तुझा प्रिय
तुझा प्रिय
तू थोड़ी वेडी आहेस
पण मतलबी अजिबात नाहीस
तू समजायला थोड़ी अवघड आहेस
पण ज्याला समजली त्याच्यासाठी तू खास आहेस
तू प्रेमिका नाही आहेस
पण ज्याच्यावर प्रेम करशील तो भाग्यवान असेल
तू सुन्दर तर आहेस
पण तुझे हृदय त्याहून अति सुन्दर आहे
तू थोड़ी चिढ़ते पण तुज़्या रागात प्रेम दिसते
ना तू अबोल ना तू सखोल
तूज़ी आठवण आणि तुझे बोल
वाटेवरती तू भेटलिस सखी
त्याच आठवणीने घेतला वसा
गुंतलो आणि रमलो तुज़्यात
तुझे चित्र रंगविले काळजात
मरता मरता हेच सांगणे
तूच माझी प्रिया आणि मीच तुझा प्रिय

