STORYMIRROR

Prashant Madne

Inspirational Others

3  

Prashant Madne

Inspirational Others

तुझ्या या ऊनात

तुझ्या या ऊनात

1 min
170

तुझ्या या उन्हात, माझ्या झाले अंगाचे पाणी

जराशा या सावलीसाठी, फिरतो रानीवणी

सहज निघालो चालत तर, उष्ण घाव डोक्यावरी

व्याकुळ जीव घेऊनी, पक्षी निघाले झाडांवरी

पाण्यासाठी चिमणी करतेय ! चिवचिव्..चिऊ...

शेतकरीराजा म्हणतो खूप थकलो, आता पाणी पिऊ

उन्हात या, सावलीसाठी माणसा एक तरी झाड लाव!

संपून जाईल ऑक्सीजन माणसा ...

घालू नकोस झाडावरती घाव

तीन चार कोसावरुनी आणाव लागतं पियाच.... पाणी

थकुन जातं अंग सार्... अन् काहीच नाही ध्यानीमनी

तुझ्या या उन्हात, माझ्या झाले अंगाचे पाणी

थंड पाण्यासाठी खुपच होत आहे ,हाव्..हाव

विकासाच्या या जगती, फ्रिजने घातला मडक्यावरती घाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational