Jitesh ashok Kayarkar

Inspirational

3  

Jitesh ashok Kayarkar

Inspirational

*आईची दिवाळी*

*आईची दिवाळी*

3 mins
578


  आपण कधी बाजारात जातांना बघतो कि रस्त्याच्या बाजुला एखादी स्त्री काही ना काही आपल्या संसारासाठी व्यवसाय करत असते. त्या स्त्री कडुन आपण खुप भावबाजी करून वस्तू विकत घेत असतो. पण अशा एका स्त्रीला किती कष्ट करून आपल्या मुलांना छान शिक्षण, जेवण मिळाव यासाठी ती दोन तीन रूपयांचा व्यवसाय करत असते. अशीच एक स्त्री म्हणजे माझी आई...

               माझ्या आईची दिवाळी खुपच वेगळी असायची. संगळ्याच्या घरी आई वडील मुलांना नवीन कपडे, नवीन आवडीच्या वस्तू, खुप सारे फटाके घेऊन देतात. आपल्या मुलांच्या दिवाळीत सर्व इच्छा पुर्ण करतात. परंतु माझी आई वेगळीच मज्जा करायची. आमची परिस्थिती खुप गरिबीची होती. वडील लहानपणी च सोडून गेले. पऱंतु आईने कधीच त्या परिस्थितीची आणि वडीलांची जाणीव मला होऊ दिली नाही. मुलाला काय हव. त्याची आवडी निवडी काय हे माझी आई लवकरच ओळखत होती. कधी मला कोणती वस्तू आवडली आणी ती मी आईला न मागता आई मला दुसऱ्या दिवशी आणून द्यायची.

   दिवाळीच्या सणाला लोकांची घरे रोषणाई आणी दिव्यांनी अशी जगमगत होती. परंतु माझ्या घरी एक पण दिवा नाही. काय करणार? आई सकाळी पासून वस्तू विकायला गेली कि सायंकाळी ९ वाजल्यानंतरच यायची. मी दारात एकट बसून राहयचो. आणी मला बघुन आनंदाने म्हणायची " माझ्या राजकुमार अंधारात का बसला चल आपण थोडे सोबत दिव्ये लावुया". अस म्हणताच मी आनंदीत होऊन जायचो. पण आई खुप थकुन आली. तिला त्रास होतो हे मला कळत होते. आपल्या लेकंराने पण दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी ते करत होती..

   आईच्या हातच्या चकल्या आणी लाडु खायची वेगळीच मजा असायची. खुसखुशीत बनविलेला चिवडा, शंकरपाळे खूपच आवडीने खायचो मी. म्हणजे आईच्या हातात अन्नपूर्णा देवी असते हे मला तेव्हा कळले. स्वतः काहीच न खाता माझ्यासाठी फराळ बनवून ठेवायची. दिवाळीच्या पुजेला स्वतः आपल्याला साडी न घेता माझ्या साठी महागळा ड्रेस आणायची. फटाके, इतर वस्तू न सांगता आणुन राहयची. तेव्हा कळायला लागल. की आई आपल्या साठी किती त्याग करते. 

        आई दिवाळीत दिव्यांचा व्यवसाय करायची ना तेव्हा मी पण आई सोबत आईला मदत करायला जात होतो. परंतु बाजारात एखादा व्यवसाय करणे किती कठीण असते. वेगवेगळ्या प्रकारचे लोग आपल्या दुकानात येतात. नको हवे ते भाव करतात. त्यांच्याशी बोलुन वस्तू विकणे हे आईलाच जमत होते. परंतु लोक शाँपीग माँल, मोठ मोठी दुकाने यामधून जेव्हा वस्तू विकत घेतात तेव्हा ते भावबाजी का करत नाही. 

हेच मला कळत नव्हते मी आईला विचारले असता आईने उत्तर दिले. की लोकांना महागड्या दुकानातून वस्तू घेत असताना आपली श्रीमंती आपला मोठेपणा जपून ठेवण्यासाठी ते त्या वस्तू ची किमंत कमी न करता त्याच किमतीत घेतात परंतु, गरीबांच्या दुकानातील ५ रूपयांची वस्तू घेण्यासाठी ते २ रू कमी करायला लावतात. कारण ते त्यांना महाग वाटते आणी माँल मधील वस्तू ही खुप कमी किमंतीची वाटते म्हणून..?

    जेव्हा तुम्ही २००० हजारांचे शर्ट, पँंन्ट ५००० हजारांची साडी घ्यायला कोणत्यच गोष्टींचा विचार न करता ही ती साडी खूप महाग आहे कमी किमंतीची न घेता किवा तिथे पैसे कमी करता. त्यांनी फिक्स रेट म्हटल्याबरोबर ठिक आहे आपल्याला खुप आवडली अस विचार करून नको तेवढे पैसे दुकानदाराला देऊन टाकता मग रस्त्यावर वस्तू विकण्यासाठी बसलेल्या स्त्री कडून तुम्हाला १० रुपयांच्या दिव्यांवर ३ रूपये कमी करा अस म्हणतानी थोडा तरी विचार करा की त्या मोठ्या दुकानदार किवा माँल सारख्या मालका ऐवढे श्रीमंत नाही. आज जी वस्तू विकल्या जाईल त्याच्या पैशातुन ती माऊली आपली दिवाळी साजरी करू शकणार, ती स्वतासाठी नाही तर आपल्या गरीब कुटुंबासाठी रस्त्यावर दिवे, रांगोळी किवा इतर वस्तू विकायला येत असते हे लक्षात ठेवा.

           घरी दारी तांसतास काम करून दिवे, रांगोळी आणी दिवाळीच्या वस्तू बनवून जी आपल्या घरच्या दिवाळी साजरी न करता लोकांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून तुम्हाची रस्त्यावर बसून वाट बगत असते त्या आईची त्या स्त्रीची पण दिवाळी आनंदाने साजरी व्हावी म्हणून तिच्या वस्तूचे भाव न करता योग्य किमंत देत चला. या सर्व गोष्टींचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळल की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक आई आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी जी २ / ४ रुपयांसाठी कष्ट करत असते. उन्हात फिरून ५- १० रुपयांची रांंगोळी विकत असते. त्या आईची दिवाळी ही श्रीमंतांच्या दिवाळीपेक्षा पण खुप आनंदी आणी आपुलकीची असते.

    शेवटी एवढच सांगणार की आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात कुठेना कुठे कोणती तरी आई आपल्या संसारासाठी, मुलांसाठी दिवाळी छान साजरी व्हावी म्हणून रांगोळी, दिवे व इतर वस्तू विकत असेल तेव्हा त्यांच्या परिस्थितीचा विचार करता त्यांच्या वस्तुंची भावबाजी न करता... त्याच्या वस्तूना योग्य तोच मोबदला द्यावा...

                 हिच विनंती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational