१० सप्टेंबर १९४२ हुतात्मा दिन*
१० सप्टेंबर १९४२ हुतात्मा दिन*


नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी,
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी,
नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी,
पडो देह माझा सदा ती नमो मी ll
"जननी जन्मभूमी स्वर्गादीपी गरियसी l
आता आणि मातृभूमी ही* *स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत."
अशा या मातृभूमीच्या ^ स्वात त्यासाठीअनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.तिचा नावलौकिक वाढावा म्हणून अनेकांनी ती जीवनपुण्य तिच्या चरणी अर्पण केली. आपल्या मातृभूमीसाठी आपण तनमनधनाने कार्य करीत राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे नानांचे सर्वांना सांगणे होते, अशा या बिरवाडीच्या नानासाहेब पुरोहितांनी किसानांची मजबूत संघटना बांधली. त्यासाठी नानांनी 'बिरवाडी विभाग शेतकरी परिषद' संघटित केली व ब्रिटिशांविरुद्ध झुंज देण्यात आली. सेना सज्ज केली.ब्रिटीश सत्तेच्या दडपशाहीचा होता. वरवंटा संपुर्ण देशभर फिरत होता. मूठभर लोक वगळता जवळजवळ सारेच ब्रिटीशांच्या शोषणाला बळी पडले होते. गोरेंच्या स्वार्थी राजकारणामुळे ही भारतभूमी दिवसेंदिवस दारिद्रयाच्या खाईत लोटली जात होती.
"जागवूनी महाडकरांचे अंतरात्मा,
तुम्ही ठरलात पहिले हुतात्मे,
भडकविलीत क्रांतीची ज्वाला,
हे वीरयांचे बंडाचे रान,
तुम्हाला आमुचे कोटी कोटी प्रणाम 'll
वर्षानुवर्षे सावित्रीला पुराच्या पाण्याने महाडची माती भिजून चिंब होते. या पावसाळ्याच्या शेवटात या मातीवरून हुतात्म्यांच्या रक्तयांचा पूर तिला वाहून न्यावा लागला होता.
*धन्य ती महाड नगरी या लढ्याची महाराष्ट्रातील क्रमांक* *दोनचा लढा म्हणून* *इतिहासात नोंद आहे,* चौकात हुतात्म्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहे.
" सद्धर्माचा एकच न्याय कष्टाचा एकच अध्याय, जन्मा आलो मुले म्हणून भारतभूमीच्या कुशीमधून, सुपुत्र हे भारतमातेचे आणि जवाहर देशाचे."
भारत मातेची ही मूकव्यथा जाणून तिच्या लाडक्या सुपुत्रांनी मातृभूमीला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवून प्रसंगी फासावर जाण्याच्या तयारीने स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. असे हे सुपुत्र होते तरी कोण? की जे पावसातून नदी-नालयातून ,शेताच्या बांधावरून काळोख्या रात्री दारे ठोकणा-या उपकारकर्त्यांचा शब्द कुठेच खाली न पडता घरटी किमान एकेक जवान नानांच्या क्रांतिकारी मोर्च्यात सामील व्हायला तयार झाले.
अनेक जीवाला जीव देणारे सवंगडी नानांभोवती जमले. ही सारी माणसे शिक्षित नव्हती. बहुतेक अशिक्षित होती. पण नानांवर त्यांचा जबरदस्त विश्वास होता. म्हणूनच तर ही मंडळी आपल्या संसारावर निखारे ठेवून त्या अग्नीदिव्याला तयार झाले.
" जागा हो माणसा, संधी ही अनमोल
तुझ्या जिवाताला , लाखाचं रं मोल,
घालतील वैरी अचानक घाला".
ह्याचे भान ठेवून द-या - खो-यातील तरुण जातपात विसरून बिरवाडी येथील नाना पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली आली.
म. गांधींनी दिलेला मंत्र ऐकल्यापासून तर नानांच्या अंगात चैतन्य भरू लागले. आपण गो - यांना या देशातून घालवून देण्यासाठी पावले उचलायला हवीत. यासाठी आपले शेलटोलीवरून महाडचे कचेरीवर कृषीवलाचा मोर्चा न्यावयाचा विचार नानांनी केला. नानांच्या शब्दाला फार वजन होते. त्यांच्या समवयस्क मित्रांनी नानांचा शब्द उचलून धरला.
"बिरवाडीचे वीर निघाले अवघे निधड्या छातीचे, ते वीर खरोखर होते नाना जातीचे ,नाना त्यांचे सहकारी अन् नाना मदतीचे ह पुरोहितांचा नाना परि तो पुढे पुढारी मोर्चात".
१ सप्टेंबर समाजवादी गटाची पुण्याला गुप्त बैठक झाली. नाना आपल्या
भाषणात म्हणत होते, ब्रिटीश सरकार आपल्याला उलथून पाडायचे आहे. त्या करीता आपल्या भागाचा हिस्सा म्हणून आपल्याला महाडची मामलेदार कचेरी व खजिना ताब्यात घ्यायचा आहे. ही लढाई आहे, काठया- सोटे यांशिवाय आपल्या जवळ शस्त्रे नाहीत, सरकारी पोलिसांजवळ बंदुका, पिस्तुले असणार, गोळीबारही होणार,पकडले जातील.
"ज्यांच्यात हिंमत असेल, त्यांनी माझ्या झेंड्याखाली यावे." मोर्च्यासाठी पुण्याहुन वसंत दाते, वसंत नगरकर,राजाभाऊ चांदोरकर, आपटे इ. मंडळी आली होती, ८ सप्टेंबर ला अचानक बातमी पोलिसांना नानांच्या बेताचा सुगावा लागल्याची समजली.नाना व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिस पहारा होता. नाना सर्वांना येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत बाळगा असे सांगत होते.
" कदम- कदम पर मौत मिलेगी फिर भी तुम न रुकना,
बहुत सह लिया अब न सहेंगे सोने भडक उठे है l
आणि तो दिवस उजाडला, १० सप्टेंबर १९९४ महाड तालुक्यातील इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहीलेला तो दिवस, या महाड ची मातीच अशी कोणीही आपुलकीने या मातीचा टिळा मस्तकी लावावा असे पावित्र्य या भूमीत आहे. रात्री १२.३० ते १.०० च्या सुमारास मोर्च्याने कँप सोडला. त्यातच नाले - ओहोळ ओलांडून ५००-६०० जणांचा समुदाय शेतातून मार्ग काढीत नडगाव मंदिरात सकाळी ६.०० वा. पोहोचला. नंतर तो महाडमध्ये जूने पोस्टजवळ पोहोचला. मोर्चाने टेलिग्रामच्या तारा तोडल्या, घोषणा वाढल्या होत्या.गाव भयभीत झाले होते. हर हर महादेव अशी गर्जना दुमदुमून शाळकरी मुलगा कमलाकर दांडेकर हा ही सहभागी झाला." देशाची सेवा करण्यासाठी संधी मी वाया घालवणार नाही. असा हा वायु पुत्र होऊन भास्कर मुठीत घेण्यासाठी तिरंगा हाती घेऊन सर्वांच्या पुढे उभा होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने धडाधड बंद केली. स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेले मोर्चेकरी मागे हटण्याच्या मन स्थितीत नव्हते.
क्षणभर नियतीच्या काळजाचा ठोका चुकला. गोळीबाराच्या फैरी झाडू लागल्या. पोलिसांच्या कारवाईंनी पहिला घास घेतला, नथू टेकावला . जे शेलटोलीचे रहिवासी महादेव कोळी जमातीतील.
मोर्चेकरी मरण हातात घेऊन पुढे सरकत होते. सुकटगल्ली समोरील रस्त्यावर अर्जुन भोई कडू पोलिसांच्या गोळीचे लक्ष्य ठरला. अर्जून जमीनीवर कोसळला पण हातातला तिरंगा त्याने सोडला नाही. त्यानंतर मोर्च्यात आघाडीवर असणारा कमलाकर दांडेकर हा ही पोलिसांच्या गोळीचा सावज ठरला. दत्ता अवसरेंच्या दुकानासमोर रक्ताच्या थारोळ्यात कमलाकरचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. पुण्याहून आलेला वसंत दाते हा ही पोलिसांच्या गोळीचा बळी ठरला. तो विठ्ठल मंदिराच्या दरवाजात विसावला.
"सॉंस थमती गई ,नब्ज थमती गई, फिर भी बढते कदम को न रुकने दिया l
प्राण गये हमारे तो कुछ गम नहीं,सिर मातृभूमी का न हमने झुकने दिया"'ll
विठ्ठल बिरवाडकर सह नानांनी वाळण खो-यातील जंगलाचा आसरा घेतला. चार - आठ दिवसात विठ्ठल बिरवाडकर ही पोलिसांना सापडला त्याचा खूप छळ केला गेला. त्यातच त्याचे प्राण विलीन झाले.
गुरुवार दि: १० सप्टेंबर १९४२ हा दिवस स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळी झेलणा-या बलिदानाने महाडचे नाव इतिहासात अजरामर झाले.