सखे फक्त तुझ्यासाठी
सखे फक्त तुझ्यासाठी
चार शब्द प्रेमाचे
उमटले माझ्या ओठी
शब्दच झाली फुले
सखे फक्त तुझ्यासाठी ||1||
माझ्या जीवनातील तू
एक आश्वासक साथ
तुजमुळे लाभे मज
स्नेह सौख्याचा हात ||2||
तुझ्या स्वभावातील गोडवा
वाढवी स्नेहबंध आपुले
माझ्या आनंदाचे क्षण
आपुल्या मैत्रीनेच झाले ||3||
निर्मळतेची जोड सखे
आपुल्या या स्नेहाला
हीच सदिच्छा तुजसाठी
उदंड आयुष्य लाभो तुजला ||4||