STORYMIRROR

Jyoti Kale

Inspirational

2  

Jyoti Kale

Inspirational

आई

आई

3 mins
120

सगळ्याच आया मुलांना वाढवतात. या जगांत माझा जन्म असामान्य रितिने झाला,एक अपंग मुलगी झाल्यावर. माझ्या आईवडिलांचे सांत्वन कोणी केले असेल?  तरीही त्यांनी नियतीचे आव्हान स्वीकारले. माझे वडील नगर जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्यात शेतकी अधिकारी म्हणून कामाला होते खेड्यात कामाला होते.त्याकाळी आत्तासारखे पगार नसतांना 15व्या दिवसापासुन मला मुंबईला दवाखान्यात नेणे सुरु केले.वडिलांना सारखी रजा कशी मिळ्णार?म्हणुन आईने मला नेले नेहमी-माझे वजन,बुटाचे वजन सगळे उचलूनमला उपचार सुरु केले. सुरवातीला गुड्घ्यावर चालायला लागलेली मी मग बुट घालून चालावे लागे. ते जड बूट ,मी अस सगळ घेवून मंबई-नंतर पुण्याच्या ए.फ. म.सी वानवडीला दवाखान्यात वा-या केल्या. कधी कधी ती उपाशी सुधा राहिली. दर काही दिवसांनी बुट बद्लावे लागत. अपार मेहनतिने श्रमाने घेतलेल्याचे फळ येवुन मी

दोन्ही पायांवर खऱ्या रीतीने चालायला लागले. 


हे थोड्क्यात असले तरी त्यामागचे कष्ट ,सहनशीलता लोकांचे बोलणे सगळे आले. अशी मुलगी तरी तुम्ही ह्सतमुख कसे? मदत न करता बोलणारे, गंमत बघणारे जास्त. अश्या मुलीवर खर्च कश्याला करता? शाळेत सगळ्यांसारखेच घातले. तुला बघुन चिडवलं जाणार,लोक हसणार, पण आपण रागवायचं नाही. मला वेगळे बुट घालुनच सगळीकडे जावे लागे. खेड्यांत शालेय शिक्षण पुर्ण करुन शहरांत जातांना त्यांनी दिलेला अमोल कानमंत्र वागण्यात पुढे सगळ्यात उपयोगी ठरला तो असा----एखाद्या नविन गोष्टीच लोक कुतुहलाने अवलोकन करतांत तसच तुला बघुन हसल जाईल, कुचेष्टा होईल, तिकडे न बघता आपल्या ध्येयाकडे वाट्चाल करायची,अजूनही ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो.


मला आईवडिलांनी कष्ट करून,म्हणजे मला जगांत वावरायला जे काही लागेल तसं उभं केलं लहानपणी आपल्याला काही कळत नाही पण आता समजत मग देवाची कृपा आणि त्यांच्या अथक परिश्रमा ला मी न्याय द्यायला हवा मला अडचणी पुष्कळ आल्या,त्यातूनच वाट काढत इथपर्यंत आले नेहमी हसते, माझ्या मनांत एकदाही हा विचार आला नाही कि अरे मीच अशी का?आई वडिलांच्या अथक परिश्रमाने घडलेली मी जगांत बिनधास्त वावरते,अजूनही मला वेगळे अनुभव येतात त्यांनी दिलेला कानमंत्र मला कायम पुरतो,तो म्हणजे तुला बघून लोक हसणार,चिडवणार पण तू रागवायचं नाही.

शाळेपासुनच आईने प्रत्येक गोष्टीत् भाग घेण्याची सवय लावली. त्यांनी मला खुप शिकवलं,मी B A. Psychology B Com आहे. मला पेंटिंगची आवड आहे नवं करून बघण्याची आवड आहे. B.A.झाल्यावर मला share ब्रोकरच्या ऑफिस मध्ये नोकरी मिळाली,आफिस सांभाळून आलेल्या लोकांना share बद्दल मार्गदर्शन करत होते तेंव्हाच मी B.Com केलं नोकरीत सगळं शिकून घेतलं,काही वर्षांनी ती नोकरी मी सोडली.Bank परीक्षेची जाहिरात वाचून ती परीक्षा दिली,लेखी ,मुलाखत सगळं होऊन मी बँकेत नोकरीला लागले,कोणाच्याही ओळखी,चिट्ठी शिवाय। चांगल्याप्रकारे नोकरी करून आता निवृत्त होऊन आनंदाने माझा वेळ व्यतीत करत आहे.


आता थोडंफार लेखन करते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये काही छापून आलं आहे जे सुचेल ते लिहून ठेवते नव्या तंत्राचा वापर शिकले.मला voice over ची आवड असल्याने आणि आता वेळ असल्याने मी हे शिकले आणि त्याचा वापर करते. पहिल्यांदा मी दवाखान्यात जाऊन अनोळखी पेशन्टची विचारपूस करत असे,ओळखीच्याकडे आपण जातोच.पण काही दिवसांनी मला ते जमेनास झालं. संस्थाना मदत करते,गरजू व्यक्तीला मदत करते,हिंगण्याच्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आज्यांशी बोलणे,काही वाचून दाखवणं असं करते त्या माझी वाट बघत असतात. अंध मुलांना अभ्यासच पुस्तक माझ्या आवाजात रेकॉर्ड करून दिली म्हणजे त्यांना ऐकायला सोपं जात व अभ्यास करता येतो. माझ्या क्षमते प्रमाणे छोटं मोठं काम करते. आत्ताच्या परिस्थितीत बाहेर जात नाही त्यामुळे काही गोष्टी फोनवरून करते,सगळ्यांशी फोनवरन बोलते. ओळखीत कुणाला काही समस्या असेल कधी छोटी गोष्ट त्रासदायक ठरू शकते ती बोलण्याने दूर करते ,मी कोनसलिंग चा कोर्स केला नाही पण ते काम करू शकत असल्याने करू शकते.


देवाची कृपा आणि अश्या माझ्या आईवडिलांच्या सर्व प्रय्त्नाने मी आज जगांत कोणतिही गोष्ट बिंधास्त करु शकते. आनंदी राहु शकते. आता मी थोडं सामाजिक काम जस जमेल तसं करते,आत्तापर्यंत ज्या गोष्टींना वेळ मिळाला नव्हता त्या करते.आई वडिलांनी वेगळ्या मुलीला घडवून समाजात मानाने जगायला शिकवल त्या मागे देवाची मोठी कृपा आहे. एकच सांगते आमच्यासाख्यांना देवाने माझ्या आईसारखी आई द्यावी, सगळ हसतमुखाने करुन समाजाच्या सुद्धा उपयोगी पडणारी. आमच्यासारख्या लोकांकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन वेगळा असतो,ह्यांना जमेल का,येईल का वगैरे.


आपण किती जगलो त्यापेक्षा कस जगलो हे महत्वाच. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन महत्वाचा. मी कॉलेजला पुण्याला शिकायला आले तेंव्हापासून पुण्यात आहे,रिक्षाने जिथे जाण शक्य असेल तिथे मी जाऊन माझी काम,माझ्या आवडी,वृद्धा श्रमात जाऊन आज्यांना भेटणं इत्यादी गोष्टी करते. मला माणसांची आवड आहे लोकांशी बोलणं,कुणाकडे जाण गप्पा,काही मदत हवी असेल तर करणं. माझा निवृत्तीचा काळ मी चांगल्या प्रकारे व्यतीत करत आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti Kale

Similar marathi story from Inspirational