आई-पप्पा माझे प्रेरणास्थान
आई-पप्पा माझे प्रेरणास्थान
प्रत्येकाच्याच जीवनातील अविस्मरणीय आणि आदरणीय स्फूर्ती स्थान असते ते म्हणजे आई आणि पप्पा मी अतिशय गरीब घरातील . मी लहान असताना घरची परिस्थिती बेताचीच होती. आई रानात जावून गौऱ्या सरपण आणायची. घरी आल्यावर घरातील काम करायची.
दिवसभर पापड लाटायची . पप्पा पोष्टात होते पोस्टमन म्हणून पण पूर्वी पोस्टमन ला काम भरपूर होती पण पगार कमी होता. आई माझी खुप कष्टाळू आहे. ती शिलाई काम पण करायची. एकदा सकाळी घरातील काम आटोपली की जे शिवत बसायची ते रात्री सात लाच शिलाई मशीन वरून उतरायची. मला आजही ते दिवस आठवतात. ते दोघे मिळून कष्ट करत होते .रात्र ना दिवस राब राब राब होते. मी हे सर्व पाहत होते. का कोण जाणे वयापेक्षा जरा जास्त समजदार झाले मी . आई पप्पाचे सतत चांगले संस्कार झाले माझ्यावर. माझा खूप लाड करायचे .
मी ही जास्तीत जास्त अभ्यास करून पुस्तकांना गेलेले पैसे गुणांच्या रूपाने परत मिळवायचे ठरवले. एकदा मी अभ्यासाला बसले की पाच पाच घंटे अभ्यास केल्याशिवाय खाली उतरत नव्हते. मग काय माझा वर्गातील एक नंबर स्थान मी कधीच सोडले नाही. आई वडिलांचे काबाड कष्ट त्यांची परिस्थिती सतत बारकाईने आत्मीयतेने निरीक्षण केल्यामुळे मी ही अभ्यासू, कामसू बनत गेले.
सतत बक्षीस मिळवत गेले . आई पप्पांना बक्षीस दाखवताना मला खूप मोठा आनंद होई . आई वडिलांना तर आनंदाश्रू संभाळत येत नव्हते ते दोन्ही नयनमधून ओसंडून वाहत होते. आई मला सतत म्हणायची, पोरी आमचं नाव तू रोशन कर . आम्हाला अभिमान वाटेल असं सतत तू पुढं जावून प्रगती कर .आणि यश गाठ. आई मला सतत प्रेरणा देत होती .
पप्पा मुळे पण अनेक गोष्टींची मला माहिती होत होती. जसं व्यावहारिक ज्ञान , बोलण्याची शैली , नम्रता, मितभाषी , हस्ताक्षर कौशल्य , पोहण्याची कला, सायकल चालविण्याची पध्दत , तेही मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देत होते. माझे खूप लाड केले . मला प्रत्येक सणाला त्यांनी नवीन ड्रेस घेणे कधीही सोडले नाही.
मला आजही आठवत आहे पंचमी च सण होता
मी सात वर्षाची होते . घरात पैसे नव्हते तरी आई ने दिवसभर पापड लाटून 150 रुपये कमावले आणि त्याचा मला गुलाबी कलर चा umbrella फ्रॉक लिबर्टी मधून आणालाच होता.
माझ्या पप्पाचा आवाज खूप छान आहे. हाळ मला आम्ही सुट्टीला गेलो की सर्व जण पप्पाभोवती जमायचे सर्वजण म्हणायचे आज पारावर ची पोथी बालाजी ने वाचायची. आम्ही रात्री सर्व गावकऱ्यां सोबत पारावर पोथी ऐकायला बसायचो आणि खरंच पप्पा जेव्हा पोथी वाचायचे तेव्हा सर्व आसमंत मंत्रमुग्ध होवून जायचा. सतत ऐकत रहाव असच वाटायचं इतकी गोड वाणी माझ्या पप्पाची आहे. त्यांचे हस्ताक्षर पण खूप सुंदर अगदी मोत्यासारखे रेखीव आहे .
एकदा मी शाळेत गेले . सर्व मुली माझ्या वर्गातल्या सोन्याचे कानातले घालून यायच्या . मला पण घालायची आवड इच्छा मनात आली. मी पाप्पाला म्हणाले मला सोन्याचे कानातले घेवून द्या . तर पप्पा मला म्हणाले. तुला शिकून पुढं जायचं आहे की कानातले घालून मिरवाये चे आहे . ते ठरव . मी म्हणाले मला शिकायचे आहे. किती मोठा बोध होतो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये.
पूर्वी मुलीचे लग्न लवकर करायचे . मी सहावीत असताना माझ्या आजोबांच्या मनात माझं लग्नाचे विचार येत होते . त्यांनी पप्पाला बोलूनही दाखवलं की आपण पिंटीच लग्न करू. मला तर सारखं रडू यायला लागले . माझे शिक्षण माझे स्वप्न आता उध्वस्त होणार असेच मला वाटू लागले मी खूप खूप रडले. आणि पप्पाला एकाच वेळी समजावून सांगितलं की पप्पा मला लग्न करायचे नाही मला शिकायचे आहे. खूप खूप शिकायचं आहे .आणि माझे पप्पा ऐकले मला त्यांनी खूप शिकवलं . मी अतिशय भाग्यवान आहे . मला खूप समजदार आणि मैत्रीपूर्ण संबंध असणारे आई वडील मिळाले.
पृथ्वीवर सर्वात निस्वार्थ आणि खर प्रेम फक्त आणि फक्त आई वडिलांचं असतं. असेच अनुभव मला सतत आले . आई वडिलांना कधीही दुखवू नये. ते सर्व काही आपल्यासाठी आणि आपल्या भल्यासाठीच करत असतात. मला माझ्या आई वडिलांकडून भरपूर प्रेम माया ममता मिळाली .
पप्पाला जेव्हा पहिला heart अटॅक आला तेव्हा दाही रान आठवलं मला. आम्ही सर्व त्यांना गुट्टे हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो पण दुसऱ्या दिवशी त्यांचं bp 190 chya वर ऑक्सिजन मास्क लावलेला सतत उलट्यांचा त्रास होत होता आम्ही घाबरून त्यांना रुबी हॉस्पिटल पुणे येथे घेवून गेलो. तिथे त्यांची angioplasty झाली. नंतर दोन महिन्यांनी परत अटॅक आला . आम्ही सर्व त्यांना कमलनयन बजाज येथे घेवून गेलो . तेव्हा angioplasty करण्यात आली परत कारण मैं blockage तसेच राहिले होते पहिल्या वेळी . असे अनेक संकटाना तोंड दिले आहे त्यांनी. मला तर आजही आठवले की रडू येते खूप खूप .
मला माझ्या आई वडिलांशिवाय कोणी नाही . हे देवा माझ्या आई वडिलांवर कोणतेही संकट येवू देवू नको . आणि त्यांना सदैव सुखी ठेव . हीच प्रार्थना .
