५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
कुणीही करावे असे प्रेम नाते,
नसे मोल त्याला मनातून होते.
मलाही कळाले तुला पाहता मी,
तुझ्यातील सच्चेपणा जाणता मी,
मनी रोज स्वप्न तुझे मी पहाते.
नसे ते कशाचे मला भान राही,
स्मरूनी तुला रे तुझी वाट पाही,
सदा प्रीत माझी तुझे गीत गाते.
नको रे सतावू असा जीव जाळू,
करूनी बहाणे मला तूच टाळू,
मनाशी जुळावे तुझे एक नाते.
किती वाट पाहू प्रश्न हा सुटेना,
मनातील हा ध्यास काही मिटेना
कधी तू मला भेटशी याद येते.
बुडावे कितीही असे प्रेम वाटे,
नको रे दुरावा मनी प्रीत दाटे,
अबोला नसावा मनी ओढ होते.