तूच सुंदरा..
तूच सुंदरा..


दिसताती डोळ्यातून,
भाव तुझ्या अंतरीचे!
चिरणारे काळजाला,
पाते ते तलवारीचे..!!१!!
विरांगनेसम शोभे,
चंद्रकोर भाळावरी..!
जणू अप्सरा स्वर्गाची,
प्रकटली भूमीवरी..!!२!!
चाफेकळी नाकावर,
नथ शोभते मोत्याची..
अलंकारे सजलेली,
लेक मराठमोळ्याची..!!३!!
वाऱ्यासंगे खेळताती,
केस तुझे अवखळ..!
तुझ्या अंगी भरलेली
नागिणीची सळसळ..!!४!!
रूप देखणे पाहुनी
हरपले माझे भान.!
ओवाळून टाकू वाटे,
तुझ्यावर पंचप्राण..!!५!!
पसरला चोहीकडे,
तुझ्या तेजाचा दरारा!
ठाव घेशी हृदयीचा,
तूच खरी गं सुंदरा..!!६!!