प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?

1 min

4.4K
प्रेम म्हणजे काय असतं
एकमेकांना गुलाबाचं फूल देणं म्हणजे प्रेम नसतं
एकमेकांच्या भावना समजून घेणं म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे काय असतं
प्रेमात असावेतच ते लडिवाळ शब्द असं काही नसतं
न बोलताच एकमेकांचे शब्द ऐकता येणं म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे काय असतं
प्रेमात नेहमीच असावा हर्ष असंही काही नसतं
एकमेकांच्या दुुु:खात साथ देेणंं म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे काय असतं
एकमेकांंचा हात हातात घेणं म्हणजे प्रेम नसतं
कितीही संकटं आली तरी हातातला हात न सोडणं म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे काय असतं
रोजच एकमेकांना भेटणं म्हणजे प्रेम नसतं
न भेटताही सतत एकमेकांच्या आठवणीत राहणं म्हणजे प्रेम असतं