Jitesh ashok Kayarkar

Others

3  

Jitesh ashok Kayarkar

Others

मोबाईलचा खेळ

मोबाईलचा खेळ

3 mins
612



      आजचे जग हे टेक्नॉलॉजीचे जरी असले तरी त्यामध्ये मोबाईलची भुमीका खुप महत्वाची दिसुन राहली आहे. हल्ली मुलांच्या बाबतीत मोबाइल हा त्यांच्या जवळचा मित्र बनला आहे. मला मोबाईल ला दोष नाही द्यायचा मोबाईल ही मानव जीवनातील खुप उपयोगी साधन आहे परंतु काही प्रमाणात त्याचा गैरवापर होत चालला आहे हे थाबंवणे गरजेचे आहे यासाठी हे लिहिले आहे.

       मुलांचा जन्म झाला की त्याला खेळण म्हणून अगोदर छोटे छोटे खेळणी द्यायचे. परंतु आजची पिढी चक्क आपल्या मुलांना मोबाईलचा नाद लावत चाली आहे.ज्या वयात मुलांना आई- बाबा बोलणे शिकवल्या जात होते.त्याच वयात मुलांना माँम, डँड, मंम्मी पापा सारख्या शब्दाने त्यांची भाषाच चेंज करून टाकली आहे. मुलगा रडायला लागला की त्याला अंगाई न गाता त्याला एखाद्या कारटुन गाण्याचे व्हिडिओ लावुन दिला कि तो चुप बसतो आणी ईकडे आई वडील आपल्या कामात व्यस्त. म्हणजेच आजच्या आई- वडीलांना आपल्या मुलांसाठी सुद्धा वेळ नाही. मुलांने आपल्याला कामात त्रास द्यायला नको यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देऊन कामे करण्यात व्यस्त. परंतु त्या मोबाईलच्या किरणांचा त्यांच्या डोळ्यावर, त्यांच्या डोक्यांवर किती मानसिक त्रास होतो याचा थोडा देखील विचार केला नसेल. मुलांना त्याची एक सवयच लागली आहे. वडील घरी आले की त्यांच्या हातातून मोबाईल घेऊन गेम खेळायला लागतात. आणी वडीलांना वाटते की आपला मुलगा हुशार बनतोय, त्याची बुद्धीक्षमता वाढत आहे.

                वडील सांगतात काय बगा माझा मुलगा स्वत: गेम चालू करतो, स्वतः फोन लावतो, गाणे लावतो हे म्हणायला किवा सांगायला खुप छान वाटते परंतु त्यांच्या बुद्धी क्षमतेवर त्याचा मानसिक तणाव हा वाढत जातो. अगोदर जी लहान मुले मित्रांना गोळा करून खुप सारे मजेदार खेळ खेळायचे, रेतीवर बसुन रेतीचे घर बणवायचे, स्वयंपाक स्वयंपाक खेळायचे, लपंडाव, झुला झूलणे यासारखे जे गमतीशीर खेळ आहे,ते खेळताना आजच्या मुलांना खुपच कमी बघायला मिळते. आई वडील आपली मुले बाहेर खेळायला गेली की बदमाश, वाईट संगत लागणार या भितीमुळे त्यांना खेळायला जाऊ देत नाही. त्यांना घरीच मोबाईलवर गेम खेळ, काम्पुटर वर मध्ये खेळ असे सांगतात. जे आनंद जे आयुष्य त्यांनी बाहेर जगायला पाहिजे. ते त्यांना चार भिंतीच्या (फ्लॅट) खोलीमध्ये कैद करून ठेवण्यासारखे केले आहे. यामध्ये आई वडीलांची खुप मोठी चुक होत आहे अस मला वाटत आहे. त्यांच्या या सततच्या मोबाईच्या गेम खेळण्यामुळे मुलांना डोळ्याचा त्रास, डोकेदुखीचा त्रास हा वाढत चालला आहे. आज ५ वर्षाच्या मुलांना शाळेत चष्मा लावून जातानी बघावे लागते. त्या छोट्या जीवाला कोवळ्या वयातच चष्मा कसा काय लागतो. त्याचे कारण हे मोबाईल च्या स्क्रीनवर वर च्या किरणांचे डोळ्यावर होणारा ताण यामुळेच मुलांचे डोळे हे कमजोर होत चालले आहे..

       आणी आजच्या मुलांना पब्जीसारख्या गेमने वेड लावले आहे. ५ ते १० वर्षातील मुलांना विचारावे काय करत आहे मोबाईलमध्ये तर ते सांगणार की मी पब्जी गेम खेळत आहे. मला त्रास देऊ नको. एखाद्या मुलाला आईने कामासाठी आवाज दिला तरी तो त्याकडे लक्ष न देता फक्त मोबाईल गेममध्येच व्यस्त राहतो. व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ते विनर विनर चिकन डिनर या सारखे शब्द लिहून त्यामधून काय मिळणार आहे. वडीलांच्या मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी, तुमच्यातील कलेसाठी करा. आणी शक्यतो लहान मुलांनी मोबाईल कमी वापरावे ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल, परंतु या गेम खेळण्याच्या नादाला लागु नका. हा पब्जी गेम, कोणतेही गेम मुलांना लागलेल एक वाईट

व्यसन आहे त्यावर प्रत्येक आई वडीलांनी लवकरात लवकर उपाय योजना करायला पाहिजे. 

              हिच विनंती...


Rate this content
Log in