!! रे वसंता ये अता धावुन!!
!! रे वसंता ये अता धावुन!!
चतुर पक्षी करी कुहूं-कुहूं
चातक पाहे वाट टुहूं-टुहूं..
येई दाटून ऊर राहून-राहून
दयना रे सगळ्यांची घेतली
धरणी मातेने पाहुन..
बरस रे वसंता आता
जाऊ दे ना एकदा भिजून,
सुख आज रे बसलेय सारे थिजून..
असा रूसलास का..?
कान डोळा करून
नुसता बसलायस का.. ?
बरस रे वसंता आता
जाऊ दे ना भीजून
पाहून दैना या
परिजीवनाची, (सजीव सृष्टीची)
आलाय ऊर दाटून..
बघ रे बघ तो मोर
पाहतोय कसा वर मान करून,
जणू नाचायचय त्याला एकदा भावविभोर होऊन..
नको रे नको बसूस तु
असा अबोला धरून,
जाऊदे ना एकदा चिंब-चिंब
सगळ होऊन..
ये बरसूनी एकदा,
आण तुझे मेघ सारे दाटून,
चातक पातोय वाट
रे घेऊ दे ना त्यास
एकदा वर्षाची ती तहान भागवून...
रे वसंता ये अता असा तू धावून
रे वसंता ये अता असा तू धावून...

