पाऊस तुझ्या आठवणींचा!
पाऊस तुझ्या आठवणींचा!
पाऊस, तुझ्या आठवणींचा,
गर्द हिरव्या रानी बहरणारा जसा,
रातीच्या काजाव्यापरी चमचमणारा जसा,
उनाड मन धावे, पाय ना थांबती,
ओढ मनाला जेव्हा तुझी लागते,
कधी तो गडगडणारा, कधी तो कडाडणारा,
मृगा वर येऊन बरसणारा,
मातीचा नवीन सुवास घेऊन येणारा,
कधी मयुरा परी नाचणारा,
उधाण होऊन कोकिळे सव गाणारा,
कधी फुलांचा गंध पसरवणारा,
आठवणींचा झरा पुन्हा वाहू लागतो,
तुझ्या स्वप्नात डुंबलेल्या प्रत्येक रातीचा,
चिंब तू चिंब मी,
कधी माझ्या नजरेअडून जा पहिल्या पावसा सारखा,
कधी दाटून ये, कधी हरपून ये, बरसत रहा मनसोक्त,
क्षणाची साद कशाला, भान न उरावे भोवतालीचे,
लय त्यातली देऊन जा, पाऊस, तुझ्या आठवणींचा

