ध्यास तू...
ध्यास तू...
तू आहेस सखे माझा जीव
कर माझ्या प्रेमाची कीव
तुझ्या सोबत जोडलं नाव
माझ्या जगण्याची आस तू....
तुला पाहून देवाला विसरलो
तुझ्या प्रेमात पडून मी घसरलो
खरं आहे मी झालो वेडा
माझ्या वेडेपणाचा ध्यास तू.....
मी कधी स्वप्न पाहिलं ना एकट्याचं
माझं स्वप्न राणी तुझ्या प्रेमाच्या घरट्याचं
तुझं दु:ख माझं आहे
सारं जग सोडून माझ्यासाठी खास तू.....

