स्वप्नपरी
स्वप्नपरी
कोरी आहे आयुष्याची वही माझी
ती भरुन काढायला शाई होवूनी ये....
माझ्या आयुष्याच्या किनार्याला
सतत स्पर्श करुन जाणारं पाणी होवूनी ये....
रोज माझ्या झोपेत येणारं गोड स्वप्न होवूनी ये....
कधीतरी माझ्या चेहर्यावरचं गोड हसु होवूनी ये....
स्वप्नातुन सत्यात उतरणारी कोणतीही गोष्ट होवूनी ये....
पाहतो तिला मी स्वप्नात ती सुंदर परी होवूनी ये.......
अनं माझ्या मनावर राज्य करणारी राणी होवूनी ये.....

