अभिज्ञा : एक प्रवास
अभिज्ञा : एक प्रवास
दादा... आज आपल्या घरी एवढी गर्दी का???? अभिमन्यू त्रासून म्हणाला.
ते आज आई ने आज तिच्या मै मैत्रिणीच्या मुलींना आपल्या घरी जेवायला बोलावले होते ना... त्याच आल्या असतील.
( शिवाय म्हणजेच अभिमन्यू चा मोठा भाऊ जरा awkward हसू देत म्हणाला.)
अभिमन्यू : यार दादा एवढी घाण smile मला नको देऊ..
आई कधी माझ्या लग्नचा विषय सोडेल काय माहित??
शिवाय : मग करुन टाक ना लग्न...
अभिमन्यू : काय रे तू पण??
अभिमन्यू : अहो बाबा.... तुम्ही तरी समजावा ना आई ला... ( अभिमन्यू थोडं नाटकी रुपात वडीलांना पटविण्याचा प्रयत्न करत होता )
बाबा : अभिमन्यू.... सॉरी बाळा पण तुझ्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या हातून तुझ्या आई ने काढून घेतला आहे... तूझ्या आई ने मला धमकी दिली आहे की जर मी तुला लग्नाच्या बाबतीत मदत केली तर तुझी आई मला एक आठवडा पर्यंत चहा देणार नाही...
अभिमन्यू : अहो बाबा... तुम्ही एका चहा साठी माझे उरलेले आयुष्य पणाला लावले?
बाबा : अरे बाळा... तुला माहित आहे ना... मी चहा शिवाय नही राहू शकत...
अभिमन्यू : बाबा
तसे अभिमन्यू चे बाबा हसायला लागले...
बाबा : अरे अभी तू एवढा मोठा पोलिस अधिकारी आहेस तरी लग्न करायला घाबरतोस???
अभिमन्यू : बाबा.... घाबरत नाही पण अशी मला साजेल अशी मुलगी मला पसंत तर पडली पाहिजे..
बाबा : अरे तू एवढ्या कडक पध्दती चा आहेस की मुली तुझ्या रूपावर तर भाळतात पण तुझ्या जवळ येण्याचा कोणी प्रयत्न करत नाही...
अभिमन्यू : बाबा... मला अश्या मुली नकोच ज्या माझ्या रूपावर भाळतात... आणि राहिला प्रश्न माझ्या कडक स्वभावाचा तर हा माझा मुळ स्वभाव आहे..जो मी कधी बदलणार नाही... पोलिस अधिकारी आहे हे समजले पाहिजे की नाही??
बाबा : बरं... मग तच शोध अशी एखादी मुलगी जी मनापासून तुला आवडेल.... आमची काही हरकत नाही...
नाही तर परत आज सारखी तुझी आई तिच्या मैत्रिणीच्या मुलींची जत्रा भरवेल... बघितलंस ना कशा नटून थटून आल्या होत्या मुली...
अभिमन्यू : काय सांगाव आई ला मलाच समजत नाहीये....
बाबा : बोलन घे एकदा आई सोबत...
अभिमन्यू : हो..
अभिमन्यू... एक जबाबदार पोलिस अधिकारी. " duty comes first " हे आयुष्याचं ब्रीदवाक्य असलेला तरुण.
In short " angry young man "
Well... हा सुद्धा खूप handsome आहे बरं का... तुम्ही तुमच्या आवडत्या crush ला ही #अभिमन्यू च्या जागी imagine करु शकता...
By the way... सध्या या आपल्या handsome अभिमन्यू ला त्यांची आई त्यांना लग्नासाठी मनवण्याचा प्रयत्न करित आहेत पण... जो लगेच लग्नाला होकार देईल तो # अभिमन्यू भोसले कुठला??
तस अभिमन्यू च्या कुटुंबात त्याचे आईवडील , मोठा भाऊ शिवाय आणि त्याची वहिनी म्हणजे शिवाय ची बायको कौशल्या.
असा हे अभिमन्यू चं कुटुंब खूप cool आहे बरं का... फक्त... नि फक्त अभिमन्यू ला सोडून...
सध्या वेळ आहे रात्रीची.... आणि आपला हीरो अभी म्हणजेच अभिमन्यू आपल्या आई सोबत बाहेर garden मध्ये असलेल्या झोपाळ्यावर बसून आपल्या आई शी सर्वात important topic म्हणजे त्याच्या लग्नबद्ल बोलत आहे..... नही नही बोल नही रहा है... अपने मॉम को चुना लगा रहा है...
अभिमन्यू : अगं आई... माझं अजुन वय नाही गं लग्नाच... मी आताशी 27 चा झालो ना... अजुन जगू दे ग नीट मला...
आई : लडिवाळपणे माझ्याशी बोलायचं नाही... मी पाघळनार नाही या वेळेस... आणि तू 27 वर्षाचा घोडा झाला आहेस... लग्न का वयाच्या 70 व्या वर्षी करणार आहेस???
अभिमन्यू : हो... चालेल मला..
आई : मूर्ख मुला.... 70 व्या वर्षी तुला चणे खायला दात तर पाहिजेत... 70 व्या वर्षी तुला म्हातारी बायको शोधायला मी तर जगली पाहिजे तेवढी..
अभिमन्यू : अगं आई... पण...
आई : पण बिन काही नाही...
तुला नाही वाटत की तू आता तुझा सुखाचा संसार सुरू करावा??? अरे बाळा योग्य वयात लग्न झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना.. मग काही टेंशन नाही... ( आई समजावणीच्या सुरात बोलते.)
अभिमन्यू : ( हताश होऊन...) ठिक आहे... तयार आहे मी लग्नाला पण लग्न पुढच्या 10 दिवसात जमव ... मी direct लग्नाच्या मंडपात येईन.. वरमाला घालायला... ( अभी ठामपणे सांगतो.)
आई : अरे... डोक्यावर पडला आहेस का?? 10 दिवसात कसं जमेल सगळं?? अजुन मी पोरगी पण नाही शोधली...
अभिमन्यू : ते मला नाही माहीत..पण जर येत्या 10 दिवसात तू लग्न जमवले नाही तर पुढची 2 वर्ष तू मला लग्नाला फोर्स करणार नाही..
आई : ए रताळ्या... तुझी पोलिसगीरी तुझ्या police station ला दाखव.. तू असशील ACP तुझ्या पोलिस स्टेशन चा पण घरी मी बिग बॉस आहे.. कळलं का?? क्या बोलता है?? ( आई style मारत म्हणाल्या)
अभिमन्यू : तुला जे म्हणायचं ते म्हण.. पण लक्षात ठेवा फक्त 10 द
िवस मातोश्री... त्या नंतर तुम्ही काही करु शकणार नाही...
( आणि हीरो निघुन गेला)
आई : मला challenge दिला ह्याने.. मला???
कौशल्या : हो सासूबाई तुम्हालाच..
आई : अगं तू केव्हा आलीस??
कौशल्या : जेव्हा तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचारत होता तेव्हा..
आई : अगं सासू चा धाक नाही वाटत तुला..
कौशल्या : आहे ना खूप आहे.. पण सध्या तुम्ही सांगा अभी दादा ने कोणता challenge दिला तुम्हाला??
आई : काय सांगव या पोराला.. म्हणतो लग्न कारण तर 10 दिवसात नाहीतर मग नाही...
कौशल्या : मग आई तुम्ही आता काय करणार??
आई : तू घाबरु नकोस मी आहे ना.. तो असला पोलिस वाला तर मी आई आहे त्याची.. काही पण झालं तरी याच लग्न मी लावून राहणाराच...
आई ला चैलेंज देऊन अभि आनंदाने त्याच्या खोलीत जायला लागतो. तो खूप खुष असतो की त्याची आई आता त्याचं लग्न लावून देणार नाही कारण 10 दिवसात लग्न करणं म्हणजे शक्यच नाही.
तो जात असतो की त्याचा दादा ( शिवाय) त्याला थांबवतो.
शिवाय : काय छोटे मियाँ ....??? कशाचा इतका प्रचंड प्रमाणात आनंद झाला आहे तुम्हाला???
अभिमन्यू : ते काय आहे ना बडे मियाँ... आताच आपल्या मातोश्री ला challenge करुन आलो आहे.
शिवाय : कोणता चैलेंज??
मग अभिमन्यू त्याच्या आणि आई मधील झालेला संवाद सांगतो.
शिवाय : अरे वाह .. तू तो सही खेल गया
अभिमन्यू : मग काय... चल मी झोपतो आता.. उद्या सकाळी लवकर जायचं आहे कामाला. Good night..
शिवाय : ओके... जा झोप...good night.
अभिमन्यू निघुन जातो पण शिवाय तिथेच विचार करत उभा राहतो.
छोटे साहेब तुम्ही आपल्या मातोश्रींना चैलेंज दिलं आहे... ज्या लई danger हाय... आता तयारीत रहा 10 दिवसात लग्न करायची... मी तर चाललो बाबा आमच्या साठी लग्नाचे नवीन कपडे घ्यायला.
शिवाय हासतच त्याच्या रुम मध्ये जातो.
10 दिवसा नंतर......
संपुर्ण हॉल सजवण्यात आला होता.
सजावट मात्र एक नंबर होती. शिवाय , कौशल्या , अभी चे आई बाबा खूप आनंदी होते. अभिमन्यू सोडून.
At present... अभिमन्यू च्या लग्नाची मंगलाष्टके चालू होती. अभिमन्यू आणि त्याच्या होणारया बायको मध्ये अंतरपाट होते... कधी नव्हे ती आज अभिमन्यूला भिती वाटत होती.
अभिमन्यू : ( मनात) मी आज गोष्ट शिकलो... मुलगा मुलगा असतो आणि आई आई असते... आई ला कधीच challenge करु नका.. मी तिच चुक केली आणि आज माझी ही हालत आहे... 10 दिवसात आई ने एवढं सगळं केलं मला खरंच विश्वास होत नाही. आज खरंच फार भिती वाटते आहे. काय माहित आई ने कशी मुलगी पसंद केली आहे माझ्या साठी??)
अभिमन्यू विचारात होता जेव्हा अंतरपाट दुर झाला आणि अचानक त्याच्या काळजाचा ठोका चुकला ... त्याच्या समोर एक 21-22 वर्षाची तरुणी उभी होती. नवरीच्या वेषात ती खुपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहर्यावर असलेली हळदीचा पुसटसा रंग तिच्या ग्व्हाळ रंगाला अजुन उजळवून टाकत होता. तिचे डोळे छान पाणीदार वाटत होते.
नाक तिला शोभेल असंच होतं.
काही क्षण तो तिच्यातच अडकून राहिला.. तिने मात्र एकदा त्याच्या कडे पाहुन लगेच मान खाली वळवली होती. ती लाजली आहे हे ओळखायला त्याला उशिर झाला नाही... अन् तिच्या लाजण्याने आपल्या अभिच्या गालांवरही लाली चढली.. तो ही blush करु लागला.
अभी तेव्हा भानावर आला जेव्हा शिवाय ने त्याला तिच्या गळ्यात वरमाला घालायला सांगितल. आणि त्याने ही मान डोलावली.
अन् वरमाला तिच्या गळ्यात अलगद घातली.
पुढच्या विधी वगैरे सगळ्या त्याने समाधानाने पार पाडल्या.
त्याने तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळ्सुत्र घातलं... तिच्या भांगेत त्याच्या नावाचं सिंदुर पण भरलं.
सप्तपदी घेऊन सातजन्म एकमेकांना साथ देणार असे दिले.
Finally सगळं लग्न आटोपल. मुलीची पाठवणी झाली. नवरा त्याच्या नवरीला घरी घेऊन आला.
रात्री उशिरा सगळे झोपायला निघून गेले. ती मात्र कौशल्या सोबत झोपली गेस्ट रुम मध्ये.
दुसर्या दिवशी सकाळी पुजा होती.
कौशल्या थकली होती बिचारी ती लवकर झोपी गेली...पण तिला मात्र शांतपणे झोप लागत नव्हती... मनाची चिलबिचल चालू होती. कधीतरी रात्री तिला झोप लागली.
इकडे अभिमन्यू त्याच्या रूममध्ये bed वर पडून तीचा विचार करत होता. त्याच्या मनाची अवस्था ही काही ठिक नव्हती.
अभिमन्यू : आज तिला पहिल्यांदा बघीतलं तरी एवढं समाधान मला का वाटलं ? तिचा चेहरा अजुन ही डोळ्यासमोर येतोय. तिच जास्त वय असेल असं मला वाटत नाही. तिचं ते निरागस रुप आठवुन पण माझे heartbeats वाढत आहेत. तिचं नाव काय असेल???
दादा ला विचारु का??? ... नको नको... तो मला चिडवणार हे नक्की... आई ला विचारु??? नको..नको... ती मला टोमणे देऊन देऊन मारेल... .... असं करतो... मी तिलाच विचारतो उद्या..
देवा... मला नक्कीच वेड लागायची वेळ आली आहे... आता झोपतो.. नाहीतर आई काम काढेल माझं.
अभिमन्यू ही काही वेळात झोपी जातो.
तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा.