STORYMIRROR

aruna golatkar

Others

3  

aruna golatkar

Others

प्रभात

प्रभात

1 min
221

प्रभात समयी, सुंदर वेळी, शिंपण दवबिंदुचे,

गार हवा, मनास मोहर, गोंदण मृदगंधाचे,

प्राजक्त वृष्टी, सजली सृष्टी, कोंदण सोनकिरणांचे,

गवत ओले,स्पर्श मुलायम, पैजण छुमछुम नाचे,

चिमणपाखरे, गाईवासरे, अंगण रांगोळ्यांचे,

मंगल वेळ, प्रसन्न दरवळ, रांजण सुखसौख्याचे,

निसर्गाचे भरभरून स्वागत, कुंपण तोडू मनाचे,

पाऊल वाटा, लगबग सारी, उधाण चैतन्याचे,

प्रभातसमयी सुंदर वेळी, शिंपण दवबिंदूचे


Rate this content
Log in

More marathi poem from aruna golatkar