Pranay Marathe

Romance

5.0  

Pranay Marathe

Romance

आपण फक्त मित्रच आहोत का ?

आपण फक्त मित्रच आहोत का ?

9 mins
4.9K


समीर नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता. आणि विशेष म्हणजे दहावीला त्याला उत्तम गुण सुद्धा मिळाले होते. त्यामुळे त्याने अकरावीला विज्ञान शाकेत जायचे ठरवले होते भविष्यात Engineering करावी असे समीरच्या डोक्यात अगोदर पासून ठरवले होते.

अकरावीला पुण्यातले नामवंत वाडिया महाविद्यालयात प्रवेश झाला होता महाविद्यालयाचा आज प्रथमच दिवस होता. मित्रा इकडे अकरावी सायन्सचा क्लासरूम कुठे सुरु आहे. समीर महाविद्यालयाच्या एका विध्यार्थाला विचारात असतो. अगोदरच त्यला आज उशीर झालेला असतो. महाविद्यालयात यायला म्हणून धावतपळत विचारण्याचा प्रयतन करत असतो. कॅन्टीनच्या पठीमागे ‘Section c’ नावाची बिल्डिंग असेल तिथे तिसऱ्या फ्लोरला अकरावी सायन्सचा क्लासरूम असतो. त्या विद्यार्थ्याचे ऐकून समीर धावतपळत क्लासरूम पर्यंत पोहचतो. आज महाविद्यालयाचा प्रथम दिवस असल्यमुळे महाविद्य्लायाचे सर सुद्धा समीर वर ओरडत नसतात.

समीरचा महाविद्यलयाचा प्रथम दिवस अगदी म्हटले तरी सो सो च गेलेला असतो पुरेशी ओळख आणि नवीन चेहरे असल्यामुळे आज मात्र समीरच मन महाविद्यालयात रमलेच न्हवते. पण बरेचशी आमची सिनिअर मंडळी आमच्या शेजारच्या क्लासरूम जवळ येऊन सारखी गर्दी करून उभी असतात. काही कळायला मार्ग नव्व्ह्ता का उभी असतील असे एक दिवस नाही तर आठवडाभर हा कार्यक्रम समीरने खुद्ध डोळ्यांनी पहिला होता.

त्या नंतर खुप दिवसांनी कळले सिमरन असते तिथे म्हणून एवढी गर्दी असते समीरचा   नुकताच मिविद्यालयात झालेला मित्र विवेक समीर सांगण्याचा प्र्यन्त्न करतो.पण सिमरन नेमकी आहे तरी कोण ? आणि तिथे एवढी गर्दी का म्हणून? समीर विवेकला प्रश्नाला भाडीमार सुरु करत असतो. अरे समीर आपल्या महाविद्यालयाच्या सर्वात सुंदर मुलगी आहे. तीच्यावर सर्व महाविद्यालयाचे मुल तिच्यावर आपली जान ओवाळून टाकतात. अस होय म्हणून एवढी गर्दी आपल्या क्लास रूमच्या शेजारी असते का काय? हो समीर तेच या गोष्टीच मूळ कारण आहे.            

एक एक दिवस महाविद्यालायचा हळू हळू पुढे जात होता. बऱ्याचदा समीर आणि सिमरनची डोळ्यांनीच का होईना. पण त्या दोघांची Interaction होत होती. पण सिमरन समीर पेक्षा एक वर्ष Senior असल्यामुळे समीरच मात्र तिच्याशी कधीच बोलण्याच धाडस झाल न्हवते.

आज महाविद्यालायचा शेवटचा पेपर झाला होता. सगळीच मित्र आता आपापल्या घरी किवा कुणी गावाला जाणार होते. महाविद्यालायच्या प्रथम सत्राचेच पेपर झाले होते. ह्या सुट्ट्या खर तर दिवाळीच्या होत्या दिवाळी नंतर पुन्हा महाविद्यालय सुरु होणार होते. पण १५ ते २० दिवस मित्र भेटणार न्हवते.

२२ ऑक्टोबर चा दिवस होता. समीर सकाळी १० वाजता पुणे स्टेशनला येऊन पोहचला होता. समीरला सांगलीला मामांच्या गावाला दिवाळी निमित्त जायचं होते. समीरची ट्रेन पहिल्या फलाटावर उभी होती. त्यने स्टेशनवरून पाण्याची बाटली धावपळ करत आणि सोबत वेफर्स च पाकीट घेऊन तो ट्रेन मध्ये येऊन आपल्या जागी बसला होता. आणि समोर बघतो तर काय? समीरला आश्चर्यचा धक्काच बसलेला असतो. त्याच्या समोर खुद्ध त्यांच्या महिविद्यालयाची सोनपरी सिमरन येऊन बसलेली असते. इकडे समीरला मात्र सुचत नाही. काय कराव काय नाही. कारण असा प्रसंग त्याच्या आयुष्यात येईल त्याने स्वप्नात सुद्धा विचार न्हवता केला. समीर आणि सिमरनची डोळ्यांनीच सुरवातीला मनोमिलन झाले होते. पण बोलण्याची सुरवात कुणी करावी. याची दोघेही वाट बघत असतात. पुण्यातून ट्रेन केव्हाच सुटली होती. थोड्यावेळातच दौंड स्टेशन येणार होते. तरीही दोघेही अजून गप्प च होते. कुणीच कुणाशी बोलयला मात्र तयार नव्हते. समीरने मात्र न राहून विचारले Hii सिमरन तुला माझ नाव कस काय माहिती? सिमरन प्रश्नार्थक चेहऱ्याने समीरला विचारते. समीरला मात्र काय बोलाव या वर काय नाही. अस झाल होत. तुझ नाव कस माहिती नसणार आहे. तू तर आपल्या महाविद्यालयची स्टार आहेस.

असे बोलून समीर तिला flirt करण्याचा प्रयत्न करीत असतो. तुझ नाव काय सिमरन समीरला विचारते? माझ नाव समीर जगताप. मी अकरावीला या वर्षीच प्रवेश घेतला. अशी थोडीफार तोडकि मोडकी स्वत:च्या बाबतीत ओळख करून देतो. तू कुठे जातेय. पण सिमरन? मी सांगलीला जातेय. मावशीकडे ती खूप दिवसापासून मला बोलावतेय. पण क्लास आणि अभ्यास यामूळे तिच्याकडे जाण होतच नाही. म्हणून विचार केला कि, यंदाच्या दिवाळीला तिला जाऊन भेटाव. अरे वा! तू पण संगीलाला जातेय. मावशीकडे आणि मी सुद्धा मामाकडे जातोय. सांगलीलाच दिवाळीनिमित्त सध्या तरी दोघांच डेस्टीनेशन एकच आहे. यावर हास्यकल्लोळ करून सिमरन आणि समीरच्या गप्पांना चांगलाच जोर बसलेला असतो.

       दोघेही आता चांगलेच गप्पा करायला लागले होते. दोघांच्या गप्पान मध्ये चांगलीच रंगत जमली होती. आता एकमेकांना ते बर्यापैकी ओळखायला लागले होते. थोड्याच वेळात सांगलीचे स्टेशन येणार होते. आता गप्पांना विश्रांती देऊन त्यांना आपापल्या घरी जायचं होते. सिमरनला मावशी स्टेशनवर घ्यायला आली होती. त्यामुळे ती मावशी सोबतच घरी गेली होती. आणि समीर मामांकडे गेला होता. दिवाळी संपली होती महाविद्यालायचे दुसरे सत्र सुद्धा सुरु झाले होते. प्रत्येकजन हळू हळू एक एक दिवस पुढे सरसावत महाविद्यालयाला येण्याचा प्रयत्न करत होता. समीर सुद्धा सांगलीला मामाच्या गावाकडून येऊन पुण्यात आला होता. आज बऱ्याच दिवसांनी दिवाळीचा फराळ वैगेरे खाऊन समीर महाविद्यालयात येणार होता. इकडे सिमरन चे सुद्धा महाविद्यालय सुरु झाले होते. यंदा तीच १२ वीच वर्ष असल्यामुळे ती सांगलीहून लवकरच महाविद्यालयात रुजू झाली होती.समीर आणि सिमरनचे महाविद्यालय सुटल्यावर ते दोघेही एकाच बसने आपआपल्या घरी जात असे. दोघेही अगोदर या पूर्वीसुद्धा एकाच बसने जात होते. पण ओळख नसल्यामुळे ते या पूर्वी कधीच बोललेच नाहीत. पण आता ट्रेन मध्ये नुकतीच ओळख आणि भेटसुद्धा झाली होती. त्यामुळे ते आता महाविद्यालय सुटल्यावर बसमध्ये सुद्धा एकत्रच जात होते. रोज सिमरन आणि समीर ची बस मध्ये भेट व्हायला लागली होती. दोघेही शेजारी शेजारी सीट वर सोबत बसत होते. महाविद्यालयाच्या मुलांनी तर हे दृश्य पाहून तर त्यांचे तोंडातच बोट राहिले होते. कॉलेजची सर्वात सुंदर मुलीसोबत हा जुनिअर कसा काय हिंडतोय.

       दोघात आता छान गट्टी जमली होती. रोज एकदा का होईना, पण फोनवर सुद्धा दोघांच्या गप्पा होत होत्या. सिमरन चा गुड नाइटच्या मेसेज आल्यावर समीरची इकडे गुड नाइट होत होती. समीरचा गुड मॉर्निंग चा मेसेज आल्यावर सिमरनची गुड मॉर्निंग होत होती. दोघेही आता एकमेकांना पुरेशे समजून व ओळखण्यात खंबीर झाले होते. सिमरन आपण कुठे तरी खूप छान अश्या निसर्गरम्य वातावरणात फिरयला जायचं का? चालेल तुला आपण दोघेच? हो चालेल कि, समीर जाऊ कि आपण दोघेही फिरायला त्यात तू एवढी परमीशन का मागतोय? आणि कधी पासून परमीशन घ्यायला लागलायस तू ? यु आर माय बेस्ट फ्रेन्ड असे बोलून सिमरन समीरसोबत फिरायला जाण्यासाठी तयार होते.

        पण समीरच्या मनात वेगळाच विचार चालू असतो. समीरला आता सिमरन आवडायला लागलेली असते. समीर सिमरनवर प्रेम करायला लागलेला असतो. त्याला आता ती महाविद्यालयची सोनपरी पेक्षा त्याच्या आयुष्यातली लाईफ पार्टनर म्ह्णून समीर सिमरनचा विचार करायला लागला होता. पण एक विचार असाही येतो कि, जर मी सिमरनला माझ्या मनातली भावना सांगितली तर तिच्या मनाला वेदना झाल्या तर? माझ मत सिमरनला आवडलच नाही तर? आणि आमची चांगली मैत्री च संपुष्टत आली तर? अश्या विविध जर तर च्या प्रश्नांचा भाडीमार समीरच्या मनात सारखा गोंगावत होता. म्हणून काय कराव. सिमरन ला प्रपोज कराव कि नको, कराव सद्य तरी याच विचारात समीर गोंधळला होता.पण मनाची अजूनही पूर्वतयारी सिमरनला प्रपोज करण्याची नव्हती या गोष्टीला इथच समीरने फुलस्टोप दिला होता.

         सिमरन आणि समीर दोघेही रविवारच्या सायंकाळच्या वेळात खडकवासल्यला फिरायला निघाले होते. समीरने मुद्दमच ठरवले होते. कि आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात. म्हणजे आपल्याला सिमरनला सरप्राइज देऊन प्रपोज करता येईल. पण मनात आलेले भडीमार प्रश्नामुळे समीर सिमरन जवळ प्रपोजचा विषय सुद्धा काढत नाही. समीर तुला माहिती का? तू माझ्या आयुष्यातला सर्वात छान आणि महत्वाची व्यक्ती आहे. आणि छान मित्र सुद्धा आहे. तू माझ सर्वस्व आहेस. आता पर्यंत मला माझ्या आयुष्यात असा व्यक्ती कधीच लाभला नव्हता. आणि लाभणार सुद्धा नाही. सिमरन ने तिच्या मनातली भावना समीर जवळ व्यक्त करून दाकवली होती. आता सामिरलाच मनात प्रश्न पडायला लागला होता. कदाचित सिमरन ला सुद्धा मी आवडत असेल तर? आपण आपल्या मनातली भावना व्यक्त करायला काय हरकत आहे. सिमरन आय लाइक यु असे बोलून समीर त्याच वाक्य पर्ण न करताच सिमरन त्याच्यावर खूप हसली. आणि तो विषय चेश्टेवारी पुढे सरकावला होता. समीर सुद्धा तिच्या हसण्यात आता हसायला लागला होता. त्याच्या मनाला वेदना मात्र झाल्या होत्या. मनाला दुखापात झाली होती. पण सिमरन च्या हसण्यात त्याने मात्र स्वतःच हसू फुलवले होते. दोघांची खडकवासलाची ट्रीप छानपने रंगत झाली होती. पावसाच्या हलक्या सारी कोसळत होत्या. समीरने मकाई वाल्याकडून मकाई चे भाजलेले भूटे घेतले होते. एकाच मकाइच्या तुकड्यात समीर ने आणि सिमरन ने आपला स्वाद चाखला होता. सोबत चहा आणि भजी सुद्धा होती. दुधात साखर पडावी तसे हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.

          अश्या प्रकारे छानपैकी समीर आणि सिमरन ची खडकवासल्याची चं पैकी ट्रीप झाली होती. लवकरच आता फेब्रुवारी महीना तोंडावर येणार होता. सिमरनचे बारावी बोर्डाचे पेपर जवळ येऊन ठेपले होते. टाइमटेबल बोर्डाने वेबसाईटवर अपलोड केला होता. त्यमुळे आता सिमरन ला सुद्धा अभ्यासाच्या तयारीला लागायचे होते. आता समीर सोबत भेटणे कमी होणार होते. महाविद्यालयाने सुद्धा बोर्डच्या पेपर च्या अगोदर एक महिनाभर मुलांना अभ्यास करण्यासाठी सुट्ट्या दिल्या होत्या. त्यामुळे महिनाभर समीर आणि सिमरन यांची भेट होणे जवळ जवळ अशक्यच होते. फक्त मेसेज आणि फोनवर त्यांची चर्चा सुरु होती. पण तेही थोडावेळ सिमरन समीर सोबत बोलत असे. कारण तिला तिच्या अभ्यासावर फोकस करायचा होता.

                  22 फेब्रुवारीला सिमरनचा १२वी बोर्डाचा पहिला पेपर होता. समीरने ऑल द बेस्ट सांगण्यासाठी फोन केला होता. पण सिमरन ने फोन घेतला नव्हता. समीर ने त्याचा निरोप मेसेज द्वारे कळवला होता. सिमरन आता तिच्या पेपरानमध्ये खूप व्यस्थ झाली होती. समीर ला सुद्धा तिची कनडीशन माहिती असल्यामुळे तोही तिला डीस्टब नव्हता करत. एक एक दिवस पुढे सरसावत होता. सिमरन चे पेपर सुद्धा संपण्यात यायला लागले होते. शेवटचा १ पेपर राहिला होता. सिमरन ला सुद्धा समीर ला भेटायची ओढ लागली होती. खूप दिवसांपासून समीर पासून दुरावा निर्माण झाला होता. शेवटचा पेपर संपल्यावर सिमरन समीरला स्वतःहून भेटायला गेली होती. समीरला सुद्धा सिमरन भेटण्याचा आनंद झाला होता. दोघांची भेट झाली. सिमरन आता पुढे काय कारायाचे ठरवले आहे १२वी नंतर समीर तिला विचारतो. समीर माझ ना लहानपणासूनच स्वप्न आहे. मला एअर होस्टज व्हायच आहे. आणि मी त्या साठी ट्रेनिंग ला दिल्लीला जायचं ठरवले आहे.आणि मी लवकरच जाणार आहे. सिमरन चा हा निर्णय ऐकून समीर मात्र मनातून कोलमडला होता. त्याची सर्वात जवळची मैत्रीण सोडून जाणार होती. आणि विशेष म्हणजे त्याच सिमरन वर प्रेम होत.

         समीर तुला माझा निर्णय आवडला नाही का? मग तुझा अचानक एवढा चिंताजनक चेहरा का झाला? सिमरन समीरला प्रश्न विचारू लागली. पण समीर ने या प्रश्नाचे एकही प्रतीउत्तर दिले नव्हते. तू कधी निघेतय दिल्लीला सिमरन , समीर विचारत असतो. मी उद्या सायंकाळी ७ वाजता पुणे स्टेशन वरून माझी ट्रेन सुटेन.आणि तू यायच हा मला स्टेशन वर सोडायला मला तुझे काहीही कारण चालणार नाही. सिमरन समीरला हक्काने आदेश देते. दुसऱ्या दिवशी समीर सिमरनला सोडायला स्टेशन वर पोहचतो. यावेळी समीर विचार करतो. आज सिमरनला खरच मनातले सांगून टाकावे कि, तू मला खरच आवडते. तू माझ आय लाईक यु प्लीज मस्करीत घेऊ नकोस. माझ मनापासून तुझ्यावर प्रेम आहे.आज आपण सिमरनला सर्व सांगून टाकूयात अशी मनाची खुणगाठ बांधतो. आणि समीर दिल्ल्ली ला जाण्याऱ्या ट्रेन कडे धावत असतो. पण स्टेशन वर खूप भरमसाठ गर्दी असते. ३ नंबर च्या फलाटावर सिमरनची ट्रेन उभी असते. समीरला ट्रेन पर्यंत पोहचता पोहचता एवढा उशीर होतो कि, समीर पोहचतो न पोहचतो तेवढयात ट्रेन दिलील्ला रवाना होते.

          सिमरन दिल्लीला मार्गस्थ होते. आज जवळ जवळ दोन वर्ष झाली. समीर आणि सिमरन चा काहीच संपर्क राहिला नव्हता. भारतात नवीन नवीन इनस्टाग्राम लौंच झाले होते. बऱ्यापैकी सर्वच तरुणांनी इस्टाग्रामवर आपआपले अकाउंट तयार केले होते. समीरने एक दिवशी इनस्टाग्रामवर सिमरनची प्रोफाइल बघितली. आणि तिला रीकवेस्ट पाठवली. २ दिवस झाले सिमरन ने समीर ची रीकवेस्ट स्वीकारली नव्हती. समीरला वाटले कदाचित सिमरन सर्व विसरली असावी. पण २ आठवडाभरानंतर समीर ची रीकवेस्ट सिमरन ने स्वीकारली होती. दोघे आता इस्टाग्राम वर मेसेज पाठवायला लागले होते. समीर ने विचार केला अजूनही मला सिमरन आवडते. २ वर्ष झाले होते अजून किती दिवस आपण फक्त मित्र म्हणून राहायचं आहे. म्हणून त्याने डीजीटल लव लेटर सिमरन ला सेंड केले होते. सिमरन चा काय रीपलाय येईल याची समीर वाट पाहत होता. जणू काही समीर चा बोर्डाचा निकाल च लागणार होता. २ दिवस झाले समीर तो मेसेज उघडत नाही. त्याच्या मनात भीती असते सिमरन या माझ्या प्रपोज वर काय रीपलाय देईल. २ दिवसांनी समीर मेसेज उघडतो. मेसेज बघण्यासाठी समीर खूप उत्साहित असतो. मेसेज उघडल्यावर सिमरनने पाठवलं असत. So sorry, I don’t think we could be in a relationship. I am already committed to someone else but, we can be friends for sure समीरच मन पुन्हा खचते. आणि सिमरनला स्माइल पाठवून इनस्टाग्राम बंद करतो. 




Rate this content
Log in

Similar marathi story from Romance