मी माझ्यात हरवले
मी माझ्यात हरवले
1 min
1.5K
सापडावे म्हणून काहीच नाही केले
सुंदर अशा अथांग सागरात अनमोल मोती मिळाले,
जपून ठेवण्याचे देखील भान नव्हते मला,
मी माझ्यात हरवले || १ ||
सांगू शकेन फक्त एवढेच
निःशब्द असा आनंद मिळाला
जो नाही हरवला कुठे,
"मी माझ्यात हरवले " || २ ||