STORYMIRROR

Janhavi Belsare

Abstract

3  

Janhavi Belsare

Abstract

श्रावणहर्ष

श्रावणहर्ष

1 min
101

श्रावणसरी त्या बरसून येती |

गडगड गडगड मेघ गर्जती ||

इंद्रधनुष्य ते नभांत दिसता |

सप्तरंगी जरी साडी नेसता ||

बंधूराजांस राखी बांधता || १ ||


सोमवार तो महादेवाचा |

बेलपत्र ते त्यास वाहण्याचा ||

मंगळवार तो मंगळागौरीचा |

जागरण करुनी हौस पुरवायचा || २ ||


झिम्मा, फुगड्या खप खेळूनी |

पकपक पकपक पकवा घालुनी ||

नववधूला फेरात घेउनी |

उखाण्यासाठी आग्रह करुनी || ३ ||


हटुश्श्य पानबाई उड्या मारुनी |

बांगड्यांची त्या किणकिण ऐकूनी ||

खेळ सारे झाले खेळूनी |

मध्येच गरम ती कॉफी घेऊनी ||

बैठक मारुनी भेंडया खेळूनी |

रात्र कशी ती आनंदात जाऊनी || ४ ||



Rate this content
Log in

More marathi poem from Janhavi Belsare

Similar marathi poem from Abstract