STORYMIRROR

Yogita Khadpekar

Romance

3  

Yogita Khadpekar

Romance

ये रे ये रे धना श्यामला

ये रे ये रे धना श्यामला

1 min
135

ये रे ये रे घना श्यामला 

ये रे ये रे घना श्यामला

सावळ्या मिठीत तुझ्या

चिंब भिजू दे रे मला

बरस बरस धुवाॅंधार

अथवा रिमझिम प्रेम तुषार

शोषून घे रे ताप माझा निवेल 

मग तन मन

चंद्र फिरतो मागे मागे

ग्रहांचेही भवती धागे

कशासाठी सारा गुंता

मला ध्यास तुझा नाथा

मिठीत तुझ्या विसावले

अंगोपांगी सुखावले

साफल्याचे माझे सुख

जागोजाग उमटले

हिरवे हिरवे माझे अंग

त्यातले कोंब कोंब

फुलारली प्रीति तुझी

लपवू कोठे सांग कशी

गर्व वाटे मिरविण्याला

लाज झाकू पाहे त्याला

सांग‌ मला कशी वागू?

प्रिया तुला काय सांगू!

प्रीतिच्या वर्षावात भिजून

झाले पुरती चिंब

आता कधी येशील रे?

वाट तुझी पाहिन रे!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance