STORYMIRROR

minakshi hedau

Romance

3  

minakshi hedau

Romance

#lovelanguage प्रपोज

#lovelanguage प्रपोज

1 min
205

कधीतरी वाटतं खरं प्रेम कसं असतं

शिकावं आपल्या आई बाबांकडून..

एकमेकांना शब्दात "प्रपोज" न करताही

वागलेत का ते कधी शब्दांचा मान सोडून?


कामासाठी, लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी

बाबा अविरत धावत राहायचे..

आईची मात्र काहीच तक्रार नाही

मग ह्याला प्रेम नसेल असे का म्हणायचे?


त्यांचं निभायचं डोळ्यांच्या भाषेनी

पुरे असायचे बोलणे दोन क्षण प्रेमानी..

स्वतःचं आयुष्य संपलं तरी काळजी मात्र तिची

सारी तरतूद आधीच तिच्या सुखी आयुष्याची..


शेवटच्या क्षणीही बिछान्यावर असताना

तिचीच विचारपूस जराशी ती जवळ नसताना...

तिचा आवाज ऐकताच हास्यलकेर उमटायची

बाबांच्या चेहऱ्यावर बरोबर...

हे प्रेम नाही तर आणखी काय?

अश्या प्रेमाला प्रपोज नावाच्या कुबड्यांची गरज आहे का खरोखर??


Rate this content
Log in

More marathi poem from minakshi hedau

Similar marathi poem from Romance