STORYMIRROR

aruna golatkar

Romance

3  

aruna golatkar

Romance

स्पर्श

स्पर्श

1 min
151

जीव वेडा झाला आतुर, मनी उठले का हे काहुर,

फार दिवसाचा विरह, आता जरा नाही धीर,

किती बाकी हितगुज, कधी समोर येशील,

हात हातात गुंफून मला कवेत घेशील, 

आली वाऱ्याची झुळूक, तुझ्या येण्याची चाहूल,

रोमांचित तन - मन, अनामिक सुगंधाची भूल, 

अन् तू आलास समोर, भाव झाले अनावर, 

काय बोलू,किती सांगू, का झाले मी सैरभैर,

नाही सुचले बोलणे, काही नाहीच सांगणे,

सारे शब्दांच्या पल्याड, फक्त तुला निरखणे,

आणि स्पर्शातच सारे....सारे समजून घेणे.


Rate this content
Log in

More marathi poem from aruna golatkar

Similar marathi poem from Romance