्यासाठी बस केली होती.सगळे खूप आनंदी आणि मजेत होते.गाणी गोष्टी गप्पा रंगल्या होत्या.काहीच कोणाला कल्पना नव्हती असं काही घडेल.बस अचानक जंगलाच्या दिशेने वाटचाल करु लागली ड्रायवर आणि बसमधील लोक घाबरून गेले.कोणालाच काही करता येत नव्हतं.

जंगल खूप मोठं होतं रस्ता वाढत जात होता.अचानक वादळ वारा सुटला बस बंद पडली.सोनिया आईवडिलांनी तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाला खाली उतरले कुठे आसरा मिळतो का पाहू बघुया सांगितले.

एक दूरवर गाव दिसले त्या गावात शांतता पसरली होती.कसला आवाज नाही काही आजूबाजूला दुकाने नाहीत .सगळी घरे बंद .एक घर उघडे होते त्यात रडण्याचा आवाज ऐकू येत होते आत गेल्यावर कुणीही नव्हते.तुषार,सचिन,रियाचे आईवडील स़नियांचया आईवडीलांना म्हणाले पुन्हा आपण बसमध्ये चढून बसू.येथे भीती वाटत आहे आपल्या बरोबर मुले आहेत .सोनियांच्या आईवडीलांनी होकार दिला आणि बसमध्ये जाण्याच्या दिशेने वाटचाल करु लागले पण बस जिथे उभी केली तिथे नव्हती.सगळे अचंबित झाले आणि घाबरून गेले.पुढे जाताना एक गुहा दिसली त्यात पाण्याचा खळखळाट पक्ष्यांची आवाज ऐकू येत होता.ते गुहेत प्रवेश करत होते आणि गुहा वाढत होती आजूबाजूला चित्रे रेखाटली होती.

राजूचे आजीआजोबा म्हणाले बाहेर खूप भीतीचे वातावरण पसरले आहे आणि आत सुध्दा आणि बाहेर वादळ गुंगावत आहे.आपण इथेच आसरा घेऊन सकाळी जाऊया.रात्रभर गुहेत आसरा घेतला.

सकाळी बाहेर पडले तर गावातील लोक म्हणाले तुम्ही रात्रभर कुठे राहिलात? सोनिया ने सगळं सांगितलं तर गावातील लोक म्हणाले इथे गुहा नाही.सगळे म्हणाले आम्ही रात्रभर गुहेत आसरा घेतला.पण गावातील लोक नकार दिला आणि ते ज्या ठिकाणी राहिले तिथे गेले.पण तिथे गुहा नव्हती.सोनिया मित्रमैत्रिणी आणि कुटुंब अचंबित झाले.काल आपण ज्या गुहेत राहिलो ती गुहा अदृश्य झाली.सगळे परत घरी परतले.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract