पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
पावसाचं रिमझिम
सरीत बरसणं
अन् मनास
मोहून जाणं
बेभान वा-यासह
शहाराव अंगावर
नभ दाटावे आठवांचे
स्पर्श करता पावसाची सर
कोसळणाऱ्या प्रत्येक थेंबात
तुझाच भखस व्हावा मनी
झुळूक आली कोठूनतरी
तो ही भिजतोय सांगून गेली कानी

