STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

माझ्याशी बोलतो...

माझ्याशी बोलतो...

1 min
265

तुझ्या भावनांचे गुपित खोलतो 

तुझा नखरा माझ्याशी बोलतो....


का माझ्यासमोर तू फेरे मारतेस 

गालातल्या गालात गोड हसतेस 

माझ्यापुढेच गं तुझा रुबाब चालतो.....


तिरकी नजर करे काळीज गार 

कसा उचलू तुझ्या इश्काचा भार 

तुझं सावळं रूप मी सोन्यात तोलतो....


जगावेगळी आहे गं तुझी अदा 

हा वेडा जीव झाला तुझ्यावर फिदा 

तुझ्या गळ्यात मोत्याची माळ घालतो.....


तुझाच फोटो असतो माझ्या उशाला 

सगळ्या समोर उलट बोलतेस कशाला 

दिन-रात तुझ्या मागे पुढे डोलतो.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance